- स्मार्ट टीएफटी-आधारित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आणि अॅनालिटिक्स ईव्ही युजर अनुभवामध्ये क्रांती घडवून आणणार
पुणे, १० डिसेंबर २०२४: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी उत्पादक कंपनीला जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडची उपकंपनी आणि रिलायन्स ग्रुपचा भाग असलेल्या जिओथिंग्ज सोबत टेक्निकल सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा सहयोग कायनेटिक ग्रीनच्या विद्यमान व आगामी इलेक्ट्रिक वेईकल मॉडेल्ससाठी कनेक्टिव्हीटी आणि युजर अनुभवांमध्ये वाढ करत शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्स प्रगत करण्यामधील मोठा टप्पा आहे.
या सहयोगाचा भाग म्हणून कायनेटिक ग्रीन नाविन्यपूर्ण स्मार्ट टीएफटी-आधारित डिजिटल, कनेक्टेड डिस्प्ले प्लॅटफॉर्मचे अनावरण करत आहे, ज्याचा त्यांच्या लोकप्रिय ई२डब्ल्यू (इलेक्ट्रिक दुचाकी) प्लॅटफॉर्म्सवरील ग्राहकांसाठी राइडिंग अनुभवामध्ये क्रांती घडवून आणण्याचा मनसुबा आहे. या प्रगत डिस्प्लेमध्ये आवश्यक वैशिष्ट्ये आहेत, जसे रिअल-टाइम नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल्ससाठी नोटिफिकेशन्स आणि जवळच्या चार्जिंग स्टेशन्सबाबत माहिती. या घटकांचा समावेश करत प्लॅटफॉर्म राइडर्सना अधिक कनेक्टेड व सुखकर प्रवासाचा आनंद घेण्यास सक्षम करतो, तसेच प्रत्येक राइड कार्यक्षम व उत्साहवर्धक करतो. शहरातील रस्त्यांवरून नेव्हिगेट करायचे असो किंवा लांबच्या प्रवासाचे नियोजन करायचे असो हे अत्याधुनिक तंत्रज्ञान युजर्सना सोईस्करपणे महत्त्वपूर्ण माहिती देत सक्षम करते.
तसेच, हा सहयोग बिल्ट-इन ब्ल्यूटूथ आणि टेलिमॅटिक्स-सक्षम डिवाईस यांसारख्या प्रमुख वैशिष्ट्यांना सादर करतो, ज्यामधून विनासायास कनेक्टीव्हीटीची खात्री मिळते. यामुळे वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोन्सच्या आवश्यक वेईकल फंक्शन्सवर देखरेख ठेवण्यासोबत व्यवस्थापन करू शकतात. राइडर्सना नेव्हिगेशन, स्पीड, बॅटरी चार्ज स्थिती आणि डिस्टन्स टू एम्प्टी याबाबत माहिती मिळू शकते, ज्यामधून उच्च युजर-अनुकूल अनुभव मिळतो. एकीकृत सोल्यूशन जिओच्या प्रगत हार्डवेअरचा फायदा घेते, ज्याला प्रबळ ४जी कनेक्टीव्हीटीचे अधिक पाठबळ आहे.
हे नाविन्यपूर्ण एकीकरण स्मार्ट वेईकल टेक्नॉलॉजीमधील मोठ्या सुधारणेला सादर करते, जेथे उपयुक्तता, सुरक्षितता आणि कनेक्टीव्हीटीला प्राधान्य देण्यात आले आहे.
कायनेटिक ग्रीनच्या सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, ”कायनेटिक ग्रीनचा जिओथिंग्जसोबतच्या सहयोगामधून ईव्ही तंत्रज्ञान, नाविन्यता आणि पर्यावरणीय स्थिरतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. या सहयोगाचा फायदा घेत आमचा प्रगत सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल सोल्यूशन्स वितरित करण्याचा मनसुबा आहे, जे इलेक्ट्रिक वेईकल युजर अनुभवांमध्ये अधिक उत्साहाची भर करतात. आमचा राइडर्सना विनासायास कनेक्टीव्हीटी, सर्वोत्तम वैशिष्ट्ये, सुरक्षितता आणि अपवादात्मक सोयीसुविधा देण्याचा मनसुबा आहे. आम्ही भावी सोल्यूशन्ससह एआय-आधारित ड्रायव्हर माहिती व राइड असिस्टण्स वैशिष्ट्ये निर्माण करत राहू, ज्यामधून आमची प्रबळ ईव्ही उत्पादने आणि प्लॅटफॉर्म्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असण्याची खात्री मिळेल.”
जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे अध्यक्ष श्री. आशिष लोढा म्हणाले, ”आम्हाला नाविन्यपूर्ण आणि शाश्वत इलेक्ट्रिक गतीशीलता सोल्यूशन्स वितरित करण्यासाठी कायनेटिक ग्रीनसोबतच्या आमच्या सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा दीर्घकालीन सहयोग भारतात इलेक्ट्रिक गतीशीलतेला चालना देण्याच्या दिशेने मोठी झेप आहे. सहयोगाने, आम्ही अधिक शाश्वत भविष्याला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
कायनेटिक ग्रीन आणि जिओथिंग्ज या उदयोन्मुख सहयोगाला सुरूवात करत असताना दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वेईकल तंत्रज्ञानामधील प्रगतीमध्ये अग्रस्थानी राहण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे अधिक कनेक्टेड, कार्यक्षम व शाश्वत असलेले भविष्य घडवण्याचा मार्ग सुकर होईल.