स्वादिष्ट मिष्टान्नांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेस्ले मिल्कमेडने ३० नोव्हेंबर रोजी जागतिक खीर दिनाची घोषणा केली आहे. हा दिवस स्वादिष्ट मिष्टान्न खीरीप्रती समर्पित आहे, जेथे प्रत्येक भारतीय कुटुंबामध्ये खीरीचा आस्वाद घेतला जातो.
भारतातील प्रत्येक कुटुंबामधील सदस्य एकत्र येत खीरीचा आस्वाद घेतात. खीर बनवण्याच्या वेगवेगळ्या पाककला असल्या तरी त्यामधून खास आणि संस्मरणीय आठवणींचा अनुभव मिळतो. सण साजरा करताना, कुटुंबातील एखादा सदस्य बाहेरगावावरून घरी परतल्यानंतर किंवा रोजच्या साजरीकरणामध्ये खीरीचा आस्वाद घेतला जातो. मिल्कमेडने सहजपणे, जलदपणे व उत्तमरित्या या परंपरेला कायम ठेवण्यामध्ये मदत केली आहे.
नेस्ले इंडियाच्या डेअरी व्यवसायाचे प्रमुख मानव साहनी म्हणाले, ”जागतिक खीर दिन देशभरातील पिढ्यांना एकत्र आणणाऱ्या मिष्टान्नाला म्हणजेच खीरीला साजरे करण्याची आमची पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे खीर बनवली जाते, पण सर्वत्र त्यामध्ये तोच गोडवा व संस्मरणीय आठवणी सामावलेल्या असतात. मिल्कमेडसह आम्ही आशा करतो की ग्राहक स्वादिष्ट व क्रीमी खीरीचा आस्वाद घेतील, जिची चव अद्भुत आहे.”
भारतातील कानाकोपऱ्यामध्ये खीरीची वेगवेगळी नावे व नवनवीन प्रकार आहेत, तरीदेखील सर्वत्र खीरीप्रती समान आवड दिसून येते. उत्तरेकडे तांदळापासून स्वादिष्ट खीर बनवली जाते. उपवासाच्या दिवशी बनवली जाणारी साबुदाणा खीर उत्तम स्वादासोबत भक्तीचा अनुभव देते. ईदीला शीर खुर्मा बनवली जाते. महाराष्ट्रामध्ये उत्सवाच्या वेळी शेवयाची खीर बनवली जाते. बंगालमध्ये पायेश बनवली जाते, जी जीवनाप्रती प्रेमाचे प्रतीक आहे. ओडिशामध्ये बनवल्या जाणाऱ्या खीरीमधून परंपरा व आशीर्वादाचा अनुभव मिळतो. आणि दक्षिणेकडे सेमियापासून पलाडापर्यंत पायसमचा आस्वाद दिला जातो. हे घटक वेगळे असतील, खीरीची नाव वेगवेगळे असतील, पण त्यामधील भावना समान असते, जेथे देशभरात एकत्र गोड खीरीचा आस्वाद घेतला जातो.
१०० वर्षांहून अधिक काळापासून मिष्टान्नांना सोपे व स्वादिष्ट करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेस्ले मिल्कमेडचा प्रत्येक कुटुंबासाठी हे साजरीकरण सोपे करण्याचा मनसुबा आहे. यंदा जागतिक खीर दिनानिमित्त मिल्कमेड सर्वांना त्यांच्या आवडीची खीर बनवण्यासाठी, सोयीस्कर मिल्कमेडचा वापर करण्यासाठी आणि सर्वांना एकत्र आणणाऱ्या मिष्टान्नाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. खीर पाककला व खीर तयार करण्याच्या संकल्पना MILKMAID website वर उपलब्ध आहेत, ज्या तुम्ही घरामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू शकता.