मुंबई –जगातील नंबर 1 प्रीमियम मोटरसायकल ब्रँड असलेल्या केटीएमने मुंबईत केटीएम कप सीझन 3 च्या पहिल्या राऊंडसह यशस्वी आणि उत्साहपूर्ण सुरुवात केली. ही स्पर्धा भारतातील सर्वात मोठी सिंगल-मेक रेसिंग चॅम्पियनशिप असून, या सीझनमधील ही पहिली राज्यस्तरीय फेरी ठरली.

या पहिल्या राऊंडमध्ये 120 हून अधिक तरुण आणि महत्त्वाकांक्षी रेसर्सनी सहभाग घेतला. ज्यात रायडर्सनी विविध वेळेनुसार आयोजित राउंड्स आणि स्किल टेस्टमध्ये आपली राईडिंग क्षमता दाखवली. या कार्यक्रमाला केटीएम प्रेमी आणि मोटरस्पोर्ट चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे परफॉर्मन्स रायडिंगसाठी मुंबई हे महत्त्वाचे केंद्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

दिवसभर चाललेल्या रोमांचक रेसनंतर सर्वोत्तम रायडर्सनी पुढील फेरीसाठी आपली जागा निश्चित केली. यामुळे ते केटीएम कप जिंकण्याच्या आणखी एक पाऊल जवळ पोहोचले.
मुंबई राउंडचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केटीएम स्टंट रायडर रोक बागोरोस यांनी थरारक स्टंट सादरीकरण केले. त्यांच्या जबरदस्त प्रदर्शनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि हा रेस वीकेंड सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
या उत्साहात आणखी भर घालत, मोटो जीपीचे दिग्गज डॅनी पेड्रोसा क्वालिफायर आणि अंतिम फेरीदरम्यान रायडर्सशी संवाद साधणार आहेत. तसेच, सीझन 3 चे विजेते रायडर्सना ऑस्ट्रिया ग्रँड प्रिक्स पाहण्यासाठी सर्व खर्चासह सहल मिळणार असून, त्यात पिट एरियामध्ये प्रवेश आणि मॅटिगोफेन येथील केटीएम मोटोहॉल भेट यांचा समावेश असेल.
केटीएम कप भारतातील रेसिंगला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यात आयोजित स्पर्धा, प्रोफेशनल प्रशिक्षण आणि समुदायाशी संवाद यांचा समावेश आहे. येत्या काही आठवड्यांत 4 शहरांमध्ये राऊंड्स होणार असून, केटीएम कप सीझन 3 रायडर्स आणि चाहत्यांसाठी थरारक आणि रोमांचक अनुभव ठरणार आहे.