‘लाइफस्टाइल इन मोशन’ थीम असलेल्या या अत्याधुनिक श्रेणीमध्ये इटालियन डिझाइन आणि भारतीय नाविन्यतेचे संयोजन आहे
भारत – जुलै १७, २०२५ – लक्झरी गतीशीलतेला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगामध्ये भारतातील कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड आणि इटलीमधील टोनिनो लॅम्बोर्गिनी एसपीए यांनी आज जागतिक बाजारपेठांसाठी त्यांच्या अत्याधुनिक व प्रगत गोल्फ आणि लाइफस्टाइल कार्टच्या विशेष श्रेणीच्या भव्य जागतिक अनावरणाचे आयोजन केले.बारकाईने डिझाइन करण्यात आलेल्या गोल्फ व लाइफस्टाइल कार्ट लक्झरी गतीशीलतेला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहेत, ज्यासह कायनेटिक ग्रीनने सर्वोत्तम चारचाकी गतीशीलता विभागात प्रवेश केला आहे. तसेच टोनिनो लॅम्बोर्गिनी एसपीएसह ईव्ही मेकरचे प्रमुख जागतिक विस्तारीकरण दिसून येते. या श्रेणीमध्ये इटालियन डिझाइन आणि कायनेटिक ग्रीनच्या प्रमाणित इलेक्ट्रिक वेईकल क्षमतेसह परिपूर्ण संयोजन आहे.

या अनावरण समारंभाला भारताचे माननीय केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री श्री. पियुष गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर भारतातील इटलीचे राजदूत डॉ. अँटोनियो बार्टोली हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अरुण फिरोदिया आणि टोनिनो लॅम्बोर्गिनी एसपीएचे संस्थापक डॉ. टोनिनो लॅम्बोर्गिनी यांच्यासह प्रमुख मान्यवर अतिथी देखील उपस्थित होते. या लाँचला वरिष्ठ सरकारी अधिकारी, आघाडीचे गोल्फ उत्साही, प्रमुख उद्योगपती आणि आदरातिथ्य क्षेत्रातील दिग्गज तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमे उपस्थित होती.
इटालियन डिझाइन आणि भारतीय तंत्रज्ञानाचे संयोजन
इटालियन डिझाइन आणि भारतीय अभियांत्रिकीचे संयोजन असलेली टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ कार्टमधून लक्झरी जीवनशैलीचा अनुभव मिळतो. इटलीमध्ये डिझाइन केलेल्या जगातील पहिल्या प्रगत इलेक्ट्रिक वेईकल्स भारतात उत्पादित केली जातील आणि प्रतिष्ठित टोनिनो लॅम्बोर्गिनी ब्रँड अंतर्गत जागतिक स्तरावर विकल्या जातील, तसेच या वेईकल्सवर प्रतिष्ठित बुलसह रेड शील्ड देखील असेल. टोनिनो लॅम्बोर्गिनी जगातील सर्वात प्रतिष्ठित लक्झरी ब्रँड आहे. डॉ. टोनिनो लॅम्बोर्गिनी यांनी ४५ वर्षांपूर्वी या ब्रँडची स्थापना केली होती. हा प्रसिद्ध ब्रँड जीवनशैलीला नव्या उंचीवर घेऊन जातो आणि बीस्पोक फर्निचर व लाइफस्टाइल अॅक्सेसरीज, घड्याळे, स्मार्ट कॅफे फॉरमॅट टीएल रोसो कॅफे, आयकॉनिक ब्रँडेड रिअल इस्टेटपासून ते आदरातिथ्यपर्यंतच्या व्यवसायात वाढ झाली आहे.
या अद्वितीय संयुक्त उद्यमाद्वारे डिझाइन करण्यात आलेल्या गोल्फ आणि लाइफस्टाइल कार्ट अत्याधुनिक व आकर्षक आहेत. त्यांच्या रचनेमधून वैविध्यपूर्ण, धाडसी, मोहक आणि कालातीत इटालियन शैली दिसून येते! बीस्पोक लक्झरीसह गोल्फ कार्ट टोनिनो लॅम्बोर्गिनीचा वारसा अधिक दृढ करते, अद्वितीय आकर्षकतेची खात्री देते. टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ आणि लाइफस्टाइल कार्ट २-सीटर, ४-सीटर, ६-सीटर आणि ८-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असतील. चॅम्पियनशिप गोल्फ कोर्स व विस्तीर्ण लक्झरी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सपासून ते विस्तीर्ण खाजगी इस्टेट, विशेष गेटेड समुदाय, विमानतळ, कॉर्पोरेट कॅम्पस, मोठ्या मनोरंजनात्मक मालमत्ता आणि औद्योगिक सुविधांपर्यंत अनेक उच्च दर्जाच्या उपयोजनांसाठी या कार्टचा उपयोग होईल.
या विशेष अनावरणप्रसंगी आपला उत्साह व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “बऱ्याच काळापासून, गोल्फ कार्ट विभाग खऱ्या परिवर्तनाची वाट पाहत आहे – असाधारण ऑफर, जी सामान्य गोष्टींपेक्षाही जास्त आहे. गेल्या काही वर्षांत, गोल्फ कार्टचा वापर गोल्फव्यतिरिक्त लक्झरी रिसॉर्ट्स, जागतिक दर्जाचे विमानतळ, विस्तीर्ण टाउनशिप आणि कॉर्पोरेट कॅम्पस व वैयक्तिक वापरापर्यंत विस्तारला आहे. पण लोकप्रिय गोल्फ कार्टची रचना व वैशिष्ट्ये जवळ-जवळ तशीच राहिली आहेत आणि येथेच आम्हाला मोठी जागतिक बाजारपेठ मोठ्या परिवर्तनासाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे.
आमचा संयुक्त उद्यम कायनेटिक ग्रुपचा ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमधील दीर्घ वारसा, कायनेटिक ग्रीनचे इलेक्ट्रिक वेईकल्सची डिझाइन व निर्मितीमधील अग्रगण्य कौशल्य आणि आमची सहयोगी टोनिनो लॅम्बोर्गिनीची डिझाइन व जीवनशैली अनुभवाला अधिक उत्साहित करण्यातील जागतिक अनुभवाचा फायदा घेईल. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रसिद्ध रेड शील्डसह आयकॉनिक बुल वापरून आमच्या उत्पादनांचे जागतिक स्तरावर मार्केटिंग करेल. आमची मजबूत भारतीय अभियांत्रिकी व ईव्ही क्षमतांचे टोनिनो लॅम्बोर्गिनीच्या अतुलनीय डिझाइन कौशल्य आणि जागतिक लक्झरी दृष्टिकोनासह हे संयोजन केवळ भागीदारी नाही; तर एक आत्मविश्वासपूर्ण घोषणा आहे. आम्ही या विभागात धुमाकूळ निर्माण करण्यास आणि जागतिक स्तरावर नेतृत्व मिळवण्याच्या दिशेने काम करण्यास सज्ज आहोत, तसेच क्रांतीसाठी योग्य असलेल्या बाजारपेठांमध्ये आत्मविश्वासपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी नवीन मापदंड स्थापित करू. कायनेटिक ग्रीनसाठी ही आमच्या जागतिक प्रवासाची सुरुवात आहे, जेथे जगामध्ये मेड इन इंडिया ईव्ही लाँच केल्या जातील. कायनेटिक ग्रीनचा २०३० पर्यंत १ अब्ज डॉलर्सचा ईव्ही व्यवसाय उभारण्याचा मनसुबा आहे आणि हा संयुक्त उद्यम आमच्या जागतिक महत्त्वाकांक्षेत महत्त्वाची भूमिका बजावेल.”
याप्रसंगी मत व्यक्त करत टोनिनो लॅम्बोर्गिनी एसपीएचे उपाध्यक्ष श्री. फेरुसिओ लॅम्बोर्गिनी म्हणाले, “कायनेटिक ग्रीनसोबत हा सहयोग माझ्या वडिलांनी ४५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ब्रँडच्या इतिहासातील उत्साहपूर्ण नवीन अध्याय आहे. सहयोगाने आम्ही प्रकल्प तयार केला आहे, जो दोन देशांतील सर्वोत्तम गोष्टींना एकत्र करतो, ते म्हणजे इटालियन डिझाइनची भव्यता व ओळख आणि भारतीय उत्पादनाची ताकद, कार्यक्षमता व नाविन्यता. हा औद्योगिक संयुक्त उद्यम असण्यासोबत भविष्याच्या सामायिक दृष्टिकोनाने एकत्रित झालेल्या दोन उद्योजक संस्कृतींमधील एक पूल आहे. टोनिनो लॅम्बोर्गिनीमध्ये आमचा दैनंदिन अनुभवांना शैली, कामगिरी आणि निर्विवाद ओळखीच्या अभिव्यक्तींमध्ये पुन्हा परिभाषित करण्यावर विश्वास आहे. आमचे ब्रँड तत्व माझ्या कुटुंबाच्या वारशात खोलवर रुजलेले आहे, पण ते सतत नाविन्यता आणि उत्कृष्टतेच्या उत्कटतेने प्रेरित आहे. या गोल्फ आणि लाइफस्टाइल कार्टसह, आम्ही ते तत्व नवीन विभागात आणत आहोत, ज्यामधून फक्त वेईकल्स नाही तर गतीशील जीवनशैलीचा देखील अनुभव मिळेल. आम्ही धोरणात्मक उत्पादन हब, तसेच स्वातंत्र्य, वाढ व जागतिक महत्त्वाकांक्षेचे प्रतीक म्हणून भारताची निवड केली. कायनेटिक ग्रीनसह, आम्ही मुलभूत मूल्ये सामायिक करतो: ग्राहकांवर खोल लक्ष केंद्रित करणे, सतत नाविन्यता आणणे आणि बारकाईने लक्ष देणे. परिणामत: ही उत्पादन श्रेणी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामधून आमच्या ब्रँडचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले तत्त्व दिसून येते आणि ही श्रेणी जगभरातील सूक्ष्मदर्शी ग्राहकांसाठी डिझाइन करणे स्वाभाविक होते. टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ कार्टमधून इलेक्ट्रिक जीवनशैली गतीशीलतेचा आमचा दृष्टिकोन दिसून येतो, जी आकर्षक, उच्च-कार्यक्षम आणि उद्देश-केंद्रित आहे. आम्हाला भारतासारख्या डायनॅमिक बाजारपेठेत हा प्रवास सुरू करण्याचा अभिमान वाटतो आणि आम्हाला विश्वास आहे की, हा प्रवास आमची शैली आणि सर्वोत्तमतेप्रती उत्कटतेला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाईल.”
डिझाइन आणि टेक्निकल वैशिष्ट्ये
आकर्षक एक्स्टीरिअरमध्ये अभियांत्रिकी चमत्कार आहे, जो अतुलनीय कामगिरी आणि मन:शांती देतो. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अद्वितीय स्मूदनेससाठी तयार केलेले मॅकफर्सन सस्पेंशन आणि स्थिरतेसाठी प्रगत चार-चाकी ब्रेकसह हायड्रॉलिक अॅश्युरन्स समाविष्ट आहे. शक्तिशाली ४५ एनएम टॉर्क आणि ३० टक्के ग्रेडबिलिटीसह ‘पॉवर ऑफ द बुल’चा अनुभव मिळतो, जे कुठेही सहज नेव्हिगेशनची खात्री देते. टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ कार्ट शांतमय राइडचा आनंद देतात. या कार्टमध्ये प्रगत ली-आयन बॅटरीसह वायरलेस बॅटरी चार्जिंग सिस्टम आहे – ज्यामध्ये देखभाल-मुक्त कार्यचालन, १० वर्षांचे आयुष्य आणि १५० किमी पर्यंतची प्रभावी रेंजची खात्री मिळते. यासोबत ५ वर्षांची वॉरंटी अधिक मन:शांती देते.
या विशेष गोल्फ कार्टची लक्झरी जीवनशैली सुधारित एर्गोनॉमिक्ससह कार्यक्षमतेमधून दिसून येते. या कार्टमध्ये लक्झरीअस आसन, एैसपैस लेगरूम आणि सर्वोत्तम कंट्रोल्स आहेत, ज्यामधून आरामदायी ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. नाविन्यपूर्ण डिझाइन व अभियांत्रिकीचे प्रतीक युनिव्हर्सल ड्राइव्ह क्षमतेसह टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ कार्ट डाव्या व उजव्या हाताच्या ड्राइव्हशी जुळवून जातात. ज्यामुळे जगाच्या कोणत्याही भागामध्ये स्टाइलमध्ये कार्ट ड्राइव्ह करण्याचा आनंद मिळतो.
टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ कार्टमध्ये दैनंदिन सोयी वाढवण्यासाठी डिझाइन केलेली सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. स्मार्ट टीएफटी डॅशबोर्ड महत्त्वाची माहिती देते, सुरक्षिततेसाठी हिल होल्ड आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक्स सारखी आवश्यक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. वायरलेस मोबाइल चार्जिंगसह आधुनिक जीवनशैलीची पूर्तता केली जाते, तर एलईडी हेडलाइट्स स्पष्ट दृश्यमानतेची खात्री देतात. एक्सटेंडेड स्मार्ट स्टोरेज, समर्पित गोल्फ बॅग होल्डर, ऑन-बोर्ड चार्जर, कॅडी स्टँड आणि फोल्डेबल विंडशील्डसह व्यावहारिकतेला प्राधान्य देण्यात आले आहे.
जागतिक व्यवसाय योजना
जागतिक इलेक्ट्रिक गोल्फ आणि लाइफस्टाइल कार्ट बाजारपेठ ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची बाजारपेठ असल्याचा अंदाज आहे, तसेच गोल्फव्यतिरिक्त अनेक उपयोजनांसाठी या कार्टचा वाढता वापर आणि शेवटच्या टप्प्यासाठी शाश्वत वाहतुकीला प्राधान्य यामुळे असाधारण परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. युरोपातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातील वेगाने वाढणारी वाढ यांच्यासह उत्तर अमेरिकेचा ४०.३ टक्के प्रभावी बाजारपेठेतील वाटा यामुळे गोल्फचे ६० टक्के वर्चस्व आणि ४०% प्रवेशासह लाइफस्टाइलचे वाढते योगदान यांच्यामध्ये अद्वितीय संधी निर्माण झाली आहे. कायनेटिक ग्रीन टोनिनो लॅम्बोर्गिनी प्रायव्हेट लिमिटेडची महत्त्वाकांक्षी जागतिक विस्तार योजना आहे, जी आशियापासून, विशेषतः भारत आणि संयुक्त अरब अमिरातीपासून सुरू होईल आणि नंतर युरोप, अमेरिका व इतर बाजारपेठांमध्ये वेगाने पुढे जाईल. पुढील पाच वर्षांत, संयुक्त उद्यमाचा ८० टक्के जागतिक गोल्फ कार्ट बाजारपेठेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ३० देशांमध्ये उपस्थिती निर्माण करण्याचा मानस आहे आणि आक्रमक वाढीच्या योजनेत ५ वर्षांमध्ये ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न गाठण्याचे लक्ष्य आहे.
कंपनीने आपल्या टोनिनो लॅम्बोर्गिनी गोल्फ कार्टच्या श्रेणीचे अनावरण केले आहे, ज्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण सिरीज आहेत: द जेनेसिस रेंज, मूळ वारसा, जो आकर्षक इटालियन डिझाइनचे प्रतिनिधीत्व करतो आणि अल्ट्रा-प्रीमियम, भविष्यकालीन प्रेस्टीज रेंज, भविष्याचा वारसा. या दोन प्रकाराच्या सिरीजमुळे कंपनी अनेक उपयोजन देण्यास आणि बाजारपेठेतील विविध विभागांना लक्ष्य करण्यास सक्षम होईल.
कंपनीने पुण्याजवळील एकात्मिक उत्पादन सुविधेत या आकर्षक ई-कार्टचे उत्पादन सुरू केले आहे आणि निर्यात कार्यासाठी मुंबईजवळील न्हावा शेवा बंदराचा वापर करण्याचा मानस आहे. कंपनीने भारतात, तसेच दुबई, अबू धाबी आणि सौदी अरेबिया, मालदीवसह युएईमधील विविध बाजारपेठांमध्ये वितरकांची नियुक्ती केली आहे, तसेच लवकरच न्यूझीलंड, श्रीलंका, थायलंड आणि इंडोनेशियासह आशियातील प्रमुख बाजारपेठांमध्ये त्यांचे वितरण भागीदार निश्चित करण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात या बाजारपेठांचा लाभ घेतल्यानंतर कायनेटिक ग्रीन टोनिनो लॅम्बोर्गिनी उर्वरित आशिया, युरोप आणि यूएसए बाजारपेठांमध्ये आपले कार्य विस्तारेल.