एआय वारंवार केली जाणारी कामे करत असताना भारतातील प्रोफेशनल्‍स मानव-केंद्रित पदांचा अवलंब करत आहेत: लिंक्‍डइन

News Service

भारत, २०२५: एआय वारंवार केली जाणारी कामे करत असताना भारतातील प्रोफेशनल्‍स मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि परस्‍परसंवादावर अवलंबून असलेल्‍या पदांना प्राधान्‍य देत आहेत. नवीन लिंक्‍डइन (LinkedIn) डेटामधून निदर्शनास येते की एचआर प्रोफेशनल्‍स ग्राहक पाठिंबा व प्रशासन पदांना प्राधान्‍य देत आहेत, फायनान्‍स प्रोफेशनल्‍स ग्राहक पाठिंबा व लेखा पदांना प्राधान्‍य देत आहेत आणि अभियंते शिक्षण क्षेत्रातील रोजगारांना प्राधान्‍य देत आहेत.
यासोबत लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की अधिकाधिक कर्मचारी उच्‍च मूल्‍य क्षेत्रांमध्‍ये प्रवेश करत आहेत, जेथे धोरणात्‍मक माहितीसह सल्‍लामसलत, व्‍यवसाय विकास, रिअल इस्‍टेट आणि उत्‍पादन व्‍यवस्‍थापन महत्त्वपूर्ण आहेत. यामधून अद्वितीय मानवी क्षमतांची मागणी असलेल्‍या पदांना अधि‍काधिक प्रोफेशनल्‍स प्राधान्‍य देत असल्‍याचे दिसून येते.
लिंक्‍डइन इंडियाच्‍या वर्कफोर्स कॉन्फिडन्स सर्व्‍हेनुसार एआयवर उच्‍च विश्वास आहे. भारतातील ६२ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की एआय त्‍वरित काम करत त्‍यांची उत्‍पादकता वाढवते आणि ५९ टक्‍के प्रोफेशनल्‍स त्‍यांच्‍या करिअरसाठी एआयच्‍या क्षमतेबाबत उत्‍सुक आहेत. मीडिया, एचआर, इंजीनिअरिंग व मार्केटिंग अशा क्षेत्रांमध्‍ये एआयकडे मोठ्या प्रमाणात साधन म्‍हणून पाहिले जात आहे, जे कर्मचाऱ्यांना धोरणात्‍मक व उच्‍च-मूल्‍य कामावर लक्ष केंद्रित करण्‍यापासून मुक्‍त करते.
लिंक्‍डइनच्‍या करिअर तज्ञ व भारतातील वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निराजिता बनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्‍हणाल्‍या, ”आजकाल करिअर एआयसह घडत आहे, ज्‍याला एआय देखील गती देत आहे. उमेदवार आज तीन सोप्‍या गोष्‍टींमध्‍ये अग्रस्‍थानी आहेत: कौशल्‍यांसह नेतृत्‍व करणे, पुरावा दाखवणे आणि त्‍यांची संधी वाढवण्‍यासाठी एआयचा वापर करणे. म्‍हणून कौशल्‍य आधारित संधींसाठी रोजगारासंदर्भात निर्णय घेण्‍यामध्‍ये बदल करा. लिंक्‍डइनवर दर आठवड्याला किंवा दोन आठवड्यांनी तुमच्‍या कामाचे लहान पुरावे प्रकाशित करा, ज्‍यामुळे हायरिंग व्‍यवस्‍थापकांना तुमची विचारसरणी समजू शकेल. आणि शेवटचे म्‍हणजे, एआयचा वापर करत पदांचा शोध घ्‍या, तुमचे अर्ज तयार करा आणि उत्तम उत्तरे देण्‍यासाठी मुलाखतींचा सराव करा. मानवी निर्णयक्षमता व एआयचे हे संयोजन भारतातील तरूण प्रोफेशनल्‍सना विश्वासाने पुढे जाण्‍यास फायद्याचे ठरू शकते.”
प्रोफेशनल्‍स विकास करण्‍यासाठी नवीन मार्गांचा शोध घेत असताना लिंक्‍डइनचे एआय-पॉवर्ड जॉब सर्च त्‍यांच्‍या रोजगाराचा शोध घेण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये बदल घडवून आणत आहे. प्रोफेशनल्‍स त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या शब्‍दांमध्‍ये शोध घेत असलेल्‍या पदांचे वर्णन करू शकतात आणि त्‍यांची रूची, कौशल्‍ये व ध्‍येयांना अनुसरून रोजगारांचा शोध घेऊ शकतात.
स्‍मार्ट पद्धतीने रोजगार शोधण्‍यासाठी आणि एआय-संचालित परिवर्तनाच्‍या पुढे राहण्‍यासाठी लिंक्‍डइनच्‍या सूचना पुढीलप्रमाणे:

  1. रोजगार शोधामध्‍ये आकारमान तुमचा सोबती नाही: कधी-कधी तुम्‍ही रोजगार वर्णन वाचण्‍यामध्‍ये आणि कंपन्‍यांचे मूल्‍यांकन करण्‍यामध्‍ये बराच वेळ व्‍यतित करता, ज्‍यामुळे तुम्‍हाला पाहिजे असलेली कंपनी मिळत नाही. लिंक्‍डइनच्‍या जॉब मॅच फिचरसह तुम्‍ही रोजगारासाठी अनुकूल आहात की नाही हे सेकंदांमध्‍ये जाणून घेऊ शकता, ज्‍यासाठी तुमच्‍या प्रोफाइलमध्‍ये कौशल्‍ये व पात्रता महत्त्वाची आहे.
  2. नवीन संधी शोधण्‍याासठी कमी शब्‍दांमध्‍ये अधिक कौशल्‍यांची माहिती: नवीन एआय टूल्‍ससह तुम्‍ही सोपी वाक्‍ये व महत्त्वपूर्ण माहितीचा वापर करत रोजगारांचा शोध घेऊ शकता. लिंक्‍डइनचे एआय-पॉवर्ड जॉब सर्च (AI-powered Job Search) नैसर्गिक भाषा समजते, ज्‍यामुळे तुम्‍ही मित्राला सांगत आहे त्‍याप्रमाणे पदाचे वर्णन करू शकता आणि ते तुमच्‍या विचारानुसार संबंधित रोजगारांची माहिती देईल.
  3. तुमच्‍या महत्त्वाकांक्षेमध्‍ये स्‍पष्‍ट राहा, पण त्‍यापुरते मर्यादित राहू नका: एआय-पॉवर्ड जॉब सर्च पदांची माहिती देते, जे तुमचा अनुभव, तुमची क्षमता आणि तुमच्‍या ध्‍येयांशी संलग्‍न असतात. तुम्‍ही यापूर्वी यापैकी काही पदांचा विचार देखील केला नसेल. तुम्‍ही विचार न केलेल्‍या संधींचा विचार करा आणि आजच्‍या सर्वसमावेशक रोजगार बाजारपेठेत प्रगती करण्‍यासाठी अनुकूलतेचा अवलंब करा.
  4. शॉर्टकट नेहमी योग्‍य गंतव्‍यावर घेऊन जात नाहीत: तुमच्‍यामधील अद्वितीय टॅलेंटप्रमाणे प्रत्‍येक पद देखील अद्वितीय असते. तुमची हस्‍तांतरणीय कौशल्‍ये व वास्‍तविक अनुभवांचा उल्‍लेख करा आणि प्रत्‍येक अर्ज सानुकूल करत तुम्‍ही पदासाठी योग्‍य निवड का आहात हे निदर्शनास आणा.
  5. घोस्‍ट जॉब्‍स तुम्‍ही विचार करता त्‍याप्रमाणे प्रचलित नाहीत: बहुतांश रोजगार वास्‍तविक नसतात हा समज बरोबर नाही. खरी लिस्टिंग पाहण्‍यासाठी सत्‍यापन बॅजेस् तपासा. सुरक्षित व प्रभावी रोजगार शोधासाठी तुमच्‍या स्‍वत:च्‍या शोधासोबत लिंक्‍डइनच्‍या सेफ्टी वैशिष्‍ट्यांचा वापर करा.
    प्रत्‍येकला पुढे जाण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइनने अव्वल एआय वॉईसेसना निदर्शनास आणले आहे, ज्‍यांना तुम्‍ही एआय टूल्‍स उपयुक्‍त ठरू शकण्‍याकरिता स्‍मार्ट, व्‍यावहारिक टिप्‍स मिळवण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्मवर फॉलो करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button