नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत निकिता अगरवाल हिचे एकल चित्र प्रदर्शन सुरु

News Service

3 ते ६जानेवारी २०२५ ह्या दरम्यान
नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत

Ripples of Reflection
(प्रतिबिंबांच्या तरल अनुभूती)

प्रसिद्ध चित्रकर्ती निकिता अगरवाल हिच्या तैलरंग व ऍक्रिलिक रंगांचा वापर करून कॅनव्हासवर काढलेल्या वाराणशी व तेथील धार्मिक संकल्पना आणि वैशिट्यपूर्ण भावोत्कट वातावरण ह्यावर आधारित चित्रांचे एकल प्रदर्शन नेहरू सेंटर कलादालन, वरळी, मुंबई ४०००१८ येथे 3 ते ६जानेवारी २०२५ ह्या दरम्यान सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. तिने आपल्या कलात्मक शैलीत बनविलेली ही चित्रे खरोखर प्रत्येक दर्शकाला आवडतील अशीच आहेत. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २ जानेवारी २०२५ रोजी नेहरू सेंटर येथे झाले.

तिच्या प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रे वाराणशी शहरातील धार्मिक वातावरण, तेजाने प्रकाशित होणारे गंगा नदीचे घाट, त्यावरील जप तप, प्रार्थना व इतर संकल्पना तसेच तेथील मंदिर, तीर्थस्थाने, प्रार्थनास्थळे, विविध बोटी वगैरे दर्शवितात. ह्या ठिकाणी होणारे अखंड मंत्रजागर, पूजापाठ व रूढी/ परंपरांनुसार वारंवार होणारे धार्मिक विधी वगैरेचे त्यात उत्कटपणे सर्वांना दर्शन घडते. निळा, हिरवा, भगवा, लाल व नारिंगी तसेच पिवळा वगैरे रंगांच्या योग्य लेपनातून व अर्थपूर्ण संकल्पनातून तिने पारंपरिकता व आधुनिकता ह्याचा एक अप्रतिम समन्वय आपल्या तंत्रशुद्ध शैलीत चित्रमाध्यमातून येथे सादर केला आहे. तिचे प्रत्येक चित्र बोलके व वैशिट्यपूर्ण आणि कलात्मक आहे व त्यामुळे ते रसिकमनास भावते. अर्थात त्याला त्यामुळे दृश्यानंद व मानसिक शांती व समाधान ह्यांचा लाभ होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button