ओडीसीला झिप इलेक्ट्रिककडून ४०,००० वेईकल्‍सची ऑर्डर आणि गुंतवणूक मिळाली

News Service

ओडीसी इलेक्ट्रिकने राष्‍ट्रीय विकासाला चालना देण्‍यासाठी गुंतवणूक संपादित केली, तसेच ४०,००० वेईकल्‍ससाठी ऑर्डर मिळवली

मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2024 : ओडीसी इलेक्ट्रिक या भारतीय दुचाकी इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) ब्रँडने आपल्‍या
राष्‍ट्रीय विस्‍तारीकरणाला गती देण्‍यासाठी झिप इलेक्ट्रिककडून गुंतवणूक संपादित केली आहे. याअंतर्गत
पुढील तीन वर्षांमध्‍ये वितरित करण्‍यात येणाऱ्या ४०,००० इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी ऑर्डरचा देखील समावेश
आहे. या डिलमधून भारतात इलेक्ट्रिक गतीशीलतेचा झपाट्याने विकास आणि क्षमता दिसून येते.

या गुंतवणूकीमुळे ओडीसी इलेक्ट्रिकच्‍या बी२बी पेनेट्रेशनला चालना मिळण्‍याची, तसेच देशभरातील
डिलरशिप नेटवर्कमध्‍ये वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. उत्‍पादन आणि वितरण क्षमतांमध्‍ये वाढ करत
ओडीसीचा आपल्‍या उत्‍पादन क्षमतेमध्‍ये वाढ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे वैयक्तिक क्षेत्रातील शुद्ध व
कार्यक्षम गतीशीलता आणि डिलिव्‍हरी पर्यायांप्रती वाढत्‍या मागणीची पूर्तता होईल, तसेच शहरी व ग्रामीण
भागांमध्‍ये लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी स्‍पेसला गती मिळेल.

ओडीसी इलेक्ट्रिकचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. नेमिन वोरा या कराराबाबत मत व्‍यक्‍त करत म्‍हणाले,
‘’आम्‍हाला झिप इलेक्ट्रिकसोबतच्‍या या धोरणात्‍मक सहयोगाचे स्‍वागत करण्‍याचा आनंद होत आहे.
ओडीसी इलेक्ट्रिकमधील नवीन गुंतवणूक महत्त्वाचा क्षण आहे, जेथे आम्‍ही शद्ध, हरित भारत घडवण्‍याप्रती
प्रयत्‍न करत आहोत. त्‍यांचे सखोल उद्योग कौशल्‍य आणि ताफा इलेक्ट्रिफिकेशनचा दृष्टिकोन आमच्‍या
देशभरातील विस्‍तारीकरण योजनांना अधिक गती देईल, ज्‍यामधून इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी बी२बी व ग्राहक
मागणीची पूर्तता होईल. आम्‍ही भारतातील परिवहन व लॉजिस्टिक्‍स क्षेत्रात क्रांती घडवून आणण्‍यास
उत्‍सुक आहोत.’’

झिप इलेक्ट्रिकचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्‍ता म्‍हणाले, ‘’झिपची लास्‍ट माइल
डिलिव्‍हरीचे डिकार्बनायझेशन करण्‍यासाठी पुढील २ ते ३ वर्षांमध्‍ये बाजारपेठेत २००,००० ईव्‍ही तैनात
करण्‍याची महत्त्‍वाकांक्षा आहे. ओडीसी इलेक्ट्रिकमधील आमच्‍या गुंतवणूकीमधून ब्रँडचा दृष्टिकोन, उत्‍पादन
दर्जा

आणि भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील विकासगतीवरील आमचा विश्‍वास दिसून येतो. ओडीसीची
ईव्‍हींच्‍या सर्वोत्तम दर्जाप्रती कटिबद्धता आणि झिपच्‍या दीर्घकालीन गरजांना सानुकूल करण्‍याची क्षमता
आमच्‍या तत्त्वांशी संलग्‍न आहे. आम्‍हाला गतीशीलतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यासोबत भारतातील व भारताबाहेरील विविध शहरांमध्‍ये लास्‍ट माइल डिलिव्‍हरीज वाढवण्‍याच्‍या या प्रवासामध्‍ये
त्‍यांच्‍यासोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.’’

हा करार ओडीसी इलेक्ट्रिकसाठी मोठा टप्‍पा आहे, जेथे ते भारतभरात शाश्‍वत परिवहनाची खात्री घेत
आहेत.

२०२० मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली ओडीसी इलेक्ट्रिक भारतातील इलेक्ट्रिक वेईकल लँडस्‍केपला नवीन
आकार देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. ओडीसी इलेक्ट्रिक सर्वात मोठा उत्‍पादन पोर्टफोलिओ देते, ज्‍यामध्‍ये ७
मॉडेल्‍सचा समावेश आहे, ज्‍यापैकी २ लो-स्‍पीड स्‍कूटर्स, २ हाय-स्‍पीड स्‍कूटर्स, बी२बी विभागावर लक्ष्‍य
केलेली एक डिलिव्‍हरी स्‍कूटर, एक ईव्‍ही स्‍पोर्ट बाइक आणि दैनंदिन वापरकर्त्‍यांसाठी कम्‍यूटर बाइक आहे.
उत्‍पादन श्रेणीमध्‍ये पुढील मॉडेल्‍सचा समावेश आहे:-

  • इलेक्ट्रिक मोटरसायकल वेडर (७ इंच टचस्क्रिन अँड्रॉईड डिस्‍प्‍ले, एआयएस-१५६ प्रमाणित बॅटरी,
    पाच ड्राइव्‍ह मोड्स, १८-लीटर स्‍टोरेज स्‍पेस, प्रबळ रचना)
  • इलेक्ट्रिक बाइक ईव्‍होकिस (चार ड्राइव्‍ह मोड्स, कीलेस एण्‍ट्री, अॅण्‍टी-थेफ्ट लॉक आणि मोटर कट-
    ऑफ स्विच)
  • नवीन भर करण्‍यात आलेली हाय-स्‍पीड इलेक्ट्रिक स्‍कूटर स्‍नॅप (एआयएस १५६ प्रमाणित स्‍मार्ट
    पोर्टेबल बॅटरी, वॉटरप्रूफ मोटर, डिस्‍टन्‍स टू एम्‍प्‍टी व सीएएन सक्षम डिस्‍प्‍ले)
  • हाय स्‍पीड इलेक्ट्रिक स्‍कूटर हॉक एलआय (क्रूझ कंट्रोल व म्‍युझिक सिस्‍टमसह पोर्टेबल बॅटरी
    असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्‍कूटर)
  • लो-स्‍पीड – ई२गो लाइट, ई२गो+ आणि ई२गो ग्रॅफिन (पोर्टेबल बॅटरी, यूएसबी चार्जिंग, डिजिटल
    स्‍पीडोमीटर आणि कीलेस एण्‍ट्री असलेली इलेक्ट्रिक स्‍कूटर)
  • लो स्‍पीड इलेक्ट्रिक स्‍कूटर रेसर लाइट, व्‍ही२ लाइट आणि व्‍ही२+ (वॉटरप्रूफ मोटर, मोठे बूट स्‍पेस,
    ड्युअल बॅटरी आणि एलईडी लाइट्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button