मुंबई, १९ डिसेंबर: गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून, रीमा ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (RTPL) हे रस्ते वाहतूक क्षेत्रात एक विश्वसनीय नाव आहे आणि ते भारताच्या तापमान-नियंत्रित लॉजिस्टिक्स परिसंस्थेमध्ये एक प्रमुख भागीदार म्हणून कार्यरत आहे, जे विश्वसनीय, नियमांनुसार आणि तंत्रज्ञान-आधारित सेवांद्वारे औषधनिर्माण क्षेत्राला सहाय्य करते. 175 पर्यंत वाहनांच्या ताफ्यासह, RTPL पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात कार्यरत आहे आणि अग्रगण्य देशांतर्गत व बहुराष्ट्रीय औषध कंपन्या तसेच एफएमसीजी, मिठाई आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या क्षेत्रांतील ग्राहकांना सेवा देते.
आरटीपीएल ने आपली उत्तम ऑपरेशनल शिस्तबद्धता, प्रक्रियेमधील उत्कृष्टता आणि सतत नाविन्यता आणण्याप्रती कटिबद्धतेच्या माध्यमातून कोल्ड चेन क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवले आहे. कंपनी प्रबळ एसओपी, सर्वसमावेशक आपत्कालीन नियोजन आणि प्रगत देखरेख तंत्रज्ञानांचे एकीकरण करत आपल्या नेटवर्कवर बारकाईने देखरेख ठेवते. रिअल-टाइम टेम्परेचर ट्रॅकिंग, ऑटोमेटेड अलर्ट्स आणि डिजिटल कंट्रोल सिस्टम्स खात्री देतात की प्रत्येक कन्साइनमेंट आवश्यक तापमान मर्यादेमध्ये व कालावधीत वितरित केली जाईल, ज्यामध्ये अधिक सुरक्षितता व पारदर्शकता राखली जाते. या दृष्टिकोनासह आरटीपीएल मुंबई-गोवा अशा प्रमुख महामार्गांवर, तसेच चेन्नई, बेंगळुरू व हैदराबाद अशा महत्त्वपूर्ण दक्षिणकेडील मार्गांवर वेळेवर फार्मा मालाचे सहजपणे व्यवस्थापन करते.
आपल्या कोल्ड चेन क्षमतांना अधिक प्रबळ करत आरटीपील ने नुकतेच भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स लिमिटेडच्या पूर्णपणे डिझाइन केलेल्या रीफर ट्रक्ससह आपला ताफा वाढवला. नवीन भर करण्यात आलेले ट्रक्स आहेत सहा टाटा एलपीटी १८१६ युनिट्स आणि टाटा एलपीटी १११२ व एलपीटी ७१० चे प्रत्येकी दोन युनिट्स. या सर्व ट्रक्समध्ये प्रगत रीफर बॉडीज आणि एफएमएस-सक्षम मॉनिटरिंग सिस्टम्स आहेत. टाटाच्या विश्वसनीय एलपीटी प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात आलेली या वेईकल्स उच्च दर्जाची इंधन कार्यक्षमता, विस्तारित सर्विस इंटरव्हल्स, उच्च ग्रेडेबिलिटी आणि एर्गोनॉमिक वॉक-थ्रू केबिन देतात, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या अंतरापर्यंत फार्मास्युटिकल वाहतूकीसाठी अनुकूल आहेत.
तंत्रज्ञान व पायाभूत सुविधेव्यतिरिक्त आरटीपीएल नियमित प्रशिक्षण, सुरक्षितता कार्यशाळा आणि प्रत्यक्ष कौशल्य निर्माण सत्रांचे आयोजन करते, ज्यामुळे कंपनीचे ड्रायव्हर्स अचूकता व अधिक काळजीसह संवेदनशील फार्मा कन्साइनमेंट्सची हाताळणी करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.
या सहयोगाबाबत मत व्यक्त करत रीमा ट्रान्सपोर्ट प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप नाईक आणि अध्यक्ष श्री. अशोक कोठारी म्हणाले, ”आमचे कोल्ड चेन ऑपरेशन्स सहयोगींवर अवलंबून आहेत, जे प्रत्येक टप्प्यावर विश्वसनीयता, कार्यक्षमता आणि अनुपालनाची खात्री घेतात. टाटा मोटर्सच्या विश्वसनीय वेईकल्स, तसेच त्यांचे व्यापक सर्विस व सपोर्ट नेटवर्कसह आम्ही देशभरात महत्त्वपूर्ण फार्मास्युटिकल कन्साइनमेंट्चे आत्मविश्वासाने व्यवस्थापन करतो. हा सहयोग सतत वेळेवर, तापमान-नियंत्रित लॉजिस्टिक्स सेवा देण्याप्रती आमची क्षमता अधिक प्रबळ करतो, ज्यासह ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होते आणि देशाच्या आरोग्यसेवा पुरवठा साखळीला पाठिंबा मिळतो.”
अचूकरित्या संचालित कोल्ड चेन सोल्यूशन्ससाठी मागणी वाढत असताना टाटा मोटर्स लिमिटेड आणि आरटीपीएल यांच्यामधील या सहयोगामधून निदर्शनास येते की प्रगत तंत्रज्ञान, प्रबळ प्रक्रिया आणि कर्मचारी-केंद्रित दृष्टिकोन पुरवठा साखळीची स्थिरता वाढवू शकतात, तसेच भारतातील वाढत्या आरोग्यसेवा व फार्मास्युटिकल गरजांची पूर्तता होऊ शकते.