~ ई-लुनाला मिळालेल्या यशामधून प्रेरणा घेत कायनेटिक ग्रीनने पुढील १८ महिन्यांमध्ये तीन बॉर्न इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्सच्या लाँचची घोषणा केली आहे, ज्याची सुरूवात यंदा सणासुदीच्या काळात स्टायलिश फॅमिली स्कूटरसह होईल ~
पुणे, ११ जुलै २०२५: आपले नेतृत्व अधिक दृढ करत कायनेटिक ग्रीन या भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकी उत्पादक कंपनीने आज आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी व्यवसायासाठी आक्रमक विकास रोडमॅपची घोषणा केली आहे. एक वर्षापूर्वी लाँच करण्यात आलेली आयकॉनिक ई-लुनाच्या यशामधून प्रेरणा घेत कंपनी आता पुढील १८ महिन्यांमध्ये तीन उच्च कार्यक्षम बॉर्न-इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करण्यास सज्ज आहे, ज्यामध्ये जागतिक डिझाइन सर्वोत्तमता आणि प्रबळ भारतीय अभियांत्रिकीचे सुरेख संयोजन असेल.
या उत्साहवर्धक नवीन विस्तारीकरणामधील पहिले मॉडेल आहे प्रीमियम, स्टायलिश व तंत्रज्ञान-अग्रणी फॅमिली स्कूटर, जी २०२५ चा सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी लाँच होणार आहे. अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असलेली इलेक्ट्रिक दुचाकी (ई२डब्ल्यू) वापरकर्त्यांसाठी कालातीत रेट्रो-आकर्षकता आणि अद्वितीय सोयीसुविधा एकत्र करण्याकरिता विचारपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आकर्षक टीएफटी डिस्प्ले, प्रगत आयओटी क्षमता आणि जिओ थिंग्जसोबत सहयोगाने विकसित केलेला सर्वोत्तम डिजिटल प्लॅटफॉर्म असेल, ज्यामधून कनेक्टेड व विनासायास राइडिंग अनुभव मिळेल. विविध बॅटरी व्हेरिएण्ट्समध्ये सादर करण्यासोबत फास्ट-चार्जिंग तंत्रज्ञान असलेली ही ई-स्कूटर ग्राहकांच्या अनेक पसंती आणि बजेटची पूर्तता करण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आली आहे.
डिझाइन दर्जाला नव्या उंचीवर घेऊन जात कायनेटिक ग्रीनने इटलीमधील दिग्गज जागतिक डिझाइन ब्रँड टोरिनो डिझाइनसोबत सहयोग केला आहे, जेथे सहयोगाने अल्ट्रा-फ्यूचरिस्टिक स्कूटर्सची नवीन श्रेणी डिझाइन करण्यात येईल. या नेक्स्ट-जनरेशन मॉडेल्समध्ये बॉर्न इलेक्ट्रिक डिझाइन तत्त्वावर आधारित आकर्षक स्टायलिंग असेल, ज्यामधून गतीशीलता डिझाइन आणि जीवनशैलीमधील नवीन पैलू दिसून येतात. ही डिझाइन शैली लक्षवेधक आकर्षकता निर्माण करण्यासोबत ट्रेण्डसेटिंग व उत्साही असण्याची अपेक्षा आहे.
तसेच, वेईकलची अभियांत्रिकी आणि सर्वोत्तम वैशिष्ट्ये कंपनीचे अद्वितीय तत्त्व ‘थॉटफुल इंजीनिरिंग’ म्हणजेच ‘विचारशील अभियांत्रिकी’ यावर आधारित असतील. या तत्त्वामधून आकर्षक डिझाइन, प्रगत आयओटी-आधारित कनेक्टीव्हीटी आणि विविध सर्वोत्तम वैशिष्ट्ये असण्याची खात्री मिळते, ज्यामधून अद्वितीय आरामदायीपणा, सोयीसुविधा व सुरक्षितता मिळेल, तसेच इलेक्ट्रिक गतीशीलतेमध्ये नवीन मापदंड स्थापित होईल. या दृष्टिकोनाची खासियत म्हणजे कायनेटिक ग्रुपचा अद्वितीय वारसा, ज्याने दशकांपासून भारतातील स्कूटर्सच्या उत्क्रांतीला आकार दिला आहे. कायनेटिक ग्रीन आपला वारसा आणि सखोल ग्राहक अभिप्रायांना ध्यानात घेत इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या युगामध्ये उपयुक्तता आणि कार्यक्षमतेला नव्या उंचीवर देखील घेऊन जात आहे. टोरिनो डिझाइनसोबत सहयोगाने डिझाइन करण्यात येणारी ई-स्कूटर्स पुढील वर्षापर्यंत बाजारपेठेत लाँच होण्याची अपेक्षा आहे.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “आम्ही कायनेटिक ग्रीनच्या अधिपत्याखालील बॉर्न-इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या आगामी श्रेणीबाबत खूप उत्सुक आहोत. ईव्ही क्षेत्रात दशकाहून अधिक काळाच्या अनुभवासह आम्ही इलेक्ट्रिक गतीशीलता डिझाइन व रचनेमध्ये दृढ कौशल्य निर्माण केले आहे, ज्याला शक्तिशाली ईव्ही आरअँडडी व फास्ट चार्जिंगसाठी धोरणात्मक सहयोग, बॅटरी स्वॅपिंग आणि प्रमुख सॉफ्टवेअर-संचालित प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सचे पाठबळ आहे. आम्हाला भारतात नुकतेच लाँच करण्यात आलेल्या आमच्या ई-लुना आणि ई-स्कूटर्सना मिळालेल्या यशाचा आनंद होत आहे. या सुरूवातीच्या टप्प्यात ८०,००० हून अधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री, देशामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींसाठी शक्तिशाली उत्पादन पायाभूत सुविधा आणि ४०० एक्सक्लुसिव्ह डिलर्सच्या नेटवर्कची निर्मिती यांसह आम्ही आमच्या इलेक्ट्रिक दुचाकी व्यवसायाचे झपाट्याने विस्तारीकरण करण्यास सज्ज आहोत. इटलीमधील डिझाइन व अभियांत्रिकीतील जागतिक अग्रणी टोरिनो डिझाइनसोबत आमच्या डिझाइनला एकत्र करत आमचा आगामी महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्सना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मनसुबा आहे. ‘थॉटफुल इंजीनिअरिंग’ तत्त्वावर निर्माण करण्यात आलेल्या पायासह आमच्या आगामी स्कूटर्समध्ये उत्साही व भविष्यवादी स्टायलिंग शैलीचा समावेश असेल, ज्यामध्ये नाविन्यता व उद्देशाचे संयोजन असेल, ज्यामधून ग्राहकांना आनंददायी मालकीहक्क अनुभव मिळेल.”
कायनेटिक ग्रीन भारतातील इलेक्ट्रिक वेईकल उत्क्रांतीमध्ये अग्रस्थानी आहे. कंपनीने ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक तीन-चाकींच्या श्रेणीसह २०१६ मध्ये आपला ईव्ही प्रवास सुरू केला. २०२२ मध्ये दुचाकी क्षेत्रात प्रवेश केला आणि २०२४ मध्ये आयकॉनिक ई-लुना लाँच केली. ई-लुनाला बी२सी आणि बी२बी विभागांमध्ये मोठे यश मिळाले आहे, जी भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी अनुकूल एकमेव ईव्ही आहे. या प्रतिसादामधून प्रेरणा घेत कायनेटिक ग्रीनने आता आपला संपन्न वारसा आणि भविष्यासाठी सुसज्ज नाविन्यता, डिझाइन व तंत्रज्ञानाला एकत्र करत आपला इलेक्ट्रिक दुचाकी पोर्टफोलिओ विस्तारित करण्याकरिता महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
कायनेटिक ग्रीनने अगदी योग्य वेळी इलेक्ट्रिक दुचाकी व्यवसायाचे आक्रमक विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे, जेथे देशामध्ये झपाट्याने इलेक्ट्रिक स्कूटर्सचा अवलंब वाढत आहे. २०२४-२५ दरम्यान भारतात १.१५ दशलक्ष इलेक्ट्रिक दुचाकी विकण्यात आल्या, ज्यापैकी १.०३ दशलक्ष (जवळपास ९० टक्के) ई-स्कूटर्स होत्या. पुढील ५ वर्षांमध्ये भारतात ई-स्कूटर बाजारपेठ झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे, तसेच ई-स्कूटरचे प्रमाण १५ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत* वाढण्याची अपेक्षा आहे. अपेक्षित आहे की, २०३० पर्यंत भारतातील ई-स्कूटर बाजारपेठेचा आकार ४०,००० कोटी रूपये असेल. कायनेटिक ग्रीन आपले ईव्ही आरअँडडी व अभियांत्रिकी कौशल्य, भारतातील ईव्ही ग्राहकांचे सखोल अभिप्राय, प्रबळ उत्पादन व पुरवठा साखळी परिसंस्था, मान्यताकृत कायनेटिक ग्रीन वारसा ब्रँड आणि देशभरातील डिलरशिप नेटवर्कसह या संधीचा फायदा घेण्यास उत्तमरित्या सज्ज आहे. वैविध्यपूर्ण ई-लुना, तसेच ई-स्कूटर्सची श्रेणी कंपनीला या संधीचा सर्वसमावेशकपणे व आक्रमकपणे फायदा घेण्यास सज्ज करतील.