सॅमसंग अॅड्स आणि कांतार यांनी केलेल्‍या संशोधनामधून खरेदी उद्देशाला चालना देण्‍यामध्‍ये कनेक्‍टेड टेलिव्हिजन्‍सची वाढती भूमिका दिसून येते

News Service
  • या संशोधनामधून कनेक्‍टेड टीव्‍ही मोहिमा निदर्शनास येतात, ज्‍यांनी जनरेशन झेडमधील खरेदी वर्तणूकीमध्‍ये जवळपास ८.५ टक्‍के वाढ केली आहे.
  • कनेक्‍टेड टीव्‍ही जाहिरातीने ग्राहक उत्‍पादने, तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्‍ह, अॅपरल आणि होम सोल्‍यूशन्‍स अशा विविध क्षेत्रांमध्‍ये लक्षणीय वाढ केली आहे.
  • उच्‍च वारंवारतेमुळे ब्रँडचा प्रभाव दुप्‍पट झाला आहे, ज्‍यामुळे विपणनकर्त्‍यांसाठी कनेक्‍टेड टीव्‍ही आवश्‍यक चॅनेल बनले आहे.

गुरूग्राम, भारत, जुलै, २०२५ – सॅमसंग अॅड्सने कांतारसोबत सहयोगाने बीयॉण्‍ड अवेअरनेस नावाची उल्‍लेखनीय श्‍वेतपत्रिका जारी केली, जिचा महत्त्वपूर्ण ब्रँड केपीआयना चालना देण्‍यामध्‍ये कनेक्‍टेड टीव्‍ही (सीटीव्‍ही) जाहिरात परिसंस्‍थेची भूमिका निदर्शनास आणण्‍याचा मनसुबा आहे. ओईएम कनेक्‍टेड टीव्‍ही कंपनीकडून पहिल्‍यांदाच अशाप्रकारचे संशोधन करण्‍यात आले आहे, जे मध्‍यम-ते-अल्‍प फनेल मेट्रिक्‍समधील प्रबळ, डेटा-संचालित माहिती देते, तसेच जाहिरातदारांना कनेक्‍टेड टीव्‍ही ब्रँडची अनुकूलता आणि खरेदी उद्देशाला देत असलेल्‍या चालनेबाबत स्‍पष्‍ट पुरावा देते.

या संशोधनामध्‍ये विविध उद्योग व भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये सॅमसंग स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍सवरील मोहिमांसाठी कांतारने केलेल्‍या १०० हून अधिक ब्रँड लिफ्ट स्‍टडींचे विश्‍लेषण करण्‍यात आले. कांतारकडून स्वतंत्र प्रमाणीकरणासह हे संशोधन कनेक्टेड टीव्हीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जाहिरातदारांना अभूतपूर्व स्पष्टता आणि आत्मविश्वास देते. ब्रँड अनुकूलता, संदेश सहयोग, ऑनलाइन जाहिरात जागरूकता आणि खरेदी उद्देश यांसारख्या ब्रँड लिफ्ट मेट्रिक्सचा वापर करून मोहिमांचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यामुळे वास्तविक ग्राहक वर्तनावर प्रभाव पाडण्यात कनेक्टेड टीव्हीची क्षमता दिसून आली.

आपले मत व्‍यक्‍त करत सॅमसंग अॅड्स इंडियाच्‍या इनसाइट्स अँड क्‍लायण्‍ट सोल्‍यूशन्‍सच्‍या प्रमुख भावना सैंचर म्‍हणाल्‍या, ”’बीयॉण्‍ड अवेअरनेस’ संशोधन जागरूकता आणि विचारशीलतेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचे टचपॉइण्‍ट म्‍हणून कनेक्‍टेड टेलिव्हिजन्‍सच्‍या वाढत्‍या महत्त्वावर भर देते, तसेच दृश्‍यमानता वाढवते आणि मोठ्या स्क्रिन्सवर प्रेक्षकांशी संलग्‍न होणाऱ्या ब्रँड्ससाठी सकारात्‍मक निष्‍पत्ती देते. मला विश्वास आहे की, जनरेशन झेडचा उच्‍च सहभाग डिजिटल-प्रेमी, स्‍वावलंबीपणे निर्णय घेणाऱ्या प्रेक्षकांसह प्रभाव घडवून आणण्‍यास उत्‍सुक असलेल्‍या ब्रँड्ससाठी मोठी संधी आहे.”

या संशोधनामधून निदर्शनास येते की, सॅमसंग स्मार्ट टीव्हीवरील जाहिराती पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये, जनरेशन झेड (१८-२४ वर्षे)ने ब्रँड अनुकूलतेमध्ये ९.१ टक्‍के आणि खरेदीच्या उद्देशामध्‍ये ८.५ टक्‍के सारख्या प्रमुख निकषांवर सर्वाधिक वाढ दाखवली. यामधून त्‍यांचा मोठा सहभाग आणि प्रतिसाद दिसून येतो, ज्यामुळे ते कनेक्टेड टीव्ही परिसंस्‍थेमध्ये प्रमुख प्रेक्षक विभाग बनले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या इतर प्रमुख निष्‍पत्ती पुढीलप्रमाणे:
• विचारात ७.९ टक्‍के वाढ: १०० हून अधिक ब्रँड लिफ्ट संशोधनांच्‍या विश्‍लेषणामधून निदर्शनास येते की, सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन्‍सवरील कनेक्टेड टीव्ही मोहिमांमुळे ग्राहकांच्या विचारात ७.९ टक्‍क्‍यांची लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामध्ये जनरेशन झेड प्रेक्षकांच्‍या खरेदी वर्तनात ८.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ दिसण्‍यात आली आहे.
• सानुकूल वारंवारतेसह दुप्पट प्रभाव: चार किंवा त्याहून अधिक वेळा ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या मोहिमांचा सर्व प्रमुख कामगिरी निर्देशकांवर (केपीआय) दुप्पट परिणाम होतो, ज्‍यामधून निष्‍पत्तींना चालना देण्‍यामध्‍ये सानुकूल जाहिरात वारंवारतेचे धोरणात्मक महत्त्व दिसून येते.
• व्यापक उद्योग यश आणि डेमोग्राफिक वैविध्‍यता: कनेक्टेड टीव्ही जाहिराती ग्राहक उत्पादने, तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह, अॅपरल व होम सोल्‍यूशन्‍ससह विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ देतात आणि जनरेशन झेड व ३५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्‍यक्‍तींमध्ये अत्यंत प्रभावी ठरतात.

कांतारच्या इनसाइट्स डिव्हिजनचे उपाध्यक्ष एबू इसाक म्हणाले, ”कनेक्टेड टीव्ही संपूर्ण फनेल मार्केटिंग चॅनेलमध्ये बदलत असताना हे संशोधन त्याच्या धोरणात्मक मूल्याचे, विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये अनुकूलता आणि खरेदीचा हेतू वाढवण्याचे आकर्षक पुरावे सादर करते. जाहिरातदार जनरेशन झेडशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्‍न करत असताना कनेक्टेड टीव्ही महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे, जे अचूकता, प्रमाण आणि मोजता येण्याजोगा प्रभाव देते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button