भारत, 8 डिसेंबर 2025 – आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आता भारताच्या डिजिटल रूपांतरणाच्या केंद्रस्थानी आहे- सुरक्षितता, उपलब्धता व दैनंदिन सक्षमतेला चालना देत आहे. या स्थित्यंतराचा परिपाक असलेल्या सॅमसंग सॉल्व फॉर टूमॉरो (एसएफटी) २०२५ आयआयटी दिल्लीच्या सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाने देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना वास्तव जगातील एआय सोल्यूशन्स डिझाइन करण्यासाठी एकत्र आणले. ‘एआय फॉर सेफर, स्मार्टर अँड इन्क्लुजिव भारत (अधिक सुरक्षित, चतुर व समावेशक भारतासाठी एआय’ या विषयाखाली सोल्यूशन्स डिझाइन केली जात आहेत.
या वर्षीच्या विषयातील हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, “एआय फॉर सेफर, स्मार्टर अँड इन्क्लुजिव भारत.”
१. सामाजिक प्रभावावर लक्ष केंद्रित करणारा विषय
सार्वजनिक स्थळांवरील सुरक्षितता वाढवण्यास, नेत्रहिनांच्या दृष्टीने वापर अधिक सोपा करण्यास तसेच आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्यात मदत करण्यास या एआय थीमने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
२. कल्पक तरुण आणि त्यांचे ‘ब्रेकथ्रू’
चक्रव्यूह, एरर 404, पॅशनेट प्रॉब्लेम सॉल्वर, पर्सिविया आणि सिकॅरिओ यांसारख्या संघांनी एआय-एनेबल्ड टेहळणी नेटवर्क्सपासून स्त्रियांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या अॅप्सपर्यंत आणि स्मार्ट एनर्जी मीटर्सपासून नेत्रहिनांसाठी वेअरेबल नेव्हिगेशन उपकरणांपर्यंत अनेक प्रकारची सोल्यूशन्स विकसित केली.
● चक्रव्यूह (उत्तर प्रदेश): सीमेवरील घुसखोरीचे इशारे देण्यासाठी ड्रोन-एनेबल्ड देखरेख प्रणाली
● एरर फोरझिरोफोर (उत्तर प्रदेश): रिअल-टाइम फॉल डिटेक्शन व ईआरसह स्त्रियांसाठी एआयपॉवर्ड सेफ्टी अॅप
● पॅशनेट प्रॉब्लेम सॉल्वर (दिल्ली): एआयवर आधारित इन्क्रिप्शन व प्रेडिक्टि इशाऱ्यांसह विकेंद्रीकृत स्मार्ट ऊर्जा मीटर प्रणाली
● सिकॅरिओ (दिल्ली): नेत्रहिनांसाठी रिअल-टाइम फेस रेकग्निशन (चेहरे ओळखणे) व ऑफलाइन नेव्हिगेशन सहाय्य पुरवणारे एआय चष्मे
३. विषयातील विजेता संघ: पर्सिविया
या विषयातील आघाडीचा संघ ठरला पर्सिविया, बेंगळुरूचा विद्यार्थी तुषार शॉ याच्या नेतृत्वाखाली या संघाने एआय-पॉवर्ड ग्लासेस (चष्मा) तयार केले. हे चष्मे वस्तू ओळखण्यात मदत करतात तसेच स्थानाधारित मार्गदर्शन करतात, त्यामुळे नेत्रहिन वापरकर्त्यांसाठी कुठेही ये-जा करणे अधिक सुरक्षित व स्वतंत्र होते.
४. एआय पलीकडील अन्य क्षेत्रांतील राष्ट्रीय विजेते
एसएफटी २०२५चे अन्य राष्ट्रीय विजेते पुढीलप्रमाणे:
● नेक्स्टप्ले.एआय –एआय क्रीडा प्रशिक्षण प्लॅटफॉर्म
● पॅरास्पीक – डीप-लर्निंग स्पीच-क्लॅरिफिकेशन उपकरण
● पृथ्वी रक्षक – गेमीफाइड शाश्वतता अॅप
५. हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी सहाय्य
विजेत्यांना आयआयटी दिल्लीमध्ये ₹१ कोटी रुपयांपर्यंत इनक्युबेशन सहाय्य प्राप्त झाले आहे, शिवाय आघाडीच्या संघांना अतिरिक्त बक्षिसे देण्यात आली आहेत, यांत ₹१ लाखांचे अनुदान, गुडविल अवॉर्ड्स, यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड्स आणि गॅलग्झी झेड फ्लिप स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
६. भविष्यकाळातील परिवर्तनकर्ते तयार करणारा प्लॅटफॉर्म
सहभागी विद्यार्थ्यांना एफआयटीटी लॅब्जमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रांतील मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे, सहानुभूतीवर आधारित जबाबदार एआयवर भर देणारे डिझाइन-थिकिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे. २०१० सालापासून एसएफटीमध्ये ६८ देशांमधील २.९ दशलक्ष नवोन्मेष्कारी तरुणांनी सहभाग घेतला आहे. हा उपक्रम भारतातील समस्या निवारण करणाऱ्यांच्या पुढील पिढीला आकार देण्याचे काम सातत्याने करत आहे.