मुंबई, २१ मे २०२५: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कच्या नवीन संशोधनानुसार, मुंबईतील दोन-तृतीयांश (७१ टक्के) प्रोफेशनल्स म्हणतात की ते नवीन संधींचा फायदा घेण्यास उत्सुक आहेत, पण कोणते रोजगार शीर्षक किंवा उद्योगांचा शोध घ्यावा हे माहित नाही. आज मुंबई प्रोफेशनल प्रगतीला नव्या उंचीवर घेऊन जाणारे टॉप तीन मार्ग आहेत (१) काहीतरी नवीन शिकणे, (२) आत्मविश्वासाने पुढील पाऊल उचलणे आणि (३) अनुकूल असलेल्या भूमिकेचा शोध घेणे. उद्देशपूर्ण विकासासाठी महत्त्वाकांक्षा स्पष्ट असली तरी योग्य संधीचा शोध घेणे अजूनही आव्हान आहे.
लिंक्डइनने नोकरीसाधकांना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली संबंधित भूमिका शोधण्यास मदत करण्यासाठी नवीन एआय-पॉवर्ड जॉब सर्च अनुभव सादर केला आहे. प्रीमियम सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध असलेले टूल नोकरीसाधकांना शीर्षक किंवा कीवर्ड माहित नसले तरी त्यांचा उद्देश, कौशल्ये आणि ध्येये समजण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर करते, ज्यामुळे ते त्यांच्या मातृभाषेमध्ये संधींचा शोध घेऊ शकतात. भारतातील ८० टक्के प्रोफेशनल्स अनुकूलता व क्षमतेनुसार सर्वोत्तम टूल्सचा शोध घेत असताना एआय-पॉवर्ड जॉब सर्च रोजगार शोध अधिक समर्पक करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना अधिक आत्मविश्वासासह करिअर प्रगती करण्यास मदत होईल.
प्रीमियम सबस्क्रायबर्सना अतिरिक्त फायदे मिळतील, जसे मुलाखतीसाठी तयारी सारखे स्थिती-आधारित रोल प्ले आणि त्यांना लिंक्डइन लर्निंगवर मागणीत असलेली कौशल्ये निर्माण करण्यास मदत करण्यासाठी वैयक्तिकृत लर्निंग प्लॅन ‘माय करिअर जर्नी’. ते हायरिंग इनसाइट्स पाहू शकतील, तसेच हायर किती सक्रिय आहेत, ते कशाप्रकारे त्वरित प्रतिसाद देतात आणि ते अर्जांचे पुनरावलोकन करतात की नाही हे माहित करून घेऊ शकतील, ज्यामुळे त्यांना हायरिंग प्रक्रियेबाबत अधिक दृश्यमानता मिळेल.
भारतातील वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका आणि लिंक्डइन करिअर एक्स्पर्ट (India Sr. Managing Editor and LinkedIn ) निरजिता बॅनर्जी तरूण व्यावसायिकांना सर्वांपेक्षा वरचढ ठरण्यास मदत करण्यासाठी टिप्स सांगत आहेत:
● ”तुमच्या अर्जांमध्ये धोरणात्मक राहा: रोजगार शोधण्याच्या बाबतीत अथक मेहनत न घेता स्मार्टपणे काम करा. १० पैकी जवळपास ५ (४९ टक्के) व्यक्ती म्हणतात की ते अधिकाधिक रोजगारांसाठी अर्ज करतात, पण त्यांना कमी प्रतिसाद मिळत आहे* आणि हायर्सना देखील प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक ठरत आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज करण्याऐवजी धोरणात्मक व्हा. लिंक्डइनचा जॉब मॅच तुम्हाला तुमच्या कौशल्यांना अनुरूप असलेल्या भूमिका निवडण्यास मदत करतो, तसेच तुमची पात्रता काही सेकंदात कोणत्याही जॉब पोस्टिंगशी कशी जुळते हे पटकन समजून घेण्यास मदत करतो.
● एआयसह सहजपणे परिचित व्हा: कामाच्या सर्व पैलूंमध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात एकीकृत होत आहे आणि तंत्रज्ञानाबाबत अधिक जाणून घेतल्यास तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत करिअर वाढीमध्ये फायदा करू शकता. त्वरित लेखनावर लक्ष केंद्रित करायचे असो किंवा जॉब हंटिंग फॉर कॉलेज ग्रँड्स (Job Hunting for College Grads,), हाऊ टू बूस्ट युअर प्रॉडक्टिव्हीटी विथ एआय टूल्स (How to Boost Your Productivity with AI Tools) आणि द स्टेप-बाय-स्टेप गाइड टू रॉक युअर जॉब इंटरव्ह्यू (The Step-by-Step Guide to Rock Your Job Interview ) यांसारख्या मोफत कोर्सेसबाबत माहिती मिळवायची असो, ही सर्व माहिती ३० जूनपर्यंत उपलब्ध आहेत. थोडेसे ज्ञान नंतर खूप फायदेशीर ठरू शकते.
● अनुकलतेला तुमचा नवीन बीएफएफ (जिवलग मित्र) बनवा: एआय एकीकृत होत असताना कंपन्या नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेल्या आणि त्यामध्ये मानवी ज्ञानाची भर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत (स्पॉयलर: या वर्षीच्या स्किल्स ऑन द राइज (Skills on the Rise) नुसार व्यक्तींची कौशल्ये उपलब्ध आहेत).
● तुमचे नेटवर्क तयार करा: माजी विद्यार्थी, नवीन सहकारी आणि मित्रांशी संपर्क साधून तुमचे नेटवर्क वाढवण्यास संकोच करू नका. तुमचे कनेक्शन तयार करणे आणि वेळोवेळी लिंक्डइनवरील पोस्टसह सहभागी होणे यामुळे संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमम्ही लोकांच्या रडारमध्ये राहता आणि नोकरीच्या रेफरल्स व नोकरीच्या संधींबद्दल आतील माहिती मिळते.
● प्रवासाचा अवलंब करा: यशाचा मार्ग नेहमी सरळ नसतो आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे ते शोधण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो – आणि ते ठीक आहे. यादृच्छिक नेटवर्किंग इव्हेण्टला स्वीकारा, साइड प्रोजेक्ट्ससाठी स्वयंसेवा करा आणि तुमच्या टीमच्या बाहेरील एखाद्या व्यक्तीसोबत शिफारस मिळवा. आज कर्मचारीवर्गामध्ये प्रवेश करणारे प्रोफेशनल्स १५ वर्षांपूर्वीच्या तुलनेत त्यांच्या कारकिर्दीत जवळपास दुप्पट नोकऱ्या मिळविण्याच्या मार्गावर आहेत, म्हणून तुमचा वेळ घ्या, एक्सप्लोर करा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा.”