- निस्सान मोटर इंडियाने भारतीय उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ऑल न्यू ७-आसनी बी-एमपीव्ही आणली आहे जी भविष्यासाठी परिपूर्ण आहे. त्यात आधीच घोषित केलेल्या २ सी-एसयूव्ही (५ आणि ७-आसनी), परवडणाऱ्या दरातील ईव्ही, न्यू निस्सान मॅग्नाइट आणि निस्सान एक्स-ट्रेल यांचा समावेश आहे.
- या न्यू ५-आसनी सी-एसयूव्हीची बाह्य रचना ऑल न्यू निस्सान पेट्रोलपासून प्रेरित आहे, जी भारतातील सर्वाधिक स्पर्धात्मक आणि वेगाने वाढणाऱ्या विभागासाठी उपयुक्त आहे.
- ऑल न्यू निस्सान ७-आसनी बी-एमपीव्हीमध्ये , सी-आकाराच्या ग्रिल बोल्ड डिझाइनसह मस्क्युलर एसयूव्ही वैशिष्टे असून हे निस्सानच्या विशिष्ट डिझाइन तत्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे.
गुरूग्राम, २६ मार्च २०२५: निस्सान मोटर इंडियाने आपल्या विद्यमान श्रेणीमध्ये ऑल न्यू ७-आसनी बी-एमपीव्हीची घोषणा केली आहे. कंपनीने जपानमधील योकोहामा येथे नुकत्याच झालेल्या ग्लोबल प्रॉडक्ट शोकेस कार्यक्रमात भारतासाठी नियोजित दोन नवीन उत्पादने प्रदर्शित केली. हे भारतातील ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नवीन उत्पादनांना आकार देणे आणि न्यू निस्सान मॅग्नाइटच्या नेतृत्वाखालील बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये विद्यमान वाट्याव्यतिरिक्त बी-एमपीव्ही आणि सी-एसयूव्ही सेगमेंटसारख्या सर्व वेगाने वाढणाऱ्या सेगमेंटमध्ये उत्पादने आणण्याच्या योजनेच्या अनुरूप आहे.

निस्सान भारतातील वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत आपली उपस्थिती ठळकपणे दर्शवत राहील, देशांतर्गत कामगिरी आणि निर्यात वाढवेल. निस्सानच्या नियोजित उत्पादन मोहिमेची सुरूवात प्रथमच जागतिक स्तरावर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये येणाऱ्या ७-आसनी बी-एमपीव्ही (बहुउद्देशीय वाहन) च्या प्रदर्शनाने झाली आहे. ही कंपनीच्या भारतातील उत्पादनांमध्ये एक मोलाची भर आहे.

त्यानंतर आर्थिक वर्ष २६ च्या सुरूवातीला ५-आसनी सी-एसयूव्ही (कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल) ची घोषणा केली जाईल. कंपनीने आज भारतीय प्रेक्षकांसाठी दोन नवीन टीझर प्रदर्शित केले आहेत. ते दोन्ही वाहनांच्या उत्पादनाची आणि बाजारातील उपलब्धतेची माहिती देतात. निस्सान मोटर इंडिया आर्थिक वर्ष २६ पर्यंत बी/सी आणि डी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये भारतीय ग्राहकांसाठी ४ उत्पादने आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
भारतातील या सेगमेंटमध्ये बदल घडवून आणण्यासाठी सी-एसयूव्हीची आणण्यात आली आहे. ही गाडी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आणि अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. एका प्रतिष्ठित निस्सान एसयूव्हीपासून प्रेरित होऊन निस्सान पेट्रोलनुसार नवीन सी-एसयूव्हीचे डिझाइन केले आहे. सी-एसयूव्हीमध्ये खऱ्या अर्थाने निस्सान एसयूव्ही डीएनए आहेत आणि निस्सान जागतिक स्तरावरील प्रसिद्ध विश्वासार्हता, देखणी कारागिरी आणि तंत्रज्ञानही आहे. ठळकपणे दिसून येणारी सी-एसयूव्ही उत्तम कामगिरी आणि वापरासाठी सुलभ आहे. त्यामुळे ती भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीसाठी परिपूर्ण साथीदार बनेल.