नवी दिल्ली, २ मे २०२५: कोका-कोला इंडियाने ली मेरिडियन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एनआरएआय फूड डिलिव्हरी समिट २०२५ च्या चौथ्या एडिशनमध्ये नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) सोबत सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत कोका-कोला फूडमार्क्स २.० उपक्रम अधिकृतरित्या लाँच करण्यात आला आहे. हा उपकम भारतातील सर्वात आयकॉनिक पाककला गंतव्यांना प्रशंसित करतो. प्रत्येक फूडमार्क ठिकाणांवर प्रकाश टाकते, जेथे परिपूर्ण आहार, परिपूर्ण क्षण आणि थंडगार कोका-कोला एकत्र येत संस्मरणीय फूड लँडमार्क्स निर्माण करतात.

संस्कृतीमधून प्रेरित आणि कोका-कोलाच्या रिअल मॅजिकचे पाठबळ असलेले फूडमार्क्स २.० हैदराबादमधील पॅराडाइज आणि दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील एम्बासी अशा दिग्गज आस्थापनांमधील यशस्वी सहयोगांच्या आधारावर डिझाइन करण्यात आले आहे. दृढसंबंध, संस्कृती आणि रिफ्रेशमेंटच्या क्षणांची निर्मिती करत कोका-कोला आणि एनआरएआय भारतातील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्ससोबत सहयोग करत या उपक्रमाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, ज्यासाठी पाककला शोधाला चालना देत आहे आणि भारतातील फूड संस्कृतीला अधिक संपन्न करत आहे. हा उपक्रम उद्योग सहयोगांना अधिक मजबूत करण्यासोबत रेस्टॉरंट्सकरिता भारतातील विकसित होत असलेल्या सांस्कृतिक कथानकाचा भाग बनण्यासाठी नवीन मार्ग देखील खुले करत आहे.
कोका–कोला इंडियाचे चीफ कस्टमर ऑफिसर अभिषेक गुप्ता म्हणाले, “एनआरएआयसोबतच्या या सहयोगामधून प्लॅटफॉर्म निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जो भारतातील रेस्टॉरंट उद्योगासाठी विकासाला गती देतो. फूडमार्क्स २.० आयकॉनिक डायनिंग अनुभवाला सांस्कृतिक गंतव्यांमध्ये बदलतो, ज्याला संबंध व शोधाच्या रिअल मॅजिकचे पाठबळ आहे. प्रत्येक फूडमार्कचे मूळ तत्त्व म्हणजे गरमागरम भोजनाचा आनंद देणे, ज्यासोबत थंडगार कोका-कोलाचा आस्वाद देणे. सहयोगाने आम्ही रेस्टॉरंट्सकरिता भारतातील पाककला लँडस्केपमधील लँडमार्क्स बनण्यासाठी नवीन संधी निर्माण करत आहोत.”
एनआरएआयचे अध्यक्ष आणि वाव! मोमो फूड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह–संस्थापक सागर दर्यानी म्हणाले, “रेस्टॉरंट्सना त्यांच्या पाककला, त्यांच्या गाथा आणि त्यांच्या प्रवासाचा नेहमी अभिमान वाटतो. पण आजच्या युगामध्ये सर्वोत्तमता पुरेशी नाही, तर संशोधन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोका-कोला फूडमार्क्स विशेष अनुभव देणाऱ्या प्रत्येक रेस्टॉरंटला प्रशंसित करत आणि त्यांना अग्रस्थानी आणत या संधीची पूर्तता करते. फूडमार्क्सचे जागतिक यश पाहता आम्हाला विश्वास आहे की, भारतातील विविध पाककला फूडमार्क्सना अधिक दृढ करतील, तसेच उद्योगासाठी वास्तविक कन्टेन्ट आणि खरी दृश्यमानता देतील.”
फूडमार्क्स २.० सह कोका-कोला इंडिया आणि एनआरएआय भारतातील फूड संस्कृतीमधील नवीन अध्यायामध्ये प्रवेश करत आहे. देशातील विविध फ्लेवर्स आणि थंडगार कोका-कोलाला एकत्र आणत हा उपक्रम दीर्घकालीन फूड लँडमार्क्स निर्माण करण्यास सज्ज आहे, जे व्यक्तींशी संलग्न असतील. हा उपक्रम विस्तारित होत असताना व्यक्ती, फूड आणि रिअल मॅजिकच्या एकत्रित क्षणांच्या संबंधाला अधिक दृढ करेल, जेथे एका वेळी एक फूडमार्क असेल.
