विस्तारित पोहोच आणि सक्षम जाळ्यासह ‘कोटक’ भारताच्या उद्योजकीय भावनेप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करतो.
मुंबई, १० ऑक्टोबर २०२५ : कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (केएमबीएल/कोटक) आज ‘कोटक बिझलॅब्स अॅक्सिलरेटर प्रोग्राम’च्या सीझन-२ च्या लाँचची घोषणा केली. हा कार्यक्रम ‘कोटक’च्या प्रमुख ‘सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) उपक्रमाचा एक प्रभावी विस्तार आहे. यामध्ये सुरुवातीच्या महसूल टप्प्यातील स्टार्टअप्सना सखोल मार्गदर्शन, बाजारपेठेतील प्रवेश आणि उत्प्रेरक निधीसह पाठिंबा दिला जातो, त्या अनुषंगाने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणाऱ्या सीझन २ मध्ये संपूर्ण भारतातील ७५ हून अधिक स्टार्टअप्सना सहाय्य केले जाणार आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान (डीप-टेक) शाश्वतता, स्वच्छ ऊर्जा, फिनटेक, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान (एडटेक), कृषी तंत्रज्ञान (अॅग्रीटेक) आणि आरोग्य तंत्रज्ञान (हेल्थटेक) आदींवर सतत लक्ष केंद्रित केले जाईल. हा उपक्रम उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि मध्य भारतात आपल्या राष्ट्रीय पाऊलखुणा वाढवत असून, आयआयटी दिल्लीच्या ‘फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर’ला (एफआयटीटी) नवीन सक्षम सहाय्यक म्हणून आमंत्रित करतो, जो आयआयएमए व्हेंचर्स, एनएसआरसीईएल – आयआयएम बंगळूरु आणि टी-हबबरोबर जोडलेला आहे. उपक्रमाची (व्हेंचर्स) निवड आणि गतीवर्धन सहाय्यकांद्वारे व्यवस्थापित केले जाते.

पहिला टप्पा : प्रत्यक्ष परिणाम साधणे
पहिल्या वर्षातच, कोटक बिझलॅब्सने भारतातील स्टार्टअप क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे:
- देशभरातून १,५००+ अर्ज प्राप्त झाले
- ५००+ संस्थापकांनी बाह्य आणि ज्ञान सत्रांद्वारे सहभाग घेतला
- ५५ स्टार्टअप्सना संरचित मार्गदर्शन आणि वाढीसाठी गती दिली
- ३२ उपक्रमांना निधीद्वारे पाठिंबा दिला, ज्यामुळे त्यांच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना मिळाली
- १४ शहरांमध्ये रोड शो, अनौपचारिक सामाजिक उपक्रम, कार्यशाळा इत्यादींद्वारे कमी संपर्कात सहभाग.
टप्पा २ : दुसऱ्या वर्षात, कोटक बिझलॅब्स या उपक्रमाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे:
- ८००+ स्टार्टअप्सना बाह्य आणि ज्ञान सत्रांद्वारे सहभागी करून घेण्याची अपेक्षा आहे
- ७५+ स्टार्टअप्सना संरचित मार्गदर्शन आणि वाढीसह गती मिळण्याची अपेक्षा आहे
- ६०+ उपक्रमांना निधीद्वारे पाठिंबा दिला जाईल, ज्यामुळे त्यांच्या वाढीच्या पुढील टप्प्याला चालना मिळेल
- २०+ शहरांमध्ये रोड शो, अनौपचारिक सामाजिक उपक्रम, कार्यशाळा इत्यादींद्वारे कमी संपर्कात सहभाग.
 ‘कोटक नेहमीच भारतातील उद्योजकीय योजनांना पाठिंबा देण्यावर विश्वास ठेवतो, हे केवळ महानगरांमध्येच नाही तर टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये जिथे कल्पकता भरभराटीला येते,’ असे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे ‘सीएसआर’ आणि ‘ईएसजी’ (पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन) विभाग प्रमुख हिमांशू निवसरकर म्हणाले. ‘कोटक बिझलॅब्स अॅक्सिलरेटर प्रोग्रामच्या सीझन-२’सह, आम्ही मोठे स्वप्न पाहण्याचे आणि धाडस करणाऱ्या संस्थापकांप्रती आमची वचनबद्धता वाढवत आहोत,’ असेही त्यांनी नमूद केले.
 ‘कोटक बिझलॅब्स ही आमची एकप्रकारे जे बोलतो, ते कृतीत आणण्याची पद्धत आहे, भारताचे भविष्य खरोखर घडवू शकणाऱ्या धाडसी स्वप्नांना बळकटी देण्याचे हे एक ध्येय आहे,’ असे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडचे अध्यक्ष – समृद्ध, एनआरआय आणि बिझनेस बँकिंगचे प्रमुख आणि मुख्य विपणन अधिकारी रोहित भसीन म्हणाले. ‘आम्हाला विश्वास आहे की जेव्हा तुम्ही योग्य कल्पनांना योग्य हेतूने पाठिंबा देता तेव्हा चमत्कार घडतो. हीच ‘हौसला है तो हो जाएगा’ची भावना आहे.’
‘एनएसआरसीईएल’चे सीईओ आनंद श्री गणेश म्हणाले, की ‘कोटक बिझलॅब्सच्या दुसऱ्या सीझनद्वारे भारताच्या गतिमान स्टार्टअप परिसंस्थेला सक्षम करण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेबरोबर पुन्हा एकदा भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. विविध क्षेत्रातील आशादायक स्टार्टअप्सना सखोल मार्गदर्शन, बाजारपेठेतील प्रवेश आणि उत्प्रेरक निधी प्रदान करून, हा उपक्रम महानगरांव्यतिरिक्त टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये परिवर्तनकारी नवकल्पनांना प्रेरणा देतो. ”एनएसआरसीईएल’मध्ये, आमचे ध्येय भारताच्या विकासाला चालना देणारे प्रभावी उपाय तयार करणाऱ्या धाडसी उद्योजकांना पोषण देण्याच्या कोटकच्या दृष्टिकोनाशी थेट जुळते.’