फायझरकडून भारतात मायग्रेनपासून त्‍वरित आराम आणि सर्वोत्तम उपचारासाठी नवीन ओरल मेडिसीन ‘रिमेगपेंट’ लाँच

News Service
  • रिमेगपेंट हे ओरली डिसइंटीग्रेटिंग टॅब्‍लेट (ओडीटी) (तोंडामध्‍ये विरघळणारी गोळी) आहे, या दर्जाच्‍या औषधाला कॅल्शिटोनिन जीन-रिलेटेड पेप्‍टाइड (सीजीआरपी) रिसीप्‍टर अॅण्‍टागोनिस्‍ट म्‍हणतात.
  • ट्रिप्‍टन्‍सला पूर्वी अपुरा प्रतिसाद देणाऱ्या प्रौढांमधील ऑरासह किंवा ऑराशिवाय मायग्रेनच्‍या सर्वोत्तम उपचारासाठी डीसीजीआयकडून मान्‍यताप्राप्‍त. हे औषध आता ७५ मिलीग्रॅम ओरल डिसइंटीग्रेटिंग टॅब्‍लेटच्‍या स्‍वरूपात उपलब्‍ध आहे आणि जेवण सेवन केल्‍यानंतर किंवा सेवन करण्‍यापूर्वी घेता येऊ शकते.

मुंबई, नोव्‍हेंबर १७, २०२५: फायझरने भारतात ट्रिप्‍टनला पूर्वी अपुरा प्रतिसाद देणाऱ्या प्रौढांमधील ऑरासह किंवा ऑराशिवाय मायग्रेनच्‍या सर्वोत्तम उपचारासाठी रिमेगपेंट ओडीटीच्‍या लाँचची घोषणा केली आहे. हे नवीन औषध उपचारानंतर जवळपास ४८ तासांपर्यंत वेदनेपासून त्‍वरित व स्थिर आराम देते, तसेच औषधाच्‍या अतिवापरामुळे डोकेदुखी होत नाही. हे औषध कामावर त्‍वरित परतण्‍यास सक्षम करते आणि त्रास देणाऱ्या लक्षणांपासून सतत आराम देते. रिमेगपेंट ७५ मिलीग्रॅम ओरली डिसइंटीग्रेटिंग टॅब्‍लेट (ओडीटी) स्‍वरूपात उपलब्‍ध असेल, जे पाण्‍याशिवाय सोईस्‍करपणे सेवन करता येते.

रिमेगपेंट भारतातील बाजारपेठेत सर्वसमावेशक मायग्रेन केअरमध्‍ये नवीन मानक स्‍थापित करते, जेथे मायग्रेनने पीडित रूग्‍णांना वेळेवर आणि त्‍वरित वेदनेपासून आराम देते. मायग्रेनच्‍या पॅथेफिजिओलॉजीमधील मुख्‍य घटक कॅल्शिटोनिन जीन-रिलेटेड पेप्‍टाइड (सीजीआरपी)वर लक्ष्‍य करत हे औषध त्‍वरित व गुणकारी आराम देते.

फायझर लि.च्‍या भारतातील व्‍यवस्‍थापकीय संचालक मीनाक्षी नेवाटिया म्‍हणाल्‍या, ”आम्‍हाला भारतात रिमेगपेंट लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. या औषधाचा मायग्रेनने पीडित व्‍यक्‍तींवर मोठा अनुकूल प्रभाव पडेल. आमचा विश्वास आहे की, हे उपचार मायग्रेनने पीडित व्‍यक्‍तींना वेदनेचे अधिक कार्यक्षमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास आणि सध्‍या उपलब्‍ध असलेल्‍या पर्यायांच्‍या तुलनेत अधिक आराम मिळण्‍यास मदत करेल. फायझरमध्‍ये आमचा यशस्‍वी सुधारणा आणण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍या रूग्‍णांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील. रिमेगपेंटच्‍या लाँचसह आम्‍ही आमचा उद्देश साध्‍य करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत आहोत.”

रिमेगपेंट उदयोन्‍मुख मायग्रेन थेरपी म्‍हणून उदयास येत आहे, जेथे सीजीआरपी रिसीप्‍टरला प्रतिबंध करते. अनुकूल सुरक्षिततेची खात्री देत हे औषध रूग्‍णांना दैनंदिन कामकाज सहजपणे करण्‍यास सक्षम करते.

भारतात मायग्रेनचे मोठे आव्‍हान आहे, जेथे दरवर्षाला जवळपास २१३ दशलक्ष व्‍यक्‍तींना मायग्रेनचा त्रास होतो, तसेच प्रतिवर्ष जवळपास १७३ दिवस उत्‍पादकतेचे नुकसान होते. फायझरची नवीन थेरपी प्रगत उपचार पर्याय देत ही तफावत दूर करण्‍याचा प्रयत्‍न करते, तसेच मायग्रेनचे उत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍याकरिता नाविन्‍यपूर्ण सोल्‍यूशन्‍ससाठी दीर्घकाळापासून वैद्यकीय गरजेची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button