कोटक महिंद्रा बँकेच्‍या सीएसआर उपक्रमांमुळे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्‍ये कर्करोग निदान क्षमता दुप्‍पट वाढली

News Service

नवीन पीईटी-सीटी स्‍कॅनर प्रतिक्षा वेळ कमी करते आणि प्रगत कर्करोग केअर उपलब्‍धता वाढवते

मुंबई, मे १४, २०२५ – कर्करोग केअर वाढवण्‍याच्‍या दिशेने मोठा पुढाकार घेत कोटक महिंद्रा बँकेने (‘केएमबीएल’ / ‘कोटक’) आपल्‍या कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, परेल, मुंबई येथील निदान क्षमता अपग्रेड केल्‍या आहेत. बँकेने अत्‍याधुनिक पीईटी-सीटी स्‍कॅनरची खरेदी व इन्‍स्‍टॉलेशनसाठी निधीसाह्य केले आहे. या स्‍कॅनरमुळे सध्‍याच्‍या २० हून अधिक रूग्‍णांवरून ४० हून अधिक रूग्‍णांपर्यंत हॉस्पिटलची दैनंदिन स्‍कॅन क्षमता दुप्‍पट होईल.

हे प्रगत हायब्रिड इमेजिंग तंत्रज्ञान कर्करोगाचे लवकर निदान, उपचार मूल्‍यांकन आणि वारंवार निरीक्षणासाठी महत्त्वाचे आहे, ज्‍यामुळे वेळेवर व अचूक निदानाची खात्री मिळेल. दररोज होणाऱ्या ८०-१०० पीईटी सीटी स्कॅन्‍सपैकी जवळपास ६० टक्‍के स्‍कॅन अत्यंत सवलतीच्या दरात (भारतातील सर्वात कमी आणि काही पूर्णपणे मोफत) दिले जातात, त्यामुळे कोटकच्या मदतीमुळे रुग्णांचा प्रतिक्षा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि प्रगत कर्करोग निदानाची उपलब्धता सुधारेल.

कोटक महिंद्रा बँकेचे सीएसआर व ईएसजी प्रमुख हिमांशू निवसरकर म्‍हणाले, “या उपक्रमामधून भारतातील आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टमला, विशेषत: कर्करोग केअर सारख्‍या महत्त्वपूर्ण विभागांना प्रबळ करण्‍याप्रती कोटकची सुरू असलेली कटिबद्धता दिसून येते. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्‍ये नवीन पीईटी-सीटी स्‍कॅनरच्‍या इन्‍स्‍टॉलेशनला पाठिंबा देत आम्‍ही अधिकाधिक रूग्‍णांसाठी वेळेवर व अचूक निदान सुविधा देण्‍याची आशा करतो, जे त्‍यांच्‍या उपचार प्रवासामधील महत्त्वपूर्ण पहिले पाऊल आहे.”

टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सीएस प्रमेश म्‍हणाले, “टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्‍ये आमच्‍या सर्व रूग्‍णांच्‍या वतीने आम्‍ही कोटक महिंद्रा बँकेचे आम्‍हाला आमच्‍या जुन्‍या पीईटी-सीटी स्‍कॅनरला बदलण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी त्‍यांनी वेळेवर दिलेल्‍या पाठिंब्‍याकरिता आभार व्‍यक्‍त करतो, जेथे आधीच्या पीईटी-सीटी स्‍कॅनरची क्षमता समाप्‍त झाली होती आणि हे साह्य अगदी योग्‍य वेळी करण्‍यात आले आहे. नवीन पीईटी-सीटी स्‍कॅनर अधिक कार्यक्षम आहे, दररोज अधिक स्‍कॅन करू शकतो आणि आम्‍हाला रूग्‍णांना सर्वोत्तमपणे सेवा देण्‍यास मदत करतो. यासाठी आम्‍ही कोटक आणि त्‍यांच्‍या सीएसआर टीमचे ऋणी आहोत. यासारखे सपोर्ट आम्‍हाला रूग्‍णांना दर्जेदार केअर देण्‍यास मदत करतात, जेथे बहुतांश रूग्‍णांवर अत्‍यंत सवलतीच्‍या दरात आणि कधी-कधी पूर्णपणे मोफत उपचार केले जातात.”

सीएसआर प्रकल्‍पामध्‍ये पीईटी-सीटी रूमच्‍या पायाभूत सुविधांमधील सर्वसमावेशक अपग्रेड्सचा देखील समावेश आहे, जसे नवीन फिक्‍स्‍चर्स, फ्लोअरिंग, कंट्रोल कन्‍सोल्‍स, एलईडी ग्‍लास पॅनेल्‍स आणि सुधारित सीटिंग क्षमता, जे सर्व अॅटॉमिक एनर्जी रेग्‍युलेटरी बोर्ड (एईआरबी) नॉर्म्‍सनुसार आहेत. या सुधारणा टाटा मेमोरिअल हॉस्पिटलला अधिकाधिक रूग्‍णांना सामावून घेण्‍यास आणि ऑपरेशनल कार्यक्षमता सानुकूल करण्‍यास सक्षम करेल. तसेच, भारतात सहजसाध्य व समान आरोग्‍यसेवा प्रदान करण्‍याप्रती आपली कटिबद्धता कायम राखत कोटक महिंद्रा बँकेने आपल्‍या सीएसआर उपक्रमांतर्गत वाराणसीमधील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल केंद्र महामना पंडित मदन मोहन मालवीय कॅन्‍सर सेंटर (एमपीएमएमसीसी हॉस्पिटल)साठी आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button