एचडीएफसी लाइफकडून शाश्‍वत कामगिरी आणि सातत्‍यपूर्ण डिलिव्‍हरीच्‍या आणखी एका वर्षाची नोंद; वैयक्तिक एपीईमध्‍ये १८ टक्‍क्‍यांची वाढ, नवीन व्‍यवसायाच्‍या मूल्‍यामध्‍ये १३ टक्‍यांची वाढ आणि एकूण मार्केट शेअरमध्‍ये ७० बीपीएसची वाढ

News Service

मुंबई, एप्रिल २०२५ – एचडीएफसी लाइफच्‍या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२५ रोजी समाप्‍त झालेल्‍या वर्षासाठी स्‍वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्‍वीकारले आहेत. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्‍ये सर्वोत्तम कामगिरी करत क्षेत्रापेक्षा अधिक झपाट्याने वाढ केली.

कामगिरीची ठळक वैशिष्‍ट्ये:

  • उच्‍च-स्‍तरीय वाढ: वैयक्तिक एपीईमध्‍ये प्रबळ १८ टक्‍के वाढीची नोंद केली, ज्‍याला विक्री करण्‍यात आलेल्‍या पॉलिसी, तिकिट आकार आणि संतुलित उत्‍पादन मिश्रणामध्‍ये वाढीचे पाठबळ मिळाले.
  • मार्केट शेअर: एकूण मार्केट शेअर (वैयक्तिक डब्‍ल्‍यूआरपी) आर्थिक वर्ष २५ च्‍या ११ महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी ७० बीपीएसने वाढून ११.१ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले. खाजगी क्षेत्र मार्केट शेअर १५.७ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले, ज्‍यामध्‍ये ३० बीपीएसची वाढ झाली.
  • नवीन व्‍यवसायाचे मूल्‍य (व्‍हीएनबी) १३ टक्‍क्‍यांनी वाढून ३,९६२ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, ज्‍यामधून लाभदायी व्‍यवसायामधील प्रबळ वाढ दिसून येते.
  • अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम): एयूएम ३१ मार्च २०२५ रोजी ३,३६,२८२ लाख कोटी रूपये राहिले, ज्‍यामध्‍ये वार्षिक १५ टक्‍क्‍यांची वाढ झाली.
  • सातत्‍यता: १३व्‍या व ६१व्‍या महिन्‍याचे सातत्‍यता प्रमाण अनुक्रमे ८७ टक्‍के आणि ६३ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे आमच्‍या ६१व्‍या महिन्‍याच्‍या सातत्‍यता प्रमाणामध्‍ये १००० बेसिस पॉइण्‍ट्सची मोठी सुधारणा झाली, यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्‍न होण्‍यासोबत त्‍यांना कायम ठेवण्‍याची क्षमता दिसून आली.
  • एम्‍बेडेड व्‍हॅल्‍यू (ईव्‍ही) १७ टक्‍क्‍यांनी वाढून ५५,४२३ कोटी रूपयांवर पोहोचली, तसेच ईव्‍हीवरील कार्यरत परताव्‍यामध्‍ये १६.७ टक्‍क्‍यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्‍य नि‍र्मिती दिसून आली.
  • आर्थिक वर्ष २५ च्‍या बारा महिन्‍यांमध्‍ये १,८०२ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्‍यात आला, ज्‍यामध्‍ये वार्षिक १५ टक्‍के वाढीची नोंद करण्‍यात आली, ज्‍याला आमच्‍या बॅक बुकमधील मिळालेल्‍या नफ्यामधील १८ टक्‍के वाढीची मदत झाली. आमच्या लाभांश देयक धोरणानुसार, संचालक मंडळाने प्रति शेअर २.१ रूपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे, ज्यामुळे जवळपास ४५२ कोटी रूपयांचे पेमेंट होईल.
  • सॉल्वन्सी रेशिओ १९४ टक्‍के राहिले, जे नियामक थ्रेशोल्‍ड १५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त होते.
  • कर्मचाऱ्यांवर फोकस: २०२५ मध्‍ये ग्रेट प्‍लेस टू वर्क म्‍हणून प्रमाणित, ज्‍यामधून कर्मचाऱ्यांच्‍या स्‍वास्‍थ्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते. तसेच ग्रेट प्‍लेस टू वर्ककडून नाविन्‍यतेची संस्‍कृती घडवण्‍यासाठी टॉप ५० संस्‍थांमध्‍ये मान्‍यता मिळाली. एचडीएफसी लाइफला त्‍यांची सर्वसमावशेकता आणि कर्मचारी-अनुकूल धोरणांसाठी सन्‍मानित करण्‍यात आले, जसे बीएफएसआय क्षेत्रामध्‍ये बेस्‍ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया २०२४ पुरस्‍कारासह आणि अवतार अँड सेरामाऊंट यांच्‍याद्वारे एक्झिम्‍प्‍लर ऑफ इन्‍क्‍लुजन (मोस्‍ट इन्‍क्‍लुसिव्‍ह कंपनीज इंडिया २०२४) म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले.

मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे विधान:
एचडीएफसी लाइफच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्‍हणाल्‍या, “आर्थिक वर्ष २५ मध्‍ये आम्‍ही आमची पोहोच अधिक वाढवली, आमच्‍या मूल्‍य तत्त्वांना अधिक दृढ केले आणि आमच्‍या व्‍यवसाय मॉडेलच्‍या दृढतेला दाखवले. आम्‍हाला वर्षासाठी आमच्‍या निर्धारित विकास महत्त्वाकांक्षांशी बांधील राहत आर्थिक वर्ष २५ साठी वैयक्तिक एपीईमध्‍ये १८ टक्‍के वाढीची नोंद करण्‍याचा आनंद होत आहे. आमचा एकूण उद्योग मार्केट शेअर ७० बीपीएसने वाढून ११.१ टक्‍क्‍यांपर्यंत आणि खाजगी क्षेत्रात ३० बीपीएसने वाढून १५.७ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला.

एपीईमध्‍ये २५ टक्‍के वाढीसह रिटेल प्रोटेक्‍शनने प्रबळ गती कायम राखली. सर्व माध्‍यमांनी दोन-अंकी वाढीची नोंद केली. आम्‍ही सर्वोत्तम डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍सच्‍या माध्‍यमातून ग्राहक अनुभव अधिक उत्‍साहित करत आहोत, जेथे ९० टक्‍क्‍यांहून अधिक सर्विस विनंत्‍यांची आता सेल्‍फ-सर्विसच्‍या माध्‍यमातून हाताळणी केली जात आहे.

आम्‍ही आमच्‍या कार्यसंचालनाच्‍या २५व्‍या वर्षात प्रवेश करत असताना स्थिर नियामक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर क्षेत्राच्या टॉपलाइन वाढीला सातत्याने मागे टाकण्याची, एपीई वाढीच्या अनुषंगाने व्हीएनबी वाढ प्रदान करण्याची आणि दर ४ ते ४.५ वर्षांनी दुहेरी प्रमुख मेट्रिक्स मिळवण्याची आमची महत्त्वाकांक्षा कायम आहे.”

प्रमुख आर्थिक सारांश
कोटी रूपये आर्थिक वर्ष २५ चे बारा महिने आर्थिक वर्ष २४ चे बारा महिने वार्षिक वाढ
प्रमुख आर्थिक आणि अॅक्चुरियल मेट्रिक्‍स
वैयक्तिक एपीई १३,६१९ ११,५०९ १८ टक्‍के
एकूण एपीई १५,४७९ १३,२९१ १६ टक्‍के
नवीन बिझनेस प्रीमियम (वैयक्तिक + ग्रुप) ३३,३६५ २९,६३१ १३ टक्‍के
नूतनक्षम प्रीमियम (वैयक्तिक + ग्रुप) ३७,६८० ३३,४४५ १३ टक्‍के
एकूण प्रीमियम ७१,०४५ ६३,०७६ १३ टक्‍के
असेट्स अंडर मॅनेजमेंट ३,३६,२८२ २,९२,२२० १५ टक्‍के
करोत्तर नफा १,८०२ १,५६९ १५ टक्‍के
इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू ५५,४२३ ४७,४६८ १७ टक्‍के
नवीन व्‍यवसायाचे मूल्य ३,९६२ ३,५०१ १३ टक्‍के

आर्थिक वर्ष २५ चे बारा महिने    आर्थिक वर्ष २४ चे बारा महिने 

मुख्य आर्थिक रेशिओ
नवीन व्‍यवसायाचे मार्जिन्स २५.६ टक्‍के २६.३ टक्‍के
ईव्हीवर ऑपरेटिंग रिटर्न १६.७ टक्‍के १७.५ टक्‍के
एकूण खर्च / एकूण प्रीमियम १९.८ टक्‍के १९.४ टक्‍के
सॉल्वन्सी रेशिओ १९४ टक्‍के १८७ टक्‍के
१३ महिने / ६१ महिने सातत्यता ८७ टक्‍के/६३ टक्‍के ८७ टक्‍के/५३ टक्‍के
वैयक्तिक डब्ल्यूआरपी मार्केट शेअर (एकूण)१ ११.१ टक्‍के १०.४ टक्‍के
वैयक्तिक एपीईद्वारे उत्पादन मिश्रण (यूएल/ नॉन पर सेव्हिंग्स /अॅन्युइटी/ संरक्षण/ पर) ३९/३२/५/५/१९ ३५/३०/६/५/२३
वैयक्तिक एपीईद्वारे वितरण मिश्रण (कॉर्प एजंट्स / एजन्सी / ब्रोकर/ डायरेक्ट) ६५/१८/७/१० ६५/१८/६/११
टिप: १. ११ महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी
टक्‍केवारी एकूण प्रभावामुळे वाढलेली दिसेलच असे नाही.

व्याख्या आणि संक्षेप
• अॅन्युलाइज्ड प्रीमियम इक्विव्हॅलंट (एपीई) – वार्षिकीकृत पहिल्या वर्षाच्या नियमित प्रीमियम्स आणि १० टक्‍के भारित सिंगल प्रीमियम तसेच सिंगल प्रीमियम टॉपअप्सची रक्‍कम.
• अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) – विमा कंपनीने व्यवस्थापित केलेली समभागधारक आणि पॉलिसीधारकांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य.
• एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट (ईव्हीओपी) – एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट (“ईव्हीओपी”) हे कोणत्याही दिलेल्या कालावधीत ईव्हीमधील वाढीचे माध्यम असून त्यातून आर्थिक घटकांमधील बदल तसेच भांडवल समावेश किंवा लाभांश प्रदान यांच्यासारख्या समभागधारकांच्या कृतींमुळे ईव्‍हीवर झालेला प्रभाव वजा केला जातो.
• पहिल्या वर्षाचा प्रीमियम – आर्थिक वर्षात पहिल्या पॉलिसी वर्षात प्राप्‍त झालेले नियमित प्रीमियम. उदाहरणार्थ, मार्च २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या मासिक स्तरावरील पॉलिसीसाठी प्राप्‍त झालेला पहिला मासिक हप्‍ता २०२४-२५ साठी पहिल्या वर्षाचा प्रीमियम मानला जाईल आणि पहिल्या पॉलिसी वर्षातील उर्वरित ११ हप्‍ते प्राप्‍त झाल्यावर २०२५-२६ मधील पहिल्या वर्षाचे प्रीमियम मानले जातील.
• नवीन बिझनेसमुळे मिळालेला प्रीमियम – नवीन बिझनेसमुळे पहिल्या वर्षातील प्रीमियम आणि एकल प्रीमियमची रक्‍कम जी एकूण प्रीमियम म्हणून दर्शवली जाते.
• ऑपरेटिंग खर्च – यात नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी आलेला खर्च आणि पॉलिसी सर्व्हिसिंगसाठी (देखभाल खर्च मानले गेलेले) आलेले खर्च समाविष्‍ट केले जातात, ज्यात समभागधारकांचे खर्च समाविष्‍ट असतात. त्यात कमिशन समाविष्‍ट नसते.
• ऑपरेटिंग खर्चाचा रेशिओ – ऑपरेटिंग खर्चाचा (समभागधारकांच्या खर्चासह) एकूण प्रीमियमशी असलेला रेशिओ.
• ईव्हीवरील ऑपरेटिंग रिटर्न – ईव्हीवरील ऑपरेटिंग रिटर्न म्हणजे दिलेल्या कालावधीत ईव्हीओपी (एम्बेडेड व्हॅल्यू ऑपरेटिंग प्रॉफिट)चा त्या कालावधीच्या सुरूवातीला ईव्हीशी असलेला रेशिओ होय.
• सातत्यता – कमी झालेल्या बिझनेसपासून नूतनीकरण झालेल्या बिझनेसचे प्रमाण. हा रेशिओ दिलेल्या पॉलिसीज आणि प्रीमियम्सच्या संख्येच्या संदर्भात मोजला जातो.
• प्रीमियम लेस बेनिफिट्स पेआऊट्स – मिळालेला एकूण प्रीमियम आणि प्रदान केलेले लाभ यांच्यातील फरक (सकल पुनर्विमा).
• रिन्यूअल प्रीमियम – पहिल्या पॉलिसी वर्षानंतर प्राप्‍त झालेले नियमित रिकरिंग प्रीमियम.
• सॉल्वन्सी रेशिओ – सॉल्वन्सी मार्जिन राखण्यासाठी उपलब्ध असलेल्या सॉल्वन्सी मार्जिनचा रेशिओ.
• एकूण प्रीमियम – पहिल्या वर्षाच्या, एकल व नूतनक्षम प्रीमियमसह वैयक्तिक आणि समूह व्यवसायासाठी वर्षभरात प्राप्‍त झालेले एकूण प्रीमियम.
• वेटेड रिसीव्ह्ड प्रीमियम (डब्ल्यूआरपी) – वर्षभरात प्राप्‍त झालेल्या पहिल्या वर्षाचे प्रीमियम आणि टॉप-अप प्रीमियम्ससह १० टक्‍के एकल प्रीमियम्सची बेरीज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button