स्प्राइटच्या ‘जोक इन ए बॉटल’साठी नवीन टीव्हीसीमध्ये एकत्र आलेले कपिल शर्मा आणि अनुराग कश्यप यांनी मोहिमेमध्ये त्यांच्या अद्वितीय विनोदी केमिस्ट्रीची भर केली, तसेच उत्साहवर्धक व विनोदी ट्विस्ट्स आणले
भारत, २२ एप्रिल २०२५: स्प्राइट हे आयकॉनिक लेमन व लाइम-फ्लेवर्ड बेव्हरेज त्यांच्या ब्लॉकबस्टर ‘जोक इन ए बॉटल’ मोहिमेच्या आणखी एका विनोदी ट्विस्ट्मध्ये हास्यपूर्ण धमालीसह परतले आहे. मोहिमेच्या जनरेशन झेडची हुशारी आणि पॉप संस्कृतीच्या सिग्नेचर संयोजनाला अधिक पुढे घेऊन जात ब्रँड विलक्षण जोडीला सादर करत आहे, जेथे कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सर्वोत्तम चित्रपटनिर्माते अनुराग कश्यप यांनी या मोहिमेच्या टीव्हीसीमध्ये खूप धमाल केली. टीव्हीसीमध्ये हुशारी व विलक्षणतेचे उत्साहवर्धक संयोजन आहे, ज्यामधून स्प्राइट-स्टाइलमध्ये कूल राहण्यासोबत मनोरंजनाचा आनंद घेण्याच्या पद्धतीला दाखवण्यात आले आहे.
जाहिरातीच्या सुरूवातीला अनुराग कश्यप कपिल शर्माला ‘रिलेटेबल’ जाहिरातीबाबत विचारतात. ज्यानंतर सर्जनशील व्यक्तींमधील विनोदी धमाल सुरू होते. कपिल अनुराग यांच्या पदार्पणीय जाहिरातीबाबत मस्करी करतो, तर अनुराग त्याच्या दृष्टिकोनाला सर्वोत्तम प्रत्युत्तर देतात आणि त्यानंतर धमाल वाढत जाते. शेवटी कपिल हसतो आणि अनुराग त्यांच्या सिनेमॅटिक स्टाइलमध्ये जीनीच्या दिव्याप्रमाणे जोक इन ए बॉटलला सादर करतात, ज्यासह त्यांच्यामधील धमाल वाढत जाते. स्प्राइट रिफ्रेशमेट व कॉमेडीचे सिग्नेचर संयोजन आहे, जे जोक इन ए बॉटलच्या तिसऱ्या सीझनसाठी योग्य टोन सेट करत आहे.

स्प्राइटचे जोक इन ए बॉटल (जेआयएबी) एक एन्टरटेन्मेंट प्रॉपर्टी आहे, ज्यामध्ये शॉर्ट कॉमिक कन्टेन्ट आहे. विलक्षण पंचलाइन्सपासून भारतातील टॉप क्रिएटर्सचे पाठबळ असलेल्या मीम स्टुडिओपर्यंत जेआयएबी उत्साही जनरेशन झेडसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ग्राहक स्प्राइट बॉटल स्कॅन करू शकतात, पेयाचा आस्वाद घेऊ शकतात आणि कधीही, कुठेही विनोदासह थंडाव्याचा आनंद घेऊ शकतात.
कोका-कोला इंडिया व साऊथवेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या सीनियर कॅटेगरी डायरेक्टर सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, ”जोक इन ए बॉटल सांस्कृतिक परिवर्तनाला सादर करते, जेथे जनरेशन झेडकरिता उत्साही राहण्यासोबत अभिव्यक्त होण्यासाठी विनोद दैनंदिन प्रथा बनली आहे. स्प्राइटमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे, ती म्हणजे या मानसिकतेला अधिक उत्साही करणे, जे ग्राहकांप्रमाणे चतुर आहेत. यावेळी आम्ही दोन विशिष्ट व्यक्ती कपिल शर्मा आणि अनुराग कश्यप यांना फॉर्मेटमध्ये एकत्र आणले आहे, जे तणावाच्या स्थितीमध्ये देखील हास्य व मनोरंजनाची भर करतात.”
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत कपिल शर्मा म्हणाले, ”स्प्राइट जेआयएबी नेहमीच एक धमाल राहिले आहे आणि मला ते प्रेक्षकांना देणाऱ्या सरप्राइजेज खूप आवडते. अनुराग यांच्यासोबत या जाहिरातीसाठी शूटिंग करण्याचा अनुभव स्प्राइट व सिनेमाचा आनंद घेण्यासारखा होता, जो अनपेक्षित आणि पूर्णत: उत्साही होता. मी सर्वांना बॉटल स्कॅन करून आनंद घेताना पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.”
टेलिव्हिजन, डिजिटल व आऊटडोअरमध्ये सर्वांगीण सादरीकरणासह ‘जोक इन ए बॉटल’ देशभरात पोहोचण्याची खात्री देते. मीम ड्रॉप्सपासून क्रिएटर कोलॅब्सपर्यंत स्प्राइट भारतातील विनोदी संवादांमध्ये अग्रस्थानी आहे, तसेच पेयाचा आस्वाद, स्कॅन आणि हास्यासह ‘थंड रख’ला प्रत्यक्षात आणत आहे.