पुणे, २६ ऑगस्ट २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकी वाहनांच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने आज देशातील प्रमुख एनबीएफसी व मायक्रो फायनान्स इन्स्टिटयूशन आयआयएफल समस्त फायनान्स लिमिटेड (आयएसएफएल) सोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. या सहयोगाचा शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेतील ग्राहकांना संघटित व स्पर्धात्मक वित्तपुरवठा सोल्यूशन्स प्रदान करून इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सहजसाध्य करण्याचा मनसुबा आहे.

हा उपक्रम सप्टेंबर २०२५ मध्ये सुरू होईल, जो सणासुदीच्या काळात नवीन वाहनांसाठी ग्राहकांमध्ये वाढत्या मागणीचा फायदा घेईल. या सामंजस्य करारांतर्गत आयएसएफएल कायनेटिक ग्रीनच्या संपूर्ण इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकी वाहनांसाठी मान्यताप्राप्त वित्तपुरवठादार (फायनान्शियर) म्हणून काम करेल आणि बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या १३ राज्यांमधील ३७० शाखांच्या विस्तृत वित्तपुरवठा नेटवर्कच्या माध्यमातून रिटेल फायनान्सिंग सोल्यूशन्स देईल, ज्यामुळे शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फायनान्सिंग सोल्यूशन्स उपलब्ध होतील.
या सहयोगामध्ये कायनेटिक ग्रीनच्या उत्पादनांसाठी २००,००० हून अधिक पूर्व-पात्र आयएसएफएल ग्राहकांपर्यंत लक्ष्यित पोहोचचा समावेश आहे, ज्याला संयुक्त विपणन उपक्रम आणि को-ब्रँडेड प्रचार मोहिमांचे पाठबळ आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक गतीशीलता क्षेत्रता दृश्यमानता वाढेल आणि वित्तपुरवठा उपलब्धता प्रबळ होईल.
कायनेटिक ग्रीन देशभरातील ६०० हून अधिक डिलर्सचे मजबूत नेटवर्क आणि १५०,००० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने विकण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्डसह या सहयोगाला बळकटी देते. त्याच्या प्रमुख श्रेणीमध्ये ई-लुना ई२डब्ल्यू सारखी अत्यंत यशस्वी व सुस्थापित उत्पादने समाविष्ट आहेत, ज्यात बी२सी आणि बी२बी ग्राहकांसाठी परिपूर्ण बहुउपयोगी वेईकल प्लॅटफॉर्म, प्रगत वैशिष्ट्ये व सोयीसुविधा असलेली उच्च-कार्यक्षम ई-झुलु ई२डब्ल्यू स्कूटर आणि ऑपरेशनल उत्कृष्टता प्रदान करणारी ई३डब्ल्यू कार्गो व प्रवासी वाहनांची मजबूत सफर मालिका आहे. हा सहयोग व्यक्तींना सहजपणे शाश्वतपूर्ण गतीशीलतेचा अवलंब करण्यास सक्षम करेल. इलेक्ट्रिक वाहने अधिक सहजसाध्य व वैशिष्ट्यांसह सुसज्ज करत आम्ही अधिकाधिक व्यक्तींना शाश्वत परिवहन सोल्यूशन्सचा अवलंब करण्यास आणि भारतातील लास्ट माइल कनेक्टीव्हीटीचे डिकार्बनायझेशन करण्यास प्रेरित करण्याची आशा करतो.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्जा फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “आम्हाला संपूर्ण भारतात शुद्ध गतीशीलता सोल्यूशन्सच्या अवलंबलनाला गती देण्यासाठी सर्वोत्तम रिटेल फायनान्सिंगमधील अग्रणी आयआयएफएल समस्त फायनान्स लिमिटेडसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. कायनेटिक ग्रीनच्या दर्जात्मक इलेक्ट्रिक वेईकल्स आणि आयएसएफएलच्या प्रबळ फायनान्सिंग प्लॅटफॉर्मला एकत्र करत आम्ही विशेषत: अर्ध-शहरी व ग्रामीण बाजारपेठांमधील व्यक्ती व व्यवसायांसाठी आर्थिक तफावतीला दूर करण्याच्या माध्यमातून शाश्वत परिवहनाचा अवलंब अधिक सोपा करत आहोत. या सहयोगामधून पर्यावरणीय स्थिरता व सर्वसमावेशक विकासाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, तसेच आम्ही देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वेईकल्स अधिक प्रमाणात धावण्याला गती देण्यासाठी सहयोगाने काम करत आहोत.”
आयआयएफएल समस्त फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वेंकटेश एन. म्हणाले, “आयआयएफएल समस्तमध्ये आमचे सर्वसमावेशक वित्तपुरवठा सोल्यूशन्सच्या माध्यमातून वंचित समुदायांना सक्षम करण्याचे मिशन राहिले आहे. कायनेटिक ग्रीनसोबतचा हा सहयोग शाश्वत गतीशीलता व सहजसाध्य कर्जसुविधेला एकत्र करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इलेक्ट्रिक दुचाकी व तीन-चाकींसाठी सोपा व किफायतशीर वित्तपुरवठा देत आमचा भारतातील अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमध्ये हरित परिवहनाला चालना देण्यासोबत आर्थिक सक्षमीकरणाला पाठिंबा देण्याचा देखील मनसुबा आहे. हा उपक्रम आमच्या हरित वित्तपुरवठा पोर्टफोलिओला अधिक दृढ करतो, ज्यामुळे जबाबदार व प्रभावी कर्जसुविधेप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.”
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी दोन्ही कंपन्यांसाठी महत्त्वाचा टप्पा आहे, जेथे दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वेईकल्सच्या अवलंबनाला गती देण्यासाठी आणि सरकारच्या शुद्ध, हरित परिवहनाच्या दृष्टिकोनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सहयोग केला आहे. या सहयोगासह कायनेटिक ग्रीनने भारतातील ईव्ही उद्योगामधील आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे, तसेच सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करत आहे, ज्यामध्ये उत्पादन, वितरण व वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. यामुळे गतीशीलता क्षेत्राच्या माध्यमातून अर्थपूर्ण व शाश्वत परिवर्तनाला चालना मिळाली आहे.