एनआरएआय च्या या मोहिमेत मुंबईतील ५० हून अधिक रेस्टॉरंट सामील झाले असून जे मतदार मतदानाचा पुरावा दाखवतील ते या रेस्टॉरंट मधील जेवणात २०%टक्के सवलतीसाठी पात्र ठरतील.
मुंबई, १८ नोव्हेंबर, २०२४ : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) मुंबई विभागाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अधिक मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डेमोक्रसी डिस्काउंट’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. २० आणि २१ नोव्हेंबर २०२४ रोजी, मतदार संपूर्ण मुंबईतील सहभागी रेस्टॉरंट्समध्ये त्यांच्या एकूण जेवणाच्या बिलावर २०% सूट घेऊ शकतात.
मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार यांनी शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत म्हणून एनआरएआय चा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. या मोहिमेचा उद्देश तरुण शहरी मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेरित करणे आहे.
या प्रसंगी बोलताना, एनआरएआय मुंबई विभाग हेड रॅचेल गोएंका म्हणाल्या, “एनआरएआय च्या या उपक्रमाचा उद्देश आमच्या तरुण शहरी मतदारांना मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी, आपल्या मजबूत देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करणे आहे.