ओकले मेटा एचएसटीएन भारतात १ डिसेंबरला लाँच होणार, ज्‍यामध्‍ये आहेत कार्यक्षमता-केंद्रित एआय वैशिष्‍ट्ये

News Service

राष्‍ट्रीय, २७ नोव्‍हेंबर: ओकले मेटा एचएसटीएन एआय ग्‍लासेस् भारतात १ डिसेंबरपासून उपलब्‍ध असणार आहेत, ज्‍यासह अॅथलीट्स, क्रीडाप्रेमी व दैनंदिन चॅम्पियन्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या कार्यक्षमता-केंद्रित एआय आयवेअरची नवीन श्रेणी लाँच होईल. हे कलेक्‍शन आजपासून सनग्‍लास हटवर पूर्व-विक्रीसाठी उपलब्‍ध असेल, तसेच देशभरात सनग्‍लास हट (Sunglass Hut) आणि आघाडीच्‍या ऑप्टिकल व आयवेअर रिटेलर्समध्‍ये खरेदीसाठी उपलब्‍ध असेल. या एआय ग्‍लासेसची किंमत ४१,८०० रूपयांपासून सुरू होते.

अॅथलेटिक कामगिरीमध्‍ये एआय क्षमतेची भर
अॅथलीट्स व क्रीडाप्रेमींसाठी डिझाइन करण्‍यात आलेले ओकले मेटा एचएसटीएन एआय ग्‍लासेसमध्‍ये आकर्षक नवीन आकारमानाची भर करते. हँड्स-फ्री कॅप्‍चरसाठी पूर्णत: एकीकृत कॅमेरा, ओपन-इअर स्‍पीकर्स आणि आयपीएक्‍स४ जलरोधकसह एचएसटीएन उच्‍च क्रियाकलापांमध्‍ये मदत करते. हे ग्‍लासेस् जवळपास ८ तासांपर्यंत बॅटरी कार्यरत राहण्‍याची खात्री देतात, तसेच १९ तास स्‍टॅण्‍डबाय, जलद चार्जिंग देतात आणि चार्जिंग केस ४८ तासांपर्यंत अतिरिक्‍त पॉवर देते. हाय-रिझॉल्‍यूशन ३के व्हिडिओ वापरकर्त्‍यांना चालता-फिरता क्षणांना रेकॉर्ड करण्‍याची सुविधा देते, तर बिल्‍ट-इन मेटा एआय सर्फ स्थितींपासून गोल्‍ड बिंड विश्‍लेषणापर्यंत त्‍वरित उत्तर व कार्यक्षमतेबाबत माहिती देते.

दैनंदिन जीवनाला स्‍मार्ट बनणारे बिल्‍ट-इन एआय
ओकले मेटा एचएसटीएन प्रत्‍यक्ष मेटा एआयला ग्‍लासेसमध्‍ये एकीकृत करते, ग्‍लासेसना कार्यक्षमतेसाठी सुसज्‍ज एआय चॅम्पियनमध्‍ये बदलते. अॅथलीट्स मेटा एआयला त्‍वरित, रिअल-टाइम माहिती आणि हँड्स-फ्री सहाय्यतेसाठी विचारू शकतात. सर्फ स्थिती तपासायची असे, गोल्‍फचा आनंद घेण्‍यापूर्वी हवेबाबत विश्‍लेषण मिळवायचे असो किंवा स्‍टोरीजवर शेअर करण्‍यासाठी क्षण रेकॉर्ड करायचे असोत वापरकर्ते सहाय्यतेसाठी फक्‍त म्‍हणू शकतात ‘हाय मेटा’.

एआय ग्‍लासेससोबत हिंदीमध्‍ये संवाद साधा
ओकले मेटा एचएसटीएन आता मेटा एआयसोबत हिंदीमध्‍ये परस्‍परसंवाद साधण्‍याची सुविधा देते. वापरकर्ते मेटा एआय अॅपमधील डिवाईस सेटिंग्‍जच्‍या माध्‍यमातून हिंदी भाषा सक्षम करू शकतात. सर्वमच्‍या लँग्‍वेज टूल्‍सद्वारे समर्थित हे अपडेट वापरकर्त्‍यांना प्रश्‍न विचारण्‍याची, कन्‍टेन्‍ट कॅप्‍चर करण्‍याची, मीडियावर नियंत्रण ठेवण्‍याची, कॉल्‍स करण्‍याची आणि पूर्णत: हिंदीमध्‍ये माहिती मिळवण्‍याची सुविधा देते.

मेटा एआयवर सेलिब्रिटी एआय वॉईसचे आगमन
मेटा एआयमध्‍ये आता सेलिब्रिटी एआय वॉईस समाविष्‍ट करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या ओळखीच्‍या, सुस्‍पष्‍ट आवाजांमध्‍ये प्रतिसाद ऐकू येतो. इंग्रजीमध्‍ये उपलब्‍ध असलेला पहिला आवाज म्हणजे दीपिका पदुकोणचा एआय आवाज. त्‍या सहाय्यतेसाठी मेटा एआयच्‍या वॉईसेसच्‍या जागतिक लाइनअपमध्‍ये सामील झाल्‍या, तसेच निवडण्‍यासाठी अनेक ओळखीचे सेलिब्रिटी आवाज देखील आहेत.

यूपीआय-लाइट पेमेंट्सची चाचणी
लवकरच, तुम्‍हाला नवीन वैशिष्‍ट्याचा अनुभव मिळेल, जे प्रत्‍यक्ष तुमच्‍या ओक्‍ले मेटा एचएसटीएन स्‍मार्ट ग्‍लासेसच्‍या माध्‍यमातून सुरक्षितपणे यूपीआर क्‍यूआर-कोड पेमेंट्स करण्‍याची सुविधा देईल. ग्‍लासेस् परिधान करून क्‍यूआर कोडकडे पहा आणि म्‍हणा ‘हाय मेटा, स्‍कॅन अँड पे’, ज्‍यासह यूपीआय लाइट पेमेंट पूर्ण होईल आणि तुमच्‍या स्‍मार्टफोनचा वापर करण्‍याची गरज भासणार नाही. तुमच्‍या व्‍हॉट्सअॅपशी लिंक असलेल्‍या बँक खात्‍यामधून पेमेंटची प्रक्रिया होईल, ज्‍यासह दैनंदिन व्‍यवहार जलद आणि अधिक सुलभपणे होतील.

आम्‍ही भारतभरातील अॅथलीट्स व क्रिएटर्सना ओकले मेटा एचएसटीएन स्‍मार्ट ग्‍लासेसच्‍या कार्यक्षमता-केंद्रित नाविन्‍यतेचा अनुभव घेताना पाहण्‍यास उत्‍सुक आहोत.
ओकले मेटा एचएसटीएन सहा फ्रेम व लेन्‍स कलर संयोजनांमध्‍ये उपलब्‍ध असतील, जे सर्व आरएक्‍स-सुसज्‍ज आहेत, ज्‍यामुळे ग्‍लासेस् (चष्‍मे) परिधान करणाऱ्यांना परिपूर्ण जोडी निवडता येईल:
● ओकले मेटा एचएसटीएन वॉर्म ग्रेसह प्रिझम™ रूबी लेन्‍सेस
● ओकले मेटा एचएसटीएन ब्‍लॅकसह प्रिझम™ पोलार ब्‍लॅक लेन्‍सेस
● ओकले मेटा एचएसटीएन ब्राऊन स्‍मोकसह प्रिझम™ पोलार डीप-वॉटर लेन्‍सेस
● ओकले मेटा एचएसटीएन ब्‍लॅकसह ट्रान्झीशन्‍स अॅमेथिस्‍ट लेन्‍सेस
● ओकले मेटा एचएसटीएन क्‍लीअरसह ट्रान्झीशन्‍स ग्रे लेन्‍सेस
● ओकले मेटा एचएसटीएन ब्‍लॅकसह क्‍लीअर लेन्‍सेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button