सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या 16व्या सीझनने प्रेक्षकांवर आपली मजबूत पकड ठेवली आहे, ज्याचे कारण आहे- हा शो होस्ट करणारे श्री. अमिताभ बच्चन आणि शोमध्ये भावना आणि बुद्धी यांच्यात साधलेले सुंदर संतुलन! स्पर्धकांच्या भावुक करणाऱ्या कथा, या खेळातील बौद्धिक थरार आणि बच्चन यांचे मोहक सूत्रसंचालन यामुळे समस्त देशाचा हा आवडता शो बनला आहे. आगामी भागात, गुजरातमध्ये राहणारी आर्ट्स आणि क्राफ्ट्स तसेच संगीत शिक्षिका हर्षा उपाध्याय हॉट सीटवर विराजमान झालेली दिसेल. तिचा शिकवण्याचा ध्यास आणि चिकाटीने केलेला प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.
एका अन्नाशी संबंधित प्रश्नांनंतर हलक्या-फुलक्या गप्पा मारताना हर्षा उपाध्यायने अमिताभ बच्चन यांना विचारले की, त्यांना चुरमा आवडतो का. त्यावर त्यांनी गालातल्या गालात हसत उत्तर दिले की, कदाचित सगळे पदार्थ त्यांना माहीत नसतील, पण एक पदार्थ आहे जो त्यांना अत्यंत प्रिय आहे: वडा पाव! ते उद्गारले, “त्याच्यापेक्षा चांगली दुसरी कोणतीच गोष्ट नाही. छोटासा असतो, पण काय छान लागतो.. सगळीकडे मिळतो.. फक्त देशातच नाही, विदेशातही.” या गंमतीदार संभाषणाने प्रेक्षकांना खूप हसवले. शिवाय, महान होस्ट आणि त्यांच्या समोर येणारे स्पर्धक यांच्यातले लोभस सख्य देखील यावेळी दिसून आले.
महान अमिताभ बच्चनला बघा, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!