लिंक्‍डइनच्‍या २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍टमधून निदर्शनास येते की डी२सी ब्रँड्स आणि क्विस-सर्विस प्‍लॅटफॉर्म्‍स मुंबईतील ग्राहक अर्थव्‍यवस्‍थेला चालना देत आहेत

News Service

मुंबई, २९ ऑक्‍टोबर २०२५: लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने मुंबईसाठी २०२५ टॉप स्‍टार्टअप्‍स लिस्‍ट सादर केली आहे. ही लिस्‍ट व्‍यक्‍तींचे करिअर घडवू शकणा-या अशा उदयोन्‍मुख कंपन्‍यांचे वार्षिक रँकिंग आहे. कर्मचाऱ्यांची वाढ, सहभागाची आवड, रोजगाराची निवड आणि अधिक टॅलेंटचे आकर्षण यांवर विशेष लिंक्‍डइन डेटावर आधारित ही लिस्‍ट स्‍थानिक नोकरीसाधकांना शहरामधील रोजगार संधी ओळखण्‍यास मदत करू शकतात, अशी माहिती निदर्शनास आणते.

क्विक-कॉमर्स युनिकॉर्न झेप्‍टो (Zepto) (#1) मुंबई लिस्‍टमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर कम्‍फर्ट-टेक ब्रँड द स्‍लीप कंपनी (The Sleep Company) (#2) आणि स्किनकेअर मेकर पिलग्रिम (Pilgrim) (#3) यांचा क्रमांक आहे. विविध श्रेणींमध्‍ये कार्यरत असताना देखील या तिन्‍ही कंपन्‍या झपााट्याने‍ विकसित होण्‍यासोबत नवीन बाजारपेठांमध्‍ये विस्‍तारित होत आहे, ज्‍यामधून निदर्शनास येते की प्रत्‍यक्ष ग्राहक संबंध, ब्रँड नाविन्‍यता आणि कार्यचालन उत्‍कृष्‍टता हे मुंबईतील अव्‍वल कामगिरी करणाऱ्या स्‍टार्टअप्‍सचे महत्त्‍वपूर्ण फायदे आहेत.

या लिस्‍टमधून ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेसाठी केंद्र म्‍हणून मुंबईची ताकद दिसून येते. ‘क्विक इकॉनॉमी’ किराणा सामग्रीपलीकडे विस्‍तारित होत आहे, जेथे स्‍नॅबिट (Snabbit) (#7) सारखे प्‍लॅटफॉर्म्‍स हायपरलोकल होम सर्विसेस देत आहेत. नवीन डी२सी ब्रँड्स देखील प्रगती करत आहेत, जसे स्किनकेअरमध्‍ये फॉक्‍सटेल (Foxtale) (#5), केसांच्‍या आरोग्‍यामध्‍ये त्राया (Traya) (#4), ज्‍यामधून लोकप्रिय ग्राहक लेबल्‍स निर्माण करण्‍याप्रती डेटाचे पाठबळ असलेला दृष्टिकोन दिसून येतो. ई-फार्मामध्‍ये ट्रूमेड्स (Truemeds) (#6), एआय-क्‍लाऊड पायाभूत सुविधेमध्‍ये नेयसा (Neysa) (#8) आणि संपत्ती व्‍यवस्‍थापनामध्‍ये डिझर्व्‍ह (Dezerv) (#9) अशा लिस्‍टच्‍या वैविध्‍यतेमधून मुंबई बहुआयामी स्‍टार्टअप केंद्रामध्‍ये बदलत असल्‍याचे दिसून येते. यंदाच्‍या लिस्‍टमधून तीन नवीन प्रवेशकांसह शहरातील स्‍टार्टअप परिसंस्‍थेमध्‍ये स्थिर वाढ दिसून येते.

यंदाच्‍या लिस्‍टबाबत मत व्‍यक्‍त करत लिंक्‍डइन करिअर तज्ञ आणि लिंक्‍डइन इंडिया न्‍यूजच्‍या वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादिका निराजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and Sr. Managing Editor, LinkedIn India News) म्‍हणाल्‍या, ”मुंबईतील स्‍टार्टअप क्षेत्र ग्राहकांबाबत सखोल समजमधून दिसून येते. या लिस्‍टमधील कंपन्‍या विश्वसनीय ब्रँड्स निर्माण करण्‍याच्‍या कलेमध्‍ये निपुण आहेत आणि सानुकूल ग्राहक केअर सेवा वितरित करत आहेत. व्‍यावसायिकांसाठी ही लिस्‍ट ब्रँड-निर्मिती, ग्राहक-केंद्रित तंत्रज्ञानामध्‍ये कौशल्‍ये विकसित करण्‍याची, तसेच भारतातील सर्वात गतीशील बाजारपेठेमध्‍ये कार्यसंचालन वाढवण्‍याची स्‍पष्‍ट संधी देते. ते या लिस्‍टचा फायदा घेत शहरामधील उत्‍पादन-बाजारपेठेला शाश्वत विकासात बदलू शकणाऱ्या कंपन्‍यांना ओळखू शकतात.”
मुंबईमधील २०२५ लिंक्‍डइन टॉप स्‍टार्टअप्‍सची संपूर्ण लिस्‍ट पुढीलप्रमाणे:

  1. झेप्‍टो (Zepto)
  2. द स्लीप कंपनी (The Sleep Company)
  3. पिलग्रिम (Pilgrim)
  4. त्राया (Traya)
  5. फॉक्‍सटेल (Foxtale)
  6. ट्रूमेड्स (Truemeds)
  7. स्‍नॅबिट (Snabbit)
  8. नेयसा (Neysa)
  9. डिझर्व्‍ह (Dezerv)
  10. पॉकेट एफएम (Pocket FM)

लिंक्‍डइन टॉप स्‍टार्टअपमध्‍ये रोजगार कसा मिळवावा यासंदर्भात निराजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee) यांच्‍याकडून काही टिप्‍स:
● फक्‍त कोणाला कामावर ठेवत आहे हे न पाहता स्टार्टअप्स कुठे वाढत आहेत याचा मागोवा घ्या: दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत १४ नवीन कंपन्या एका विशिष्ट ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्या. तुम्हाला ते जॉब बोर्डमध्ये दिसणार नाही. लवकर गती ओळखण्यासाठी निधी, उत्पादन लाँच आणि बाजारपेठेतील विस्तार पहा.
● भावी व्‍यवस्‍थापकांचे मूल्‍यांकन कराल तसे संस्‍थापकांचे देखील मूल्‍यांकन करा: उच्‍च विकसित स्‍टार्टअप्‍समध्‍ये नेतृत्‍व शीर्षकापेक्षा तुमच्‍या विकासाला निर्धारित करते. संस्‍थापक टीम्‍स कशाप्रकारे तयार करतात, संवाद साधतात आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कायम ठेवतात हे पाहण्‍यासाठी लिंक्‍डइनचा वापर करा. प्रचारापेक्षा विश्वास आणि सुस्‍पष्‍टता महत्त्वाचे आहे.
● फक्‍त नाविन्‍यता आणणाऱ्या नाही तर शिस्‍तबद्धतेचे पालन करणाऱ्या व्‍यवसाय मॉडेल्‍सचा शोध घ्‍या: या वर्षीच्‍या टॉंप स्‍टार्टअप्‍सनी नाविन्‍यतेसह अंमलबजावणीला प्राधान्‍य दिले आहे. क्विक कॉमर्स नवीन श्रेणींमध्‍ये प्रवेश करत आहेत, एआय पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, फिनटेक सखोलतेचे निराकरण करत आहेत. महत्त्वाकांक्षा आणि ऑपरेशनल क्षमतेचे संयोजन आहे अशा स्‍टार्टअप्‍सना प्राधान्‍य द्या.
● समस्‍यांचे निराकरण करणाऱ्या क्षेत्रांची निवड करा: यंदा टॉप स्‍टार्टअप्‍स तत्‍परता, गुंतागूंती किंवा विश्वासाचे निराकरण करत आहेत. साधने बदलतात, पण समस्‍येचे निराकरण करणे हे खरे आव्‍हान आहे. तुम्‍हाला कंपनी सामना करत असलेली समस्‍या समजली तर तुम्‍ही नेहमी समर्पकं राहाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button