नवी दिल्ली, भारत – (दिनांक): भारत २०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलर्स पूर्णत: विकसित अर्थव्यवस्था ($35 trillion, fully developed economy by 2047) बनण्याच्या दिशने वाटचाल करत असताना नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्र प्रमुख योगदानकर्ता म्हणून कायम आहे, तसेच प्रभावी रिटेल नेटवर्क्स आणि ग्राहक-केंद्रित धोरणांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासामध्ये बहुमूल्य भर करत आहे.
यासंदर्भात, कोका-कोला इंडिया देशभरातील रिटेलर्सना नाविन्यपूर्ण कूलिंग सोल्यूशन्ससह सुसज्ज करत देशाची रिटेल इकोसिस्टम प्रबळ करत आहे. तसेच, झपाट्याने विकसित होत असलेल्या रिटेल लँडस्केपमध्ये रिटेलर्सना सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासह कोका-कोलाचा सुपर पॉवर रिटेलर प्रोग्राम लहान व मध्यम-आकाराच्या रिटेलर्सना ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसाय विकासाला गती देण्यासाठी संसाधनांसह सुसज्ज करतो.
वाढती पोहोच आणि ग्राहक सहभागासह रिटेल महसूलाला गती
कोका-कोला इंडियाचे कूलर्स देशभरातील रिटेल क्षेत्रांमध्ये अधिक प्रमाणात लोकप्रिय ठरले आहेत, जेथे ग्राहकांना थंडगार पेये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे रिटेलर महसूलामध्ये वाढ होत आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत इन्व्हेण्टरी मॅनेजमेंट वैशिष्ट्ये असलेल्या या कूलर्ससह रिटेलर्स प्रभावीपणे स्टॉकचे व्यवस्थापन करण्यास सक्षम आहेत. उत्पादन दृश्यमानता वाढवत आणि प्रत्येक ग्राहकाला रिफ्रेशिंग अनुभवाची खात्री देत कंपनी भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पेये सहजपणे उपलब्ध करून देण्यापती आपली कटिबद्धता अधिक दृढ करत आहे.
सुपर पॉवर रिटेलर प्रोग्रामसह रिटेल वाढीला पाठिंबा
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) सोबत सहयोगाने लाँच करण्यात आलेला सुपर पॉवर रिटेलर प्रोग्राम कोका-कोला इंडियाच्या रिटेल सक्षमीकरण धोरणाचा आधारस्तंभ आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून किरणा दुकानाच्या मालकांना उत्पादन प्रदर्शन, ग्राहक सहभाग व विक्री धोरणांमधील बहुमूल्य कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांची व्यवसाय क्षमता वाढण्यासोबत ग्राहक अनुभव अधिक उत्साहित होतो. ई-कॉमर्स व क्यू-कॉमर्स बाजारपेठेत परिवर्तन घडवून आणत असताना सुपर पॉवर रिटेलर प्रोग्राम किराणा या परिवर्तन होत असलेल्या वातावरणामध्ये स्पर्धात्मक व संबंधित राहण्याची खात्री देतो. आयसीआरआयईआर अहवालानुसार (२०२३ व २०२४ मध्ये प्रकाशित करण्यात आलेला) उत्पन्नामध्ये वाढ व रोजगार निर्मितीसंदर्भात नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे (the non-alcoholic beverage sector is contributing significantly to the Indian economy). कोका-कोला इंडिया प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या ४५ लाखांहून अधिक रिटेलरच्या (45 lakh retailer) उदरनिर्वाहाला पाठिंबा देत आहे. रिटेलर्स सांगतात की कूलर्सनी अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत, अधिक उत्पादन उपलब्धता व टिकाऊपणा देत, तसेच ग्राहकांना उत्साहवर्धक अनुभव देत विक्रीला चालना दिली आहे.
कोका-कोला इंडिया येथील भारतातील कार्यसंचालनांचे उपाध्यक्ष सुंदीप बजोरिया म्हणाले, ”कूलर तंत्रज्ञानाप्रती आमचा दृष्टिकोन रिटेल विकासासाठी दीर्घकालीन, स्केलेबल प्लॅटफॉर्म डिझाइन करण्याचा आहे. तंत्रज्ञान-संचालित कूलर मॉडेल्सपासून प्रगत रिटेल प्रोग्राम्सपर्यंत प्रत्येक पावलावर कोका-कोला इंडिया स्थिर इकोसिस्टम तयार करण्यासाठी सतत नाविन्यता आणत आहे. आम्ही किराणा व्यापाराच्या नवीन युगामध्ये महत्त्वपूर्ण, लाभदायी कंपन्या राहण्याची खात्री घेत रिटेलचे भविष्य उज्ज्वल करण्याप्रती कटिबद्ध आहोत.”
कोक बडीसह रिटेल इनोव्हेशनचा विस्तार
या दृष्टिकोनाला अधिक दृढ करत कोक बडी उपक्रम किराणांना प्रत्यक्ष तंत्रज्ञान-संचालित सोल्यूशन्स देतो. रिटेलर्सना २४/७ तास सेवा देत एआय-संचालित इनसाइट्स व सुव्यवस्थित प्रक्रियांद्वारे सक्षम प्लॅटफॉर्म अधिक वैयक्तिकृत व विनासायास शॉपिंग अनुभव देतो. या प्रगत सेवा स्तराने या प्रवासामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे, ज्यामुळे कोका-कोला इंडिया आणि ग्राहकांमधील संबंध अधिक दृढ होत आहेत.
देशातील क्षमतांचा फायदा घेणे, सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करणे आणि उद्योगामध्ये नाविन्यतेला चालना देणे आवश्यक आहे. नाविन्यतेप्रती कटिबद्धता आणि रिटेल मूल्य साखळी दृढ करण्यावरील फोकससह कोका-कोला इंडिया भारत सरकारचा दृष्टिकोन ‘विकसित भारत’शी संलग्न आहे, ज्यामुळे एकत्रित प्रगतीसाठी मार्ग मोकळा होत आहे.