नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२६: कोका-कोला कंपनीचा आयकॉनिक स्पोर्ट्स हायड्रेशन ब्रॅण्ड पॉवरेडने जगातील काही सर्वात लक्षणीय इव्हेन्ट्सपैकी एक असलेल्या आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केले आहे. क्रीडा, अॅक्टिव्हिटी आणि बदलत्या जीवनशैलींमध्ये रुजलेल्या ब्रॅण्ड्सच्या साथीने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यावरील कोका-कोला इंडियाचा भर या सामन्यांचे ऑफिशियल स्पोर्ट्स ड्रिंक म्हणून पॉवरएडच्या उपस्थितीमुळे नव्याने अधोरेखित झाला आहे.
स्पोर्ट्स हायड्रेशन सोल्यूशन म्हणून डिझाइन करण्यात आलेल्या पॉवरएडमध्ये व्हिटॅमिन B3 आणि इलेक्ट्रोलाइट्स आहेत, जे खेळांच्या सादरीकरणासाठी लागणारी ऊर्जा पुरवितात, त्यामुळे हे ड्रिंक खडतर प्रशिक्षण, स्पर्धात्मक खेळ आणि सक्रिय जीवनशैलीसाठी साजेसे ठरते. पॉवरएड माऊंटन ब्लास्ट (ब्लू) आणि फ्रुट पंच (रेड) अशा दोन फ्लेवर्समध्ये व कमी कॅलरी असलेल्या फॉर्म्युलेशनसह बाजारात दाखल करण्यात आले आहे, ज्यात ग्राहकांची बदलती पसंत प्रतिबिंबित झाली आहे.
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी अहमदाबादमध्ये भारताच्या प्रमुख सुपर ८ मॅचदरम्यान मैदानावर केलेल्या एका अत्यंत प्रभावी जाहिरातीच्या रूपात या उत्पादनाचे पदार्पण झाले. पॉवरएडने सामन्याच्या दिवशी मैदान काबीज केले व शक्तिशाली दृश्य उपस्थितीद्वारे भारतातील आपल्या आगमनाची घोषणा केली.

या पदार्पणाविषयी बोलताना कोका-कोला इंडिया आणि नैऋत्य आशियासाठीचे मार्केटिंग, हायड्रेशन, स्पोर्ट्स व टी विभागासाठीच्या सीनिअर डायरेक्टर अंकिता माहना म्हणाल्या, “खेळ हा भारताच्या रस्त्यांवर, मैदानांवर, जिमखान्यांत आणि दैनंदिन जीवनात वसतो. पॉवरएडचा भारतातील प्रवेश खडतर कष्टांच्या या क्षणांमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आहे, मग ते व्यावसायिकरित्या प्रशिक्षण घेत असोत, वा दर दिवशी स्वत:ला थोडं पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांत असोत. आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या पदार्पणामुळे आम्हाला एक दमदार आरंभ करून दिला आहे, पण या सामन्यांच्या पलीकडे जाण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. एक दीर्घकाळ टिकणारा स्पोर्ट्स हायड्रेशन ब्रॅण्ड म्हणून आम्ही पॉवरएडची उभारणी करत आहोत, जो भारताच्या क्रीडाक्षेत्राशी निगडित महत्त्वाकांक्षांसोबत व त्याच्या वाढत्या सक्रिय जीवनशैलींबरोबर मोठा होत जाईल.”
या पदार्पणाला “फ्युअल युअर पॉवर” असे शिर्षक असलेल्या एका अत्यंत प्रभावी, इंटिग्रेडेट मार्केटिंग मोहिमेचा आधार लाभला आहे, जिचा मथळा भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ माजवून देणारा शुभमन गिल आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता क्रिडापटू नीरज चोप्रा या दोघांच्या नावांनी सजला आहे व या मोहिमेच्या निमित्ताने क्रिकेट आणि अॅथलेटिक्सच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचे प्रतिनिधीत्व करणारे दोन खेळाडू एकत्र आले आहेत.
“पॉवरएडच्या भारतातील पदार्पणासाठी आम्ही एका सर्वसाधारण क्रिडापटूच्या मानसिकतेचा खोलात जाऊन वेध घेण्याचे ठरविले. तिथे मन आणि शरीर यांच्यामध्ये सतत युद्ध सुरू असते, जिथे मनाची थांबण्याची तयारी नसते, पण शारीरिक ऊर्जेची पातळी सांगत असते, ‘थांब’. आणि पॉवरएड त्यांना कशाप्रकारे पुढे जाण्याचं इंधन पुरविते हे सांगितले आहे. शुभमन गिल आणि नीरज चोप्रा यांच्या रूपाने आम्हाला अत्यंत साजेशी व्यक्तिमत्त्वं सापडली, जे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स आयकॉन्स जरूर आहेत, पण पडद्यामागे वर्कआऊट करतानाची त्यांची धडपड बरीचशी आपल्यापैकी कुणाहीसारखी असू शकेल. ज्यामुळे पॉवरएड प्रत्येकाच्या ताकदीसाठीचे इंधन बनते.” ओगिल्व्ही इंडियाचे सीसीओ सुकेश नायक म्हणाले.
क्रिकेटमधील उत्कंठा आणि अॅथलेटिक्सची ताकद यांना एकत्र आणणारी ही जाहिरात मोहीम खेळाबद्दलचे एक वैश्विक सत्य अधोरेखित करते: जेव्हा थकवा जाणवू लागतो आणि तणाव वाढतो, तेव्हा योग्य इंधन सारा बदल घडवून आणते. अखंड चालणाऱ्या प्रशिक्षण सत्रांपासून ते सामन्यांमधील निर्णायक क्षणांपर्यंत साऱ्याच गोष्टी खेळातील कामगिरीमध्ये सातत्य, तयारी आणि योग्य आधार यांची मागणी करतात.
या कथनाच्या गाभ्याशी पॉवरएडचे वैज्ञानिकरित्या फॉर्म्युलेट करण्यात आलेले स्पोर्ट ड्रिंक आहे, ज्याची रचना व्यावसायिक अॅथलिट्सना तसेच फिटनेसला वाहून घेतलेल्यांना ऊर्जा पुरविण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.
शुभमन गिल पुढे म्हणाला, “खेळातील खूप सारे काम हे प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापासून दूर, प्रशिक्षणांमध्ये आणि ऊर्जेची पुनर्भरणी करताना होत असते. हायड्रेटेड राहणे हा त्याचा प्राथमिक पण महत्त्वाचा भाग आहे आणि पॉवरएड भारतात दाखल होत असताना त्याच्याशी जोडले गेल्याचा मला आनंद आहे.”
यात भर घालताना नीरज चोप्रा म्हणाला, “खेळामध्ये, विशेषत: खडतर प्रशिक्षणाच्या दिवसांत तयारी म्हणजे सर्वकाही असते. पॉवरएडला भारतात पदार्पण करताना व विविध क्रिडाशाखांतील क्रिडापटूंना पाठबळ देताना पाहून खूप छान वाटत आहे.”
मार्च २०२६ पासून पॉवरएड भारतात उपलब्ध होईल. २५० मिलीसाठी रु. २० त्याचबरोबर ५०० मिली आकाराच्या पॅकसाठी रु. ५० अशा किंमतीमध्ये बाजारात दाखल करण्यात आले असून त्यामुळे भारतात कोका-कोला इंडियाचा पोर्टफोलिओ व बदलत्या जीवनशैली तसेच ही पेये विकत घेण्याच्या बदलत्या प्रसंगांना साजेशा पेयांचे पर्याय उपलब्ध करून देण्याप्रतीची बांधिलकी अधिक दृढ होणार आहे.