- विशाखापट्टणम (#१), रांची (#२), विजयवाडा (#३), नाशिक (#४), रायपूर (#५) हे या वर्षातील टॉप ५ उदयोन्मुख करिअर हब्स आहेत.
- या द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, आर्थिक सेवा या क्षेत्रांमधील कंपन्या अभियांत्रिकी, व्यवसाय विकास पदांसाठी भरती करत आहेत.
भारत, १५ जुलै २०२५: लिंक्डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल नेटवर्कने आपली पहिली सिटीज ऑन द राइज लिस्ट लाँच केली आहे. ही लिस्ट भारतातील टॉप १० शहरांवर प्रकाश टाकते, जेथे रोजगार बाजारपेठ आणि आर्थिक संधी वाढत आहे. या लिस्टमधून विशाखापट्टणम (#१), रांची (#२), विजयवाडा (#३), नाशिक (#४) आणि रायपूर (#५) हे झपाट्याने विकसित होत असलेले नॉन-मेट्रो हब्स म्हणून उदयास येत असल्याचे निदर्शनास येते, जेथे व्यावसायिक संधीला गती मिळत आहे.
सिटीज ऑन द राइज लिंक्डइनची पहिली लोकेशन-आधारित रँकिंग आहे, जिला विशेष लिंक्डइन डेटाचे पाठबळ आहे. ही लिस्ट भारतभरातील हायरिंग, रोजगार निर्मिती आणि टॅलेंटमधील वाढीला निदर्शनास आणते.
या वर्षी भारतातील ५ पैकी ४ प्रोफेशनल्स नोकरी बदलू इच्छितात, ज्यामुळे सिटीज ऑन द राइज समकालीन प्रमुख शहरांव्यतिरिक्त उदयोन्मुख प्रांतांबाबत माहिती देते, जेथे आर्थिक गुंतवणूका रोजगार संधी निर्माण करत आहेत. ही लिस्ट स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या, नवीन उद्योगांमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या किंवा स्थानिक पातळीवर त्यांचे करिअर वाढवू इच्छिणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी द्वितीय व तृतीय श्रेणीच्या विकास क्षेत्रांना प्रकाशझोतात आणते.
लिंक्डइन करिअर एक्स्पर्ट आणि भारतातील वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्हणाल्या, ”द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे भारतातील आर्थिक परिवर्तनासाठी महत्त्वाची आहेत. जीसीसी गुंतवणूकीचा ओघ, स्थानिक एमएसएमई वाढ आणि सरकारचे विकसित भारताचे स्वप्न एकत्रितपणे लहान शहरांना महत्त्वपूर्ण करिअर हब्समध्ये बदलत आहेत. याचा अर्थ, अनेक भारतीयांना अर्थपूर्ण करिअर प्रगतीसाठी आता मोठ्या शहरात स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही. कारण ही १० उदयोन्मुख शहरे उद्योग, कार्ये आणि पदांसंदर्भात स्थानिक ठिकाणीच खऱ्या संधी देतात.”
तंत्रज्ञान, फार्मा व आर्थिक कंपन्या येत असल्याने भारतातील द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे टॅलेंट आकर्षण बनत आहेत
डेटा आणि एआयमधील तेजीच्या काळात, मिरॅकल सॉफ्टवेअर सिस्टम्स, इन्क (Miracle Software Systems, Inc) (विशाखापट्टणम), एचसीएलटेक (HCLTech) (विजयवाडा, मदुराई), इन्फोसिस (Infosys) (विजयवाडा), डेटामॅटिक्स (Datamatics) (नाशिक), बुल आयटी सर्विसेस (Bull IT Services) (मदुराई) यासारख्या तंत्रज्ञान कंपन्या द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमध्ये आपली उपस्थिती स्थापन करत आहेत, ज्यामुळे स्थानिक टॅलेंट क्रियाकलापांना चालना मिळत आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr. Reddy’s Laboratories), लॉरस लॅब्स लिमिटेड (Laurus Labs Limited), अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड (Alembic Pharmaceuticals Limited), सन फार्मा (Sun Pharma) सारख्या आरोग्यसेवा आणि फार्मा कंपन्या विशाखापट्टणम व वडोदरा येथे रोजगार संधी निर्माण करत आहेत. तर एचडीएफसी बँक (HDFC Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) रायपूर, आग्रा आणि जोधपूर येथे आर्थिक सेवांच्या वाढीला गती देत आहेत.
उदयोन्मुख शहरांमध्ये हायरिंग वाढीसाठी व्यवसाय विकास आणि अभियांत्रिकी पदांचा मोठा हातभार
नाशिक, रायपूर, राजकोट, आग्रा, वडोदरा आणि जोधपूरसह उदयोन्मुख १० पैकी ६ शहरांमध्ये व्यवसाय विकास पदे भरतीसाठी आघाडीची भूमिका बजावत आहेत. विशाखापट्टणम, विजयवाडा आणि मदुराईमधील प्रोफेशनल्ससाठी अभियांत्रिकी कार्यात सर्वाधिक रोजगार संधी निर्माण होत आहेत. विक्री, ऑपरेशन्स आणि शिक्षण ही इतर प्रमुख कार्ये आहेत, जेथे द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील प्रोफेशनल्स रोजगार शोधू शकतात.
सरकार होमटाऊन्सना करिअरच्या आकर्षण केंद्रात रूपांतरित करण्यासाठी स्मार्ट शहरे निर्माण करत आहेत
केंद्र आणि राज्य सरकारचा स्थानिक विकासासाठीचा प्रयत्न उदयोन्मुख शहरांच्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, विशेषतः: रांची (#२), जेथे स्मार्ट सिटी उपक्रम झारखंडमधील प्रोफेशनल्ससाठी राजधानीला उत्तम ठिकाण बनवत आहेत आणि राजकोट (#६), जेथे रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शहरी नियोजन आर्थिक विकासाला चालना देत आहे.