श्रद्धा पासी जयरथ दिग्दर्शित आणि बॉम्बे शो स्टुडिओज एलएलपी निर्मित सिरीज ‘ठुकरा के मेरा प्यार’ पहा २२ नोव्हेंबर २०२४ पासून फक्त डिस्नी+ हॉटस्टारवर
मुंबई, , २०२४: विश्वासघात आणि सूड यांच्यात गुंफलेली अतूट प्रेम व उत्कट इच्छेची एपिक गाथा डिस्नी+ हॉटस्टारच्या ‘ठुकरा के मेरा प्यार’मध्ये रोमांसला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. ही सिरीज जटिल पात्र व हृदयस्पर्शी कथानकाला सादर करते, जेथे नियती अखेर कुलदीप (धवल ठाकूर) आणि शन्विका (संचिता बासू) यांचे भविष्य ठरवते. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर स्थित या सिरीजचे कथानक प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन किशोरवयीनांच्या जीवनाला दाखवते, जेथे ते जात व पंथाच्या आव्हानांचा सामना करतात.
बॉम्बे शो स्टुडिओज एलएलपी निर्मित आणि श्रद्धा पासी जयरथ दिग्दर्शित सिरीज ‘ठुकरा के मेरा प्यार’मध्ये उदयोन्मुख नवोदित कलाकार धवल ठाकूर व संचिता बासू यांच्यासह गोविंद पांडे प्रमुख भूमिकेत आहेत.
या सिरीजच्या दिग्दर्शक श्रद्धा पासी जयरथ म्हणाल्या, ”’ठुकरा के मेरा प्यार’ प्रेमकथा असण्यासोबत विश्वासघात, पूर्वाग्रह आणि मानवी भावनेच्या गुंतागूंतींना देखील सादर करते. कॉलेजमधील क्लासिक रोमांसमध्ये आधुनिक पैलूची भर करण्याचा आमचा मनसुबा होता. धवल व संचिता यांसारख्या प्रतिभावान कलाकारांसह आम्ही आशा करतो की प्रेक्षक हा क्लासिक रोमांस पाहण्याचा आनंद घेतील. मी ही संधी देण्यासाठी डिस्नी+ हॉटस्टारचे आभार व्यक्त करते आणि प्रेक्षकांची या सिरीजप्रती प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.”
या सिरीजमध्ये कुलदीपची भूमिका साकारणारे धवल ठाकूर म्हणाले, ”कुलदीपच्या गुंतागूंतींना व्यापून घेताना मला त्याचे पैलू समजले, ज्यामुळे या भूमिकेमध्ये सामावून जाण्यास मदत झाली. मी कथानक, दिग्दर्शन व प्रक्रियेवर विश्वास ठेवला, ज्यामुळे मला पात्राच्या प्रवासामध्ये सामावून जाता आले. अभिनेता म्हणून हा अनुभव समाधानकारक ठरला. सिरीज ‘ठुकरा के मेरा प्यार’चे उत्तम लेखन, तसेच वर्कशॉप्सदरम्यान टीमचे सहयोगात्मक प्रयत्न आणि एकूण इनसाइट्समुळे मला कुलदीपची भूमिका उत्तमरित्या सादर करण्यास मदत झाली. डिस्नी+ हॉटस्टारवरील आमच्या या उत्कट निर्मितीबाबत प्रेक्षकांचे मत जाणून घेण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.”
या सिरीजमध्ये शन्विकाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री व इन्फ्लूएन्सर संचिता बासू म्हणाल्या, ”शन्विकाची भूमिका साकारण्याचा अनुभव समाधानकारक राहिला आहे. तिचा उत्साही व बेधडक स्वभावामधून तिची भूमिका सार्थ ठरते. मी सिरीज ‘ठुकरा के मेरा प्यार’कडे प्रेमाप्रती माझ्या जाणीवेला आकार दिलेल्या चित्रपटांप्रती मानवंदना म्हणून पाहते. नवीन व ओळखीच्या चेहऱ्यांमुळे माझ्यामधील भिती दूर झाली आणि सह-कलाकार धवलच्या पाठिंब्यामुळे मला उत्तम साहचर्य निर्माण करण्यास मदत झाली. मी स्वत:ला पडद्यावर पाहण्यास आणि डिस्नी+ हॉटस्टारवरील माझ्या परफॉर्मन्सबाबत प्रेक्षकांचे मत जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक आहे.”