व्यवसाय-केंद्रित प्लॅटफॉर्म, जे सर्व प्रमुख चलनांमध्ये साह्य करते, रूपयांमध्ये सेटलेमेंट करते आणि अंतर्गत अनुपालन करते
मुंबई/दिल्ली, भारत, ३१ मार्च २०२६: पे१० (Pay10) या आघाडीच्या पर्यायी पेमेंट प्रदाता कंपनीने आज आपल्या ‘नो बॉर्डर्स. जस्ट बिझनेस’ मोहिमेच्या माध्यमातून पे१० वर्ल्डच्या लाँचची घोषणा केली. भारतातील व्यवसायांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि त्यांचे रोख प्रवाहाचे चक्र सोपे व जलद करण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘पेमेंट एग्रिगेटर – क्रॉस बॉर्डर’ (पीए-सीबी) फ्रेमवर्क अंतर्गत पूर्ण अधिकृतता मिळाल्यानंतर कंपनीने ही सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे निर्यात आणि आयात दोन्ही व्यवहारांसाठी नियमानुसार सीमापलीकडे पेमेंट सेवा देणे शक्य झाले आहे.

‘पे१० वर्ल्ड’ भारतातील व्यवसायांना आंतरराष्ट्रीय पेमेंट स्वीकारण्यास आणि एकात्मिक यंत्रणेच्या माध्यमातून सेटलमेंटचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करते. हा प्लॅटफॉर्म जागतिक पेमेंट पद्धतींना भारतातील रिअल-टाइम पेमेंट परिसंस्थेशी कनेक्ट करतो. यामुळे आंतरराष्ट्रीय ग्राहक त्यांच्या स्थानिक चलनात पैसे देऊ शकतात, तर भारतातील व्यवसायांना त्यांचे सेटलमेंट भारतीय रुपयांमध्ये मिळते. तसेच, हा प्लॅटफॉर्म एफआयआरए जनरेशनसह सर्व कायदेशीर अनुपालन प्रक्रिया स्वयंचलित करतो.
लाँच करण्यात आलेली मोहिम ‘नो बॉर्डर्स. जस्ट बिझनेस’ दैनंदिन स्थिती आणि हलक्या-फुलक्या विनोदाचा वापर करत व्यवसायांना संथ प्रक्रियांपासून विविध व्हेरिफिकेशन पायऱ्यांपर्यंत सामना कराव्या लागणाऱ्या सामान्य आव्हानांना प्रकाशझोतात आणते, तसेच पेमेंट्स सोपे व विनासायासपणे करता येऊ शकतात, हे निदर्शनास आणते. तीन जाहिरातींच्या माध्यमातून ही मोहिम निर्यातदारांना सामना करावी लागणारी आव्हाने नवीन व सर्वसमावेशक पद्धतीने सादर करते, साध्या कथानकांच्या माध्यमातून दैनंदिन समस्यांना दाखवते, तसेच निदर्शनास आणते की पे१० वर्ल्ड जागतिक स्तरावर जाणाऱ्या भारतातील व्यवसायांसाठी सोपे, आधुनिक सोल्यूशन देतो.
निर्यातीव्यतिरिक्त पे१० वर्ल्ड सीमेपलीकडील आयात प्रक्रिया देखील सोपी करतो, जेथे भारतातील ग्राहकांना विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना साह्य करतो. व्यवसाय जगभरात खरेदींसाठी प्रत्यक्ष रूपयांमध्ये पेमेंट करू शकतात, जेथे प्लॅटफॉर्म व्यापाऱ्यांना त्यांच्या संबंधित चलनांमध्ये सेटलमेंट करण्याची सुविधा देतो. यामधून सोपी आयात प्रक्रिया, योग्य अंदाज आणि सीमेपलीकडील व्यवसायासाठी आधुनिक, विकासात्मक आराखड्याची खात्री मिळते.
पे१० चे संस्थापक व अध्यक्ष प्रभप्रीत सिंग गिल (हॅरी गिल) म्हणाले, ”झपाट्याने विकसित होत असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फायनान्स सेवा पारंपारिक मर्यादांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. पे१० वर्ल्डसह आम्ही भविष्यासाठी सज्ज पेमेंट पायाभूत सुविधा उभारत आहोत, ज्या बाजारपेठांना विनासायासपणे एकत्र करतात आणि निष्पक्षपणे जागतिक व्यवसाय उपलब्ध करून देतात. आमचा दृष्टिकोन प्रबळ नियामकाशी, सीमांपलीकडे काम करणाऱ्या अंतर्गत यंत्रणा निर्माण करण्याप्रती कटिबद्धतेशी, तसेच भारताच्या ‘व्हिजन २०३०’शी सुसंगत आहे, ज्याने राष्ट्रीय फिनटेक परिसंस्थेला जागतिक स्तरावर र्स्धा करण्यास सक्षम करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
पे१० इंडियाचे सीईओ डॉ. अतुल मेहता म्हणाले, ”पे१० वर्ल्डसह आम्ही पेमेंट्स, सेटलमेंट्स व अनुपालन एकत्रित सोपे करत सीमेपलीकडील व्यवसायामध्ये अधिक अचूकता व नियंत्रण आणण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. भारतातील अधिकाधिक व्यवसाय जागतिक स्तरावर विस्तारित होत असताना आमचा सीमेपलीकडील व्यवहार अधिक विश्वसनीय आणि व्यवस्थापन करण्यास सोपे करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आत्मविश्वासाने कामकाज करू शकतात.”
व्यवसाय अधिक माहितीसाठी आणि सेवा सुरू करण्यासाठी https://www.pay10.in/ येथे भेट देऊ शकतात.