थ्रेड लिफ्ट इनोव्हेशनवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

News Service

मुंबई : आरोग्य आणि सौंदर्य उपचार देणाऱ्या मिटोकॉन बायोमेडने अलीकडेच द हिल्टन, मुंबई सह दिल्लीमध्ये  ऍप्टोस थ्रेड लिफ्टिंग तंत्रज्ञानबद्दल  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांचा उद्देश भारतात अधिकाधिक लोकप्रिय होत असलेल्या नवीन पिढीच्या थ्रेड्सवर वैज्ञानिक दृष्टिकोन मांडून थ्रेड लिफ्ट तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा होता.  या कार्यक्रमांमध्ये  ऍप्टोस थ्रेड्सचे दूरदर्शी डॉ. जॉर्ज सुलेमॅनिड्झ,  शरीरशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डेनिज डेमिर्युरेक,तसेच प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. कॉन्स्टँटिन सुलेमानिडझे  उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमात  ऍप्टोस उपचार व सोल राइनोप्लास्टी उपचार पद्धतीचे लाईव्ह प्रतीक्षिक दाखवण्यात आले. जोडीला या कार्यक्रमात नमिका टेक्नॉलॉजी थ्रेड्स या जगातील पहिल्या  दीर्घकाळ टिकणाऱ्या ठोस बायोसिम्युलेटर थ्रेड्सचे  सादरीकरण करण्यात आले.  या कार्यक्रमाची सांगता ही थ्रेड लिफ्टिंगबद्दलचा पॅनल चर्चेद्वारे झाली.  या चर्चासत्रात या क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींनी भाग घेतला होता. त्यांनी थ्रेड लिफ्टिंगच्या उज्ज्वल भविष्यावर विशेष भर देऊन नॉन-सर्जिकल सौंदर्यशास्त्रातील नवीनतम ट्रेंड्स, आव्हाने आणि संधींवर चर्चा केली.

मिटोकॉन बायोमेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री जिनांग धामी म्हणाले की, सौंदर्य आणि आरोग्य सेवा हा लोकांचा वैयक्तिक प्रवास आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. अत्याधुनिक उपायांसह उद्योगाला पुढे नेण्याची आमची वचनबद्धता आम्हाला ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यात मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button