मुंबई, जानेवारी ६, २०२६: न्युवोको विस्टास कॉर्प. लि. या भारतातील विश्वसनीय बांधकाम सामग्री कंपनीने न्युवोको कॉंक्रीटो टाय शील्डच्या लॉंचची घोषणा केली आहे. हे उच्च कार्यक्षमता असलेले रेडी-मिक्स काँक्रीट असून बांधकामाचा टिकाऊपणा आणि आयुष्य वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. न्युवोकोच्या प्रमुख काँक्रीटो पोर्टफोलिओचा भाग असलेले न्युवोको काँक्रीटो ट्राय शील्ड हे थ्री-इन-वन टिकाऊ सोल्यूशन आहे, जे भारतातील बांधकामांचे वाढत्या पर्यावरणीय परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. बोअरवेलच्या पाण्यातील आणि किनारपट्टीच्या हवेतील क्लोराईडचे वाढते प्रमाण, शहरी प्रदूषणामुळे त्वरित होत असलेले कार्बोनेशन आणि भारतातील अनेक प्रदेशांतील सल्फेटयुक्त माती व भूगर्भातील पाणी यांच्या प्रतिकूल परिणामांचा सामना करण्यासाठी हे उत्पादन विशेषतः विकसित करण्यात आले आहे. हे पर्यावरणीय घटक बांधकाम साहित्याचा ऱ्हास करतात आणि वास्तूच्या दीर्घकालीन टिकाऊपणाचे नुकसान करतात.
न्युवोको काँक्रीटो ट्राय शील्ड तीन एकीकृत यंत्रणांच्या माध्यमातून बांधकामाला सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करते. यामध्ये क्लोराईड शील्ड सामान्य काँक्रीटच्या तुलनेत क्लोराईडचा शिरकाव ५० टक्क्यांपर्यंत कमी करते, ज्यामुळे बांधकामातील लोखंडी सळयांचे गंज लागण्यापासून संरक्षण होते. कार्बोनेशन शील्ड कार्बोनेशनचा वेग कमी करते आणि सामान्य काँक्रीटच्या तुलनेत कार्बोनेशनचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी राखून लोखंडी सळयांची सुरक्षितता टिकवून ठेवते. याला पूरक असलेले सल्फेट शील्ड बांधकामाचा पाया, बेसमेंट (तळघर) आणि मातीच्या संपर्कात येणाऱ्या भागांमध्ये सल्फेटमुळे होणारे प्रसरण आणि तडे जाण्यास प्रतिबंध करते. तसेच हे शील्ड सामान्य काँक्रीटच्या तुलनेत सल्फेट प्रसरणाचे प्रमाण ५० टक्के कमी करते.
हे तिन्ही सुरक्षा घटक एकत्रितपणे काम करून बांधकामाचा एकूण टिकाऊपणा वाढवतात आणि सामान्य काँक्रीटच्या तुलनेत वास्तूचे आयुष्य ५० टक्क्यांपर्यंत वाढवतात. या कार्यक्षमतेची पडताळणी न्युवोकोच्या कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन सेंटर (सीडीआयसी)मध्ये करण्यात आली आहे. हे केंद्र एनएबीएलद्वारे मान्यताप्राप्त आहे आणि IS 456, IS 516, ASTM C1202 व ASTM C1012/C1012M यांसारख्या टिकाऊपणाच्या मानकांनुसार चालते. तसेच, प्रगत सॉफ्टवेअर वापरून केलेल्या सिम्युलेशन्सद्वारे देखील याची पुष्टी झाली आहे. टिकाऊपणा, मजबूती आणि जीवनचक्र मूल्य यावर विशेष भर देणारे न्युवोको काँक्रीटो ट्राय शील्ड दीर्घकाळापर्यंत संरक्षण आणि शाश्वत कार्यक्षमता शोधणाऱ्या ग्राहकांसाठी विश्वासार्ह पर्याय आहे.
न्युवोको विस्टास कॉर्प. लि. च्या मार्केटिंग, इनोव्हेशन अँड सेल्स एक्सलन्सचे प्रमुख चिराग शाह म्हणाले: ”न्युवोको कॉंक्रीटो ट्राय शील्डमधून बांधकामामधील वास्तविक आव्हानांचे निराकरण करणाऱ्या नाविन्यतांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. बांधकामांची वेळेपूर्वी होणारी झीज वाढती चिंतेची बाब बनत असताना आमच्या अद्वितीय ट्राय शील्ड फॉर्म्युलेशनवर आधारित हे सोल्यूशन टिकाऊपणा वाढवण्यासाठी, वास्तूचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीचा काळ लांबणीवर टाकण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे उत्पादन कमर्शियल कॉम्प्लेक्सेस, हॉटेल्स, हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्थांसारख्या स्वतःच्या वापराच्या किंवा भाडेतत्त्वावरील मालमत्तांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे लाँच उच्च कार्यक्षम, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सुसज्ज बांधकाम सोल्यूशन्स प्रदान करण्याच्या न्युवोकोच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाला अधिक प्रबळ करते.