हंगामी हवामान बदलादरम्‍यान रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे व्‍यवस्‍थापन

News Service

पावसाळ्यामध्‍ये छतावर पडणाऱ्या पावसाच्‍या पाण्‍याचा आवाज, अचानक पडणाऱ्या पावसाच्‍या सरी, पाण्‍याच्‍या प्रवाहामधून कागदी बोट वाहून नेण्‍याचा आनंद आणि घरातील बाल्‍कनीमध्‍ये गरमागरम स्‍नॅकचा आस्‍वाद घेण्‍याचा आनंद अद्वितीय असतो. पावसाळा कडाक्‍याच्‍या उन्‍हाळ्यापासून दिलासा देतो, तसेच जुन्‍या आठवणींना जागृत देखील करतो. पण, मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी हा ऋतू अद्वितीय आव्‍हाने देखील घेऊन येतो, ज्‍यामुळे अधिक खबरदारी घेण्‍याची गरज भासू शकते. हंगामी व व्‍हायरल संसर्गांच्‍या वाढत्‍या धोक्‍याव्‍यतिरिक्‍त पावसाळ्यामुळे दररोज सकाळी चालणे, कामासाठी दररोज करावा लागणारा प्रवास किंवा नेहमीच्‍या खाण्‍याच्‍या पद्धती अशा नित्‍यक्रमामध्‍ये व्‍यत्‍यय येऊ शकतो. पावसाच्‍या पाण्‍यापासून संरक्षणासाठी रेनकोट व छत्र्यांचा वापर केला जातो, त्‍याचप्रमाणे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी पावसाळ्यामध्‍ये आरोग्‍य व सुरक्षिततेला प्राधान्‍य देणाऱ्या सुव्‍यवस्थित नित्‍यक्रमाचे पालन करणे आवश्‍यक आहे.

मधुमेह व्‍यवस्‍थापनासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे, जसे घरामध्‍ये सक्रिय राहणे, आरोग्‍यदायी आहाराचे सेवन करणे आणि रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांबाबत अपडेटेड राहणे. तंत्रज्ञान हे संतुलन राखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. कन्टिन्‍युअस ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिवाईसेस हंगामी बदलानंतर देखील तुमच्‍या आरोग्‍यावर सहजपणे देखरेख ठेवण्‍यास मदत करतात, जेथे रक्‍तातील शर्करेची पातळी तपासण्‍यासाठी बोटांना टोचण्‍याची गरज भासत नाही.

मुंबईतील कुलाबा येथील शुगर डॉक्‍टर मेडिकेअरचे संस्‍थापक व डायबेटोलॉजिस्‍ट डॉ. सुरेश पुरोहित म्‍हणाले,“पावसाळ्यामध्‍ये फ्लू सारखे संसर्ग आणि पाण्‍यामार्फत होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो, ज्‍यामुळे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी गंभीर गुंतागूंती निर्माण होऊ शकतात. कमकुवत रोगप्रतिकारशक्‍तीमुळे प्रतिबंध राखणे आणि मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी सर्वांगीण उपायांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. योग्‍य पोषण घेण्‍यासोबत सक्रिय राहिले पाहिजे आणि सतत रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर देखरेख ठेवली पाहिजे. यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबता येऊ शकतो. हवामानामुळे क्लिनिकला भेट देणे शक्य नसताना सीजीएम सारख्या तंत्रज्ञानांचा वापर विशेषतः उपयुक्‍त ठरतो.”

मधुमेहावर नियंत्रण ठेवत पावसाळ्याचा आनंद घेण्‍यासाठी काही टिप्‍स:

  1. स्‍मार्ट फूड निवडींसह रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्‍याला प्राधान्‍य द्या: पावसाळ्यादरम्‍यान रस्‍त्‍यावरील खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घ्‍यावेसे वाटू शकते, पण या खाद्यपदार्थांचे सेवन केल्‍याने संसर्ग होण्‍याचा धोका वाढतो. मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी संसर्गांचा सामना करणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणाऱ्या आणि अॅण्‍टीऑक्सिडण्‍ट्ससह समृद्ध असलेल्‍या आरोग्‍यदायी, घरी बनवलेल्‍या आहाराचे सेवन करा. भाज्या पूर्णपणे धुवा आणि कच्‍चे किंवा कमी शिजलेले खाद्यपदार्थ सेवन करू नका.
  2. पायांची अधिक काळजी घ्‍या: मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी पावसाळ्यादरम्‍यान विशेषत: त्‍यांच्‍या पायांची अधिक काळजी घेतली पाहिजे. ओल्या वातावरणामुळे बुरशीजन्य संसर्ग किंवा पायांना दुखापत होऊ शकते. पावसातून घरी आल्यानंतर पाय स्‍वच्‍छ धुवून पुसा आणि मोज्‍यांची अतिरिक्‍त जोडी सोबत ठेवा. अनवाणी किंवा डबक्यातून चालणे टाळा आणि बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी पाय कोरडे आणि स्वच्छ ठेवणारे बंद, आरामदायी पादत्राणे निवडा.
  3. रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांची नियमितपणे तपासणी करा: पावसाळ्यादरम्‍यान आहार, व्‍यायाम किंवा तणाव पातळी असो नित्‍यक्रमामध्‍ये बदल होतो, ज्‍याचा रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्या नियंत्रणात ठेवण्‍यावर परिणाम होऊ शकतो. आर्द्रता आणि तापमानातील बदल इन्सुलिन संवेदनशीलतेवर देखील परिणाम करू शकतात, ज्यामुळे रक्‍तातील शर्करेची पातळी अनपेक्षितपणे वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. फ्रीस्टाइल लिब्रे सारखी वीअरेबल सीजीएम डिवाईसेस रिअल-टाइममध्‍ये ग्‍लुकोज रिडिंग्‍ज देऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्ष्य श्रेणीत राहण्यास मदत होते आणि दीर्घकालीन गुंतागूंतीचा धोका कमी होतो. योग्य टूल्‍ससह पाऊस असो किंवा उन्हाळा असो, तुम्‍ही मधुमेहाचे योग्‍यरित्‍या व्‍यवस्थापन करू शकता.
  4. घरामध्‍ये शारीरिकदृष्‍ट्या सक्रिय राहा (व्‍यायाम करा): पावसामुळे घरामध्‍ये राहावे लागत असले तरी फिटनेस रूटिनकडे दुर्लक्ष करू नका. पावसामुळे बाहेर जिममध्‍ये जाता येत नसले तरी घरामध्‍ये हलक्‍या स्‍वरूपात व्‍यायाम करता येऊ शकतो. ३० मिनिटे चालणे किंवा घरामध्‍ये सकाळच्‍या वेळी चालणे यामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
  5. हायड्रेटेड राहा (भरपूर पाणी प्‍या): उच्‍च आर्द्रतेमुळे डिहायड्रेशनची लक्षणे दिसून येणार नाहीत, ज्‍याचा रक्‍तातील शर्करेच्‍या नियमनावर परिणाम होऊ शकतो. तहान लागलेली नसताना देखील भरपूर पाणी पिण्‍याची खात्री घ्‍या. हर्बल चहा आणि इन्‍फ्यूज पाणी देखील हायड्रेशनला मदत करू शकतात.

या टिप्‍सव्‍यतिरिक्‍त, मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींनी हायपरग्लाइसेमिया किंवा हायपोग्लाइसेमियाच्या कोणत्याही लक्षणांबाबत सतर्क राहिले पाहिजे आणि त्वरित काळजी घेतली पाहिजे. एकूण, पावसाळ्यात मधुमेहाचे व्यवस्थापन करणाऱ्या कोणत्याही व्यक्‍तींनी काहीसी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button