नेस्‍ले इंडियाने वर्ल्‍ड फूड इंडिया येथे अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

News Service

भारतातील प्रवासाप्रती आपली कटिबद्धता सुरू ठेवली

नेस्‍ले इंडियाने भारताप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली, जेथे ओडिशामधील व त्‍यांच्‍या विद्यमान उत्‍पादन ठिकाणी ग्रीन फिल्‍ड व ब्राऊन फिल्‍ड प्रकल्‍पांमध्‍ये गुंतवणूका वाढवण्‍यासाठी अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत (एमओएफपीआय) सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. नवी दिल्‍लीमध्‍ये वर्ल्‍ड फूड इंडिया समिट २०२५ येथे या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍यात आली.

नेस्‍ले इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. मनिष तिवारी म्‍हणाले, “अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करण्‍यामधून पुढील २ ते ३ वर्षांच्‍या कालावधीत ओडिशा आणि विद्यमान उत्‍पादन ठिकाणी ग्रीन फिल्‍ड व ब्राऊन फिल्‍ड प्रकल्‍पांमधील अन्‍न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूका करण्‍याप्रती नेस्‍ले इंडियाची कटिबद्धता दिसून येते. यामुळे प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रोजागार संधी निर्माण होण्‍याची देखील अपेक्षा आहे, ज्‍यामुळे भारताच्‍या विकासगाथेप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होईल, तसेच आम्‍ही आत्‍मनिर्भर भारतच्‍या दिशेने हा प्रवास सुरू ठेवला आहे.”

नेस्‍ले इंडियाने शाश्वत, सर्वसमावेशक व भविष्‍याकरिता सुसज्‍ज खाद्य यंत्रणा निर्माण करण्‍यावर, ब्रँड्स व पायाभूत सुविधेमध्‍ये गुंतवणूक करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे, जे आर्थिक प्रगतीला चालना देईल आणि सर्व नागरिकांसाठी जीवनाचा दर्जा उंचावतील. तसेच, साहसी नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून कंपनी ग्राहकांना जलदपणे, अधिक मोठ्या प्रमाणात आणि सर्वोत्तम उत्‍पादने व अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

नेस्‍ले इंडियाच्‍या कॉर्पोरेट अफेअर्सचे संचालक श्री. कुंवर हिम्‍मत सिंग म्‍हणाले, “भारतात ११३ वर्षांहून अधिक काळाच्‍या उपस्थितीसह नेस्‍ले इंडिया १००,००० हून अधिक शेतकऱ्यांसोबत काम करते, ज्‍यामध्‍ये दुग्‍धव्‍यवसाय, कॉफी, मसाले, गहू, ऊस व तांदूळ यांचे उत्‍पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे, तसेच पुरवठादारांसोबत प्रबळ सहयोग देखील आहेत. भारतातील आमच्‍या नऊ फॅक्‍टरी उच्‍च दर्जाची व मानकांची उत्‍पादने उत्‍पादित करतात, जी १०,००० वितरक व पुनर्वितरक आणि ५.२ दशलक्ष रिटेल आऊटलेट्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतात.”

नेस्‍ले इंडियाच्‍या सामाजिक उपक्रमांनी पोषण जागरूकता उपक्रम, शिक्षण, कचरा व्‍यवस्‍थापन, शुद्ध पिण्‍याच्‍या पाण्‍याची उपलब्‍धता, स्‍वच्‍छता, आहार सहाय्य हस्‍तक्षेप आणि रस्‍त्‍यावरील खाद्य विक्रेत्‍यांना अन्‍न सुरक्षा व स्‍वच्‍छतेबाबत प्रशिक्षण अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून १६ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. तसेच, नेस्‍ले इंडिया सामुदायिक कल्‍याण वाढवण्‍यासाठी गाव दत्तक उपक्रमांमध्‍ये सक्रियपणे सामील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button