सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डच्या लाँचची घोषणा केली, ज्यासह मोबाइल एआय युगासाठी नवीन फॉर्म फॅक्टरमधील सॅमसंगचे नेतृत्व अधिक प्रबळ केले आहे. दशकभराच्या फोल्डेबल श्रेणी नाविन्यतेवर आधारित गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डमध्ये उत्कृष्ट रचनेसह सर्वात प्रगत फोल्डेबल तंत्रज्ञान आहे, जे मल्टी-फोल्डिंग डिझाइनच्या अद्वितीय मागण्यांशी सानुकूल करण्यात आले आहेत. या डिवाईसचा स्लिम प्रोफाइल प्रीमियम फोनच्या पोर्टेबिलिटीची खात्री देतो, ज्यामधून अधिक कार्यक्षमता आणि अनफोल्ड केल्यानंतर दुप्पट कार्यक्षमता मिळते. या डिवाईसमध्ये आकर्षक १०-इंच डिस्प्ले आहे, जो उत्पादकता आणि सिनेमॅटिक व्युइंग वाढवतो, तसेच दर्जात्मक मोबाइल अनुभव देतो, जो यापूर्वी कोणत्याच फॉर्म फॅक्टरमध्ये दिसण्यात आलेला नाही.

”सॅमसंचे नवीन क्षमतांप्रती निरंतर प्रयत्न मोबाइल अनुभवांच्या भविष्याला आकार देत आहेत,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व डिवाईस एक्स्पीरिअन्स (डीएक्स) डिव्हिजनचे प्रमुख टीएम रोह म्हणाले. ”फोल्डेबल फॉर्म फॅक्टरमधील अनेक वर्षांच्या नाविन्यतेच्या माध्यमातून गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड मोबाइल उद्योगामधील दीर्घकाळापासून असलेल्या आव्हानांचे निराकरण करतो, तसेच एकाच डिवाईसमध्ये पोर्टेबिलिटी, प्रीमियम कार्यक्षमता व उत्पादकतेचे परिपूर्ण संतुलन देतो. गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड आता मोबाइलवर केले जाणारे काम, सर्जनशीलता आणि कनेक्शनसाठी क्षमतांमधील मर्यादांना दूर करतो.”
दशकभराच्या मोबाइल कौशल्यासह भविष्याला आकार
सॅमसंगने दीर्घकाळापासून मोबाइल उद्योगाचे नेतृत्व केले आहे, मोठ्या स्क्रिन आकाराचे डिवाईसेस, फोल्डेबल फॉर्म फॅक्टर्स आणि मोबाइल डिवाईसमध्ये एआयचा वापर अशा नवीन श्रेणी व अनुभवांमध्ये आघाडीवर आहे, तसेच वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेत या प्रत्येक नाविन्यता डिझाइन करण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक आरअँडडी, एण्ड-टू-एण्ड उत्पादन आणि प्रखर दर्जा नियंत्रणाच्या पाठबळासह गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड निदर्शनास आणतो की सॅमसंगने पोर्टेबल राहण्यासोबत अधिक आऊटपुट देणाऱ्या स्मार्टफोनसाठी नवीन मापदंड स्थापित करणे सुरूच ठेवले आहे.
सॅमसंगच्या संशोधन व डिझाइन प्रक्रियेमध्ये व्यक्तींची डिवाईसेस वापरण्याची पद्धत जाणून घेत नाविन्यतेला प्राधान्य देण्यात येते. कंपनीच्या फोल्डेबल श्रेणी नाविन्यतेमधील दशकभराच्या अनुभवामधून गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डचे अद्वितीय मल्टी-फोल्डिंग फॉर्म फॅक्टर डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामध्ये मुख्य डिस्प्लेच्या संरक्षणासाठी आतील बाजूने फोल्ड होणारी डिझाइन आहे. स्क्रिन सहजपणे उघडण्यासह बंद करण्यासाठी फोल्डिंग यंत्रणा अचूकपणे डिझाइन करण्यात आली आहे, जेथे ऑटो-अलार्म वापरकर्त्यांना ऑन-स्क्रिन अलर्टस् व व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून फोल्डिंग चुकीच्या पद्धतीने होत असल्याबाबत दक्ष करते. सर्वोत्तम, युजर-अनुकूल अनुभव देण्यासाठी प्रत्येक तपशील अचूकतेने व उद्देशासह डिझाइन करण्यात आला आहे.
फक्त ३.९ मिमी जाडी असलेला गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड प्रमुख-स्तरीय कार्यक्षमता देतो. या डिवाईसमध्ये सानुकूल स्नॅपड्रॅगन® ८ एलाइट मोबाइल प्लॅटफॉर्म फॉर गॅलेक्सी, २०० मेगापिक्सल कॅमेरा आणि आतापर्यंतची फोल्डेबलमधील सॅमसंगची सर्वात मोठी बॅटरी आहे. संतुलित पॉवर डिलिव्हरी आणि दिवसभर कार्यरत राहण्यासाठी डिवाईसच्या प्रत्येक ३ पॅनेल्समध्ये ५,६०० एमएएच थ्री-सेल बॅटरी सिस्टम बसवण्यात आली आहे. ४५ वॅट सुपर-फास्ट चार्जिंगसह गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड वापरकर्त्यांना विनाव्यत्यय स्ट्रिमिंगची, कन्टेन्ट निर्मितीची आणि काम करण्याची सुविधा देतो.
सडपातळ, पोर्टेबल फ्रेममध्ये अत्यंत दर्जात्मक डिवाईसच्या क्षमतेमध्ये संतुलन राखण्यासाठी मुलभूत फोल्डेबल तंत्रज्ञानाचे रि-ऑप्टिमायझेशन करण्यात आले आहे. डिवाईसचा प्रत्येक भाग संरचनात्मक नाविन्यता आणि उत्पादन हमीसह बारकाईने डिझाइन करण्यात आला आहे.
• सॅमसंगचे आतापर्यंतचे सर्वात प्रगत हिंजेस्: फोल्डेबल फोन नाविन्यतेमधील आपल्या वारसाला अधिक दृढ करत सॅमसंगने गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डच्या अद्वितीय मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आर्मर फ्लेक्सहिंजला सुधारित केले आहे. दोन वेगळ्या आकाराच्या हिंजेससह ड्युअल-रेल संरचना एकत्रित काम करतात, ज्यामधून डिवाईसमध्ये विविध भर व कम्पोनण्ट्स असताना देखील सुलभ, अधिक स्थिर फोल्डची खात्री मिळते. हिंज संरचनेमुळे स्क्रिन पॅनेल्स सुरक्षितपणे एकत्र येतात, ज्यामध्ये रिक्त जागा राहत नाही, ज्यामधून सडपातळ, अधिक पोर्टेबल डिवाईस मिळतो.
• नवीन डिझाइन केलेला फोल्डेबल डिस्प्ले: गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डमध्ये १०-इंच स्क्रिनसाठी डिझाइन करण्यात आलेले नवीन डिस्प्ले तंत्रज्ञान आहे, जेथे स्क्रिन दोनदा फोल्ड होते आणि स्मार्टफोन खिशामध्ये सहजपणे सामावून जातो. दोन वेळा फोल्ड होणाऱ्या डिवाईसमध्ये उत्तम रेसिस्टन्ससाठी सुधारित ओव्हरकोट शॉक-अॅब्जॉर्बिंग डिस्प्लेमध्ये सामील करण्यात आले आहे.
• बाहेरील बाजूने प्रगत मटेरिअल्स: टायटॅनियम हिंज हाऊसिंगमध्ये सडपातळ मेटल आहे, जे फोल्डिंग यंत्रणेचे संरक्षण करते आणि काळासह बिघाड होण्याला प्रतिबंध करते. डिवाईसच्या फ्रेमला उच्च क्षमतेचे अलॉई अॅडवान्स्ड आर्मर अॅल्युमिनिअमचे पाठबळ आहे, जे प्रबळता वाढवते. फ्रेम खात्री देते की स्क्रिन्स एकमेकांच्या संपर्कात येणार नाहीत आणि सिरॅमिक-ग्लास फायबर-रिइन्फोर्स पॉलिमर बॅक पॅनेल डिझाइनला सडपातळ ठेवते, तसेच ओरखडे येण्याला प्रतिबंध करते.
• प्रत्येक डिवाईसची उच्च दर्जाची तपासणी: प्रत्येक लहान गरजेची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक युनिटच्या दर्जाची प्रखरपणे तपासणी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, स्थिर प्रिंटेड सर्किट बोर्डच्या सीटी स्कॅनिंगमधून खात्री मिळते की ते डिझाइनला अनुसरून योग्यरित्या उत्पादित करण्यात आले आहे, तसेच इतर अंतर्गत डिस्प्ले कम्पोनण्ट्ससोबत एकत्रित होण्यापूर्वी अचूकता व विश्वसनीयतेची खात्री देते. लेझर स्कॅनिंग खात्री देते की सर्व अंतर्गत कम्पोनण्ट्स त्यांच्या अपेक्षित उंचीवर योग्यरित्या बसवण्यात आले आहेत, ज्यामधून दर्जात्मक पृष्ठभागाची खात्री मिळते.
डिझाइन नाविन्यता, उत्कृष्ट रचना आणि उच्च दर्जाच्या मानकांसह प्रत्येक डिवाईस वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
सॅमसंगचा सर्वात वैविध्यपूर्ण एआय फोन, ज्यामध्ये आहे सर्वात मोठी स्क्रिन
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डवरील उत्पादकता प्रबळ अनुभवांसह वाढवण्यात आली आहे, तसेच गॅलेक्सी फोनवरील आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रिन १०-इंच डिस्प्लेसाठी सानुकूल करण्यात आली आहे. डायनॅमिक डिझाइनला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांप्रमाणे गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड शक्तिशाली, वैविध्यपूर्ण असण्यासोबत आधुनिक एआय युगासाठी सुसज्ज आहे.
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड उघडल्यानंतर स्क्रिन १०-इंच डिस्प्लेवर तीन ६.५-इंच स्मार्टफोन्सचे डिस्प्ले असल्याप्रमाणे वाटते, ज्यामुळे वापरकर्त्यांना विविध टास्क करण्यासाठी मोठ्या आकाराची स्क्रिन मिळते. वापरकर्ते विविध टास्क्ससाठी स्क्रिनचा वापर करू शकतात. ते विनाव्यत्यय साइड-बाय-साइड तीन विभिन्न पोर्ट्रेट-आकाराचे अॅप्स तयार करू शकतात, मल्टी-विंडोमध्ये अॅप्सचा आकार बदलत स्पष्टपणे सर्वात महत्त्वाची माहिती पाहू शकतात किंवा अधिक फोकससाठी उभ्या रेषेत डॉक्युमेंट्स पाहू शकतात. उदाहरणार्थ, मोठ्या स्क्रिनवर नवीन घरासाठी आर्किटेक्ट ड्राफ्टिंग डिझाइन प्लॅन्स वापरता येऊ शकतात, ज्यामध्ये एकाच वेळी तीन अॅप्लीकेशन्स ऑपरेट करता येऊ शकतात, ब्लूप्रिंट्सचे पुनरावलोकन करता येऊ शकते, प्रस्ताव लिहिता येऊ शकतो आणि एकाच, मल्टी-विंडो वर्कस्पेसमध्ये मापनांचे गणन करता येऊ शकते. टास्क्सदरम्यान अनपेक्षितपणे कॉल आल्यास ते कॉल उचलू शकतात, जेथे लेआऊटमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही किंवा टास्क रद्द होणार नाही. पुन्हा टास्ककडे जायचे असल्यास डिस्प्लेच्या तळाला उजव्या बाजूस असलेल्या टास्कबारवर त्वरित नुकतेच वापरण्यात आलेल्या अॅप्सना पुन्हा चालू करता येते, ज्यामुळे एका टॅपमध्ये पुन्हा टास्क दिसतो. प्रचलित अॅप्स व वैशिष्ट्ये जसे माय फाइल्स आणि सॅमसंग हेल्थ देखील मोठ्या स्क्रिनसाठी सानुकूल करण्यात आले आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना क्षणात माहिती संघटित करता व समजून घेता येते.
या मोठ्या आकाराची स्क्रिन देणाऱ्या प्रबळ क्षमतांशी जुळून जाण्याकरिता गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड स्वतंत्र सॅमसंग डीईएक्स असलेला पहिला मोबाइल फोन आहे. म्हणजेच, वापरकर्ते कुठूनही व्हर्च्युअली कामकाजाचे वातावरण सेट अप करू शकता. क्विक सेटिंग्ज पॅनेलचा वापर करत आणि गॅलेक्सीच्या सर्वात प्रगत वर्क सेटअपसाठी डीईएक्सची निवड करत वापरकर्त्यांना जवळपास चार वर्कस्पेसेस् उपलब्ध होऊ शकतात, जे प्रत्येकी एकाच वेळी पाच अॅप्स कार्यान्वित करू शकतात. ते एका वर्कस्पेसमध्ये मीटिंग प्रेझेन्टेशन रिव्ह्यू व एडिट करू शकतात आणि दुसऱ्या वर्कस्पेसवरून मित्रांसोबत चॅटिंग करून शकतात व ऑनलाइन खरेदी करू शकतात. अधिक समान उत्पादकतेसाठी वापरकर्ते एक्स्टेण्डेड मोडमध्ये दुसरी स्क्रिन सामील करू शकतात, जी बाहेरील मॉनिटरप्रमाणे दोन स्क्रिनचा अनुभव देते. वापरकर्ते स्क्रिन्सदरम्यान अॅप्स सहजपणे ड्रॅग व ड्रॉप करू शकतात आणि डेस्कटॉप कार्यक्षमतेसह दोन्ही स्क्रिन्सवर काम करू शकतात. वापरकर्ते ब्ल्यूटूथ माऊस व कीबोर्ड देखील कनेक्ट करू शकतात, ज्यामुळे डिवाईस गुंतागूंतीचे प्रोजेक्ट्स किंवा सर्जनशील डिझाइन्ससाठी अल्टिमेट पोर्टेबल वर्कस्टेशनमध्ये बदलतो.
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डचा प्रत्येक तपशील उत्कृष्टतेसाठी डिझाइन करण्यात आला आहे आणि गॅलेक्सी एआयसह या क्षमता डिवाईसला अधिक प्रबळ बनवतात, तसेच मोठ्या स्क्रिनवर प्रत्येक वैशिष्ट्य अधिक सर्वोत्तम बनते. वैशिष्ट्ये जसे फोटो असिस्ट, तसेच जनरेटिव्ह एडिट व स्केच टॅ इमेज गॅलेक्सी एआय स्थिरतेशी जुळून जातात, जेथे वापरकर्ते सॅमसंगच्या सर्वात वैविध्यपूर्ण क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्मसह फोटो कॅप्चर करू शकतात आणि कन्टेन्ट निर्माण करू शकतात. वापरकर्ते साइड बाय साइड एडिट करताना अगोदर किंवा नंतर तुलना करू शकतात. ब्राऊजिंग असिस्ट सॅमसंग इंटरनेट वापरण्यामध्ये सुलभता आणू शकते, ज्यासह गरजेनुसार त्वरित सारांश किंवा भाषांतर मिळू शकते.
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डवर जेमिनी लाइव्ह मल्टीमोडल एआयसह सुधारण्यात आले आहे, जे वापरकर्त्यांच्या पाहण्याच्या, बोलण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतींना जाणून घेते. वापरकर्ते उच्च स्तरीय मल्टीटास्किंगदरम्यान सहजपणे संदर्भीय प्रश्न विचारू शकतात आणि उत्तरे मिळवू शकतात, ज्यासाठी अॅप्स बदलण्याची गरज भासत नाही. वापरकर्त्यांना रूम, शॉपिंग साइट व पेंट स्वॅचेस् दाखवल्यास मोठी स्क्रिन डिझाइनबाबत सल्ला देते, तसेच सानुकूल शिफारस देईल. जेमिनी लाइव्हवर स्क्रिन किंवा कॅमेरा शेअरिंगसह वापरकर्ते पाहत असलेले रिअल-टाइम साह्य व माहितीबाबत सहजपणे प्रश्न विचारू शकतात, जे सर्व एकाच डिवाईसवर उपलब्ध होते.
पॉकेट-आकाराचा, सिनेमॅटिक व्युइंग अनुभव
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डचे अद्वितीय फॉर्म फॅक्टर कन्टेन्ट निर्मिती व कामासाठी अनेक क्षमता देते, तसेच फोटो व व्हिडिओ कन्टेन्टच्या उच्च दर्जाच्या व्युइंगसाठी परिपूर्ण कॅन्व्हास देखील देते.
उत्तम पोर्टेबिलिटीसह अधिकतम व्युइंगसाठी डिझाइन करण्यात आलेल्या गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डची मोठ्या आकाराची १०-इंच मुख्य स्क्रिन चित्रपट किंवा मालिका पाहण्याचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण आहे. यूट्यूबवर अधिक मनोरंजनासह वापरकर्ते आता व्हिडिओ पाहू शकतात आणि साइड-बाय-साइड कमेण्ट्स वाचू शकतात. डिवाईसवरील किमान क्रिजिंग कन्टेन्टला सहजपणे व विनाव्यत्यय उपलब्ध करून देते. हा डिवाईस बंद केल्यानंतर खिशामध्ये सहजपणे मावतो.
सॅमसंगच्या व्हिज्युअल डिस्प्लेमधील कौशल्यावर आधारित हा डिवाईस जवळपास १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह डायनॅमिक २X एएमओएलईडी कव्हर स्क्रिनवर सिल्की-स्मूद व्हिज्युअल्स देतो. गॅलेक्सी झेड ट्रायफोल्डमध्ये उघडल्यास किंवा बंद केल्यास प्रखर डिस्प्ले आहे, तसेच कव्हर डिस्प्लेवर जवळपास २६०० नीट्स आणि मुख्य स्क्रिनवर १६०० नीट्स आहे. व्हिजन बूस्टर कोणत्याही प्रकाशामध्ये कलर व कॉन्ट्रास्ट सानुकूल करते, ज्यामुळे प्रत्येक फोटो व फ्रेम सुस्पष्टपणे दिसते, ज्यामधून सर्वोत्तम व्हिज्युअल अनुभव मिळतो.
उपलब्धता व ऑफर्स
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड १२ डिसेंबर २०२५ रोजी कोरियामध्ये खरेदीसाठी उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे, ज्यानंतर चीन, तैवान, सिंगापूर, यूएई व यूएस अशा इतर बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल. लाँचप्रसंगी गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड लाँच करण्यात येणाऱ्या संबंधित देशांमधील निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल, जेथे या उत्साहवर्धक नवीन डिवाईसचा प्रत्यक्ष अनुभव आणि स्टोअरमध्ये सहाय्यता मिळेल. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: Samsung Newsroom, samsungmobilepress.com किंवा samsung.com.
गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना गुगल एआय प्रोवर ६-महिन्यांचे ट्रायल, तसेच जेमिनी अॅपवरील प्रबळ वैशिष्ट्यांची उपलब्धता, जसे व्हिओ३ द्वारे समर्थित व्हिडिओ जनरेशन आणि २ टीबी सुरक्षित क्लाऊड स्टोरेज मिळू शकते. प्रतिष्ठित गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड ग्राहकांना अपवादात्मक मूल्य देण्यासाठी सॅमसंग गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड ग्राहकांकरिता विशेष डिस्प्ले रिपेअर बेनीफिट सादर करत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड खरेदीदार डिस्प्ले दुरूस्ती खर्चावर एक-वेळ ५० टक्के सूटसाठी पात्र असेल.