रुग्णांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्सने डोझीच्या सहयोगाने सुरू केला महाराष्ट्राचा पहिला ‘एआय-पॉवर्ड कमांड सेंटर’ उपक्रम

News Service

पुणे, भारत, १3 डिसेंबर २०२४: अत्याधुनिक आरोग्यसेवा पुरविणाऱ्या संस्थांमधील एक अग्रगण्य संस्था सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स डोझी (Dozee) या भारताच्या अव्वल क्रमांकाच्या रिमोट पेशंट मॉनिटरिंग कंपनीच्या सहयोगाने ‘एआय-पॉवर्ड हेल्थ कमांड सेंटर’ या आपल्या पथदर्शी उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा करत आहे. हा परिवर्तनकारी कार्यक्रम अचूक सेवा पुरविण्यासाठी, सक्रीय हस्तक्षेपांसाठी आणि बेजोड चिकित्सात्मक परिणामांसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून घेत रुग्णसुरक्षेच्या निर्धारित मापदंडांची नवी व्याख्या करतो. यात एआय-सुसज्ज पेशंट मॉनिटरिंग यंत्रणेचा समावेश आहे, जी रुग्णाच्या स्थितीवर अखंडपणे देखरेख ठेवत राहते आणि रुग्णाची तब्येत ढासळत असल्याच्या अगदी सुरुवातीच्या लक्षणांचेही निदान करते. त्याचबरोबर ही यंत्रणा गंभीर आणि अत्यंत गंभीर प्रकरणेही ओळखते, आपत्कालीन पथकांना तत्काळ कृतीच्या सूचना देते, ज्यातून रुग्णाला वेळच्यावेळी व प्राण वाचविणाऱ्या उपाययोजना मिळतील याची खबरदारी घेतली जाते.

सध्या सह्याद्रीच्या हडपसर आणि डेक्कन येथील युनिट्समध्ये कार्यरत असलेल्या या कमांड सेंटरची कार्यकक्षा येत्या सहा महिन्यांमध्ये सर्व सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये विस्तारली जाईल, जेणेकरून या परिवर्तनकारी तंत्रज्ञानाचा सह्याद्री हॉस्पिटल्सच्या संपूर्ण साखळीमध्ये सहज अंगिकार होण्याची हमी मिळावी.

या घोषणेविषयी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री. अब्रारअली दलाल म्हणाले, “महाराष्ट्राचे पहिले एआय-पॉवर्ड कमांड सेंटर सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. रुग्णदेखभाल आणि रुग्णसुरक्षेच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारे हे एक क्रांतीकारी पाऊल आहे. डोझीबरोबरच्या भागीदारीतून उभा राहिलेल्या या उपक्रमातून सक्रीयतेने आरोग्यसेवेचे व्यवस्थापन करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा करून घेण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्यामुळे प्रत्येक रुग्णाचे स्वास्थ्य सुरक्षित राखण्यासाठी रुग्णावर प्रत्येक क्षणी देखरेख ठेवणे व निर्णय घेण्यामध्ये अखंडितता राखणे शक्य होते.”

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे ग्रुप सीओओ कर्नल (नि.) डॉ. सुनिल राव म्हणाले, “सह्याद्रीमध्ये आम्ही आरोग्यसेवा क्षेत्रातील नवसंकल्पनांच्या सीमारेषा विस्तारण्याप्रती कटिबद्ध आहोत. एआय-पॉवर्ड हेल्थ कमांड सेंटर उपक्रम म्हणजे एक अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम हेल्थकेअर परिसंस्था निर्माण करण्याच्या आमच्या ध्येयाचे मूर्त रूप आहे. एआयची ताकद वापरात आणून रुग्णांना सर्वोच्च पातळीवरील देखभाल पुरविण्याचे व क्लिनिकल निष्कर्षांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. या उपक्रमातून सह्याद्रीने तंत्रज्ञान-प्रेरित आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील आपले अग्रस्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. डोझीबरोबरच्या भागीदारीमधून आम्ही आमच्या रुग्णांसाठी एक अधिक सुरक्षित, अधिक स्मार्ट व अधिक कनेक्टेड भविष्य तयार करत आहोत.”

हा मुद्दा पुढे नेताना सह्याद्री हॉस्पिटलचे डिरेक्टर ऑफ क्रिटिकल केअर डॉ. कपिल बोरावाके म्हणाले “रुग्णांची सुरक्षा आमच्या सर्व कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आम्ही प्रतिसादात्मक प्रारूपाकडून अंदाजक्षम आणि प्रतिबंधात्मक प्रारूपाकडे वळत आहोत. रिअल-टाइम डेटा आणि लवकर प्राप्त होणाऱ्या धोक्याच्या सूचनांचा वापर करून आमच्या टीम्स रुग्णाची स्थिती ढासळू लागल्यालागल्याच व ती गंभीर बनण्याआधीच योग्य प्रकारे हाताळू शकतील, यातून रुग्णाचे प्राण वाचतील व रुग्ण बरा होण्याच्या दृष्टीने अधिक चांगले परिणाम प्राप्त होऊ शकतील. डॉक्टर्सच्या उपचारात्मक निर्णय-क्षमतेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी डोझीसारख्या प्रगत एआय-सुसज्ज तंत्रज्ञानांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. आरोग्यक्षेत्राच्या सध्याच्या बदलत्या चित्राचा विचार करता, आता रुग्णांना अपेक्षित करणारी देखभालीचा उच्च दर्जा गाठण्यासाठी रुग्णचिकित्सेमध्ये एआय तंत्रज्ञान समाविष्ट करणे अत्यावश्यक बनत चालले आहे.”

हा उपक्रम बिगर-आयसीयू वॉर्डांना डोझीच्या अद्ययावत रिमोट मॉनिटरिंग सिस्टीम (आरएमएस) तसेच अर्ली वॉर्निंग सिस्टीम (ईडब्‍ल्‍यूएस)ने सुसज्ज बनवितो, ज्यामुळे हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाची गती, रक्तदाब, एसपीओ२ च्या पातळी, तापमान आणि ईसीजी यांसारख्या अत्यावश्यक पॅरामीटर्सवर अखंड व रिअल-टाइम देखरेख ठेवणे शक्य होते. डोझीची अर्ली वॉर्निंग सिस्टीम (र्ठडब्‍ल्‍यूएस) व्हायटल पॅरामीटर्सच्या स्थितीचा आढावा घेत राहते आणि चिकित्सात्मक स्तरावर रुग्णाची स्थिती बिघडत असल्याची प्रारंभिक चिन्हे ओळखता यावीत यासाठी संबंधित आरोग्यकर्मींना धोक्याच्या सूचना पाठवते. यामुळे वेळच्यावेळी वैद्यकीय हस्तक्षेप करणे शक्य होते. अशा कॉन्टॅक्टलेस व्हायटल्स मॉनिटरिंगसाठी डोझी एआय- आधारित बॅलिस्टार्डिओग्राफी (बीसीजी)चा वापर करते. डोझीचे तंत्रज्ञान स्वामित्त्वहक्कप्राप्त आणि भारतामध्ये निर्मित आहे. डोझीच्या या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा रुग्णसुरक्षा, चिकित्सात्मक परिणाम व कार्यान्वयनातील काटेकोरपणा यांच्यावर लक्षणीय प्रभाव पडतो. फ्रंटिअर्स इन मेडिकल टेक्नोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या अभ्यासानुसार डोझीची एआय-सुसज्ज अर्ली वॉर्निंग सिस्टीम (ईडब्‍ल्‍यूएस) रुग्णाची स्थिती खालावत असल्याचा अंदाज १६ तास आधी सांगू शकते, ज्यामुळे लवकरात लवकर हस्तक्षेप करण्यासाठी अत्यंत महत्वाचा वेळ आरोग्यकर्मीच्या हाती लागू शकतो.

डोझीच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. निखिला जुव्वादी, एमडी पुढे म्हणाल्या, “सह्याद्री हॉस्पिटल्सशी भागीदारी आरोग्यसेवा पुरविण्याच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने उचललेले एक पुढचे पाऊल आहे. एआय-पॉवर्ड हेल्थ कमांड सेंटर म्हणजे केवळ एक तंत्रज्ञानाचा वापर करणे नाही – तर आरोग्यकर्मींना उच्चतम दर्जाची सेवा पुरविण्यासाठी लागणाऱ्या साधनानिशी सुसज्ज बनविणे आहे. या भागीदारीमधून रुग्णसुरक्षेला तडजोड न करण्याजोगी प्राधान्याची बाब बनविण्याचा आमचा सामायिक ध्यास अधोरेखित झाला आहे.”

या उपक्रमामुळे नववसंकल्पनांच्या क्षेत्रातील एक दीपस्तंभ म्हणून सह्याद्रीने आपले स्थान निश्चित केले आहे, व अद्ययावत तंत्रज्ञानाची सहृदयतेने केलेल्या रुग्णसेवेशी सांगड घालण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील हॉस्पिटल्ससाठी एक सुवर्ण मापदंड तयार केला आहे.

सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड विषयी
सह्याद्री हॉस्पिटल्स, ही पश्चिम भारतातील हॉस्पिटल नेटवर्कची सर्वात मोठी साखळी १९९४ साली स्थापन झाली व त्यासह पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी ही केवळ न्यूरोलॉजी व न्यूरोसर्जरीसाठी समर्पित संस्था उभी राहिली. महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुविधांमध्ये क्रांती घडवून आणण्याचा ध्यास घेऊन सुरू झालेली सह्याद्री हॉस्पिटल्स ही संस्था जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा उपाययोजना पुरविण्याच्या बाबतीत आघाडीवर राहिली आहे व उच्चतम दर्जाची वैद्यकीय सेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञान व रुग्णाच्या स्वास्थ्याप्रती अढळ अशी समर्पितता यांच्याप्रती आपली बांधिलकी संस्थेने सातत्याने जपली आहे.

आमच्या वैद्यकीय सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीमध्ये अनेक स्पेशलिटीजचा समावेश होतो व त्यात कार्डिओलॉजी व कार्डिएक सर्जरी, न्यूरोलॉजी आणि न्यूरोसर्जरी, हीमॅटोलॉजी आणि बोन मॅरो प्रत्यारोपण, अवयव प्रत्यारोपण, ऑन्कोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, आयव्हीएफ, युरोलॉजी, एंडोक्रिनोलॉजी, गॅस्ट्रोएंटेरोलॉजी आदींचा समावेश आहे. याबरोबरच हॉस्पिटलला पश्चिम भारतातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले यकृत-प्रत्यारोपण केंद्र असल्याचा मान प्राप्त आहे व येथे पश्चिम भारतातील सर्वाधिक बोन मॅरो प्रत्यारोपणे पार पडली आहेत व ही संस्था न्यूरोसायन्सच्या क्षेत्रातील महाराष्ट्रातील प्रवर्तक संस्था आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये सह्याद्री हॉस्पिटल्सने आपली पदचिन्हे विस्तारली आहेत व सध्या पुणे, नाशिक व कराडमध्ये मिळून संस्थेची ९ हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. १००० हून अधिक बेड्स, २००० हून अधिक क्लिनिशियन्स आणि ३००० हून अधिक मदतनीस कर्मचारी तसेच अद्ययावत वैद्यकीय पायाभूत यंत्रणा यांच्या साथीने आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत व त्यासह सहवेदनेचा आणि मानवी संवेदनेचाही अनुभव यावा याची काळजी घेत आहोत. या हॉस्पिटल नेटवर्कने ७.५ दशलक्षांहून अधिक रुग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे व महाराष्ट्र राज्य तसेच मध्यपूर्वेचे देश, आफ्रिका अशा इतर देशांमध्ये तसेच इतर अनेक भौगोलिक प्रदेशांमध्येही दर्जेदार आरोग्यसुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होण्याच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे.

सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये आम्ही वैद्यकीय क्षेत्रातील नवनव्या शोधांच्या बाबतीत आघाडीवर राहण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो, नवीनतम तंत्रज्ञान व उपचारांच्या पद्धतींचा अंगिकार करण्यासाठी सातत्याने धडपडत असतो. संशोधन, नवसंकल्पना आणि चिकित्सात्मक सर्वोत्कृष्टता साध्य करण्याच्या आमच्या असोशीने आम्हाला वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मानसन्मानांचे व पुरस्कारांचे मानकरी बनविले आहे आणि आपल्या रुग्णांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी एका अनुकंपायुक्त व काळजी घेणाऱ्या वातावरणाची जोपासना करण्यावर आमचा विश्वास आहे.

आमच्या रुग्णकेंद्री दृष्टिकोनामुळे प्रत्येक व्यक्तीकडे वैयक्तिकृतरित्या लक्ष पुरविले जाईल व रुग्णाच्या बरे होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याच्या कुटुंबाच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतली जाईल याची खातरजमा केली जाते. आरोग्यप्राप्तीच्या तुमच्या वाटचालीमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचा अनुभव घेण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button