सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी एस२५ एजसाठी प्री-ऑर्डरची घोषणा; किंमत १०९,९९९ रूपयांपासून

News Service
  • गॅलॅक्‍सी एस२५ एज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२,००० रूपयांचे स्‍टोअर अपग्रेड मोफत मिळेल
  • ग्राहक डिवाईसवर जवळपास ९ महिन्‍यांसाठी नो-कॉस्‍ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात

भारत – मे २०, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांचा श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारा सर्वात स्लिम गॅलॅक्‍सी एस सिरीज स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी एस२५ एजसाठी प्री-ऑर्डर सुरू केली. स्‍टाइल व क्षमता लक्षात घेत डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्‍सी एस२५ एजच्‍या स्थिर टायटॅनियम रचनेमध्‍ये प्रीमियम, प्रो-लेव्‍हल परफॉर्मन्‍सचे नवीन संतु‍लन आहे. गॅलॅक्‍सी एस२५ एज एस सिरीज वारसाला अधिक पुढे घेऊन जातो. या स्‍मार्टफोनमध्‍ये आयकॉनिक गॅलॅक्‍सी एआय-सक्षम कॅमेरा आहे, जेथे प्रभावीपणे पोर्टेबल डिवाईसमध्‍ये नवीन क्रिएटिव्‍हीटीला चालना देण्‍यात आली आहे.

अपवादात्‍मकरित्‍या स्‍लीक व शक्तिशाली डिझाइन
५.८ मिमी चेसिससह गॅलॅक्‍सी एस२५ एज अभूतपूर्व रचनेने युक्‍त डिवाईस आहे, जो स्‍मार्टफोन डिझाइनच्‍या जवळपास प्रत्‍येक घटकाला नवीन आकार देतो. यामधील सुधारित फ्रेम फक्‍त १६३ ग्रॅम वजनामध्‍ये फॉर्म व फंक्‍शन निर्माण करते, ज्‍यामुळे हा स्लिम स्‍मार्टफोन नव्‍या उंचीवर पोहोचला असून गॅलॅक्‍सी एस सिरीजच्‍या युनिफाईड डिझाइनला कायम ठेवतो.

सुव्‍यवस्थित सिल्‍हूटसह अपवादात्‍मक स्थिरता आहे. सानुकूल वक्राकार कडा आणि शक्तिशाली टायटॅनियम फ्रेम प्रत्‍येक वापरासाठी प्रबळ संरक्षण देतात. आधुनिक कॉर्निंग® गोरिला® ग्‍लास सिरॅमिक २ (Corning® Gorilla® Glass Ceramic 2) हे नवीन ग्‍लास सिरॅमिक ऑफरिंग सर्वोत्तम रचना देते, जे गॅलॅक्‍सी एस२५ एजवरील फ्रण्‍ट डिस्‍प्‍लेसाठी वापरण्‍यात आले आहे.

पॉकेटेबल २०० मेगापिक्‍सल कॅमेरासह डायनॅमिक क्रिएटिव्‍हीटी
गॅलॅक्‍सी एस२५ एजची स्लिम व हलकी डिझाइन वापरकर्त्‍यांना संस्‍मरणीय क्षण कॅप्‍चर करून कधीही त्‍यांची क्रिएटिव्‍हीटी व्‍यक्‍त करण्‍यास सोपे करते. २०० मेगापिक्‍सल वाइड लेन्‍स गॅलॅक्‍सी एस सिरीजच्‍या आयकॉनिक कॅमेरा अनुभवाला कायम ठेवते, तसेच नाइटोग्राफीला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. अल्‍ट्रा-हाय रिझॉल्‍यूशनसह वापरकर्ते शार्पर फोटो कॅप्‍चर करू शकतात, तसेच मोठ्या पिक्‍सल आकारासह सुस्‍पष्‍ट फोटोज कॅप्‍चर करू शकतात. याव्‍यतिरिक्त अंधुक प्रकाश असलेल्‍या स्थितीमध्‍ये देखील ४० टक्‍क्‍यांहून अधिक सुधारित ब्राइटनेससह सुस्‍पष्‍टपणे फोटोज कॅप्‍चर करता येतात. १२ मेगापिक्सल अल्‍ट्रा-वाइड सेन्‍सरमध्‍ये ऑटोफोकस आहे, जे अधिक सर्जनशील स्थिरतेसाठी सुस्‍पष्‍ट व सविस्‍तर मॅक्रो फोटोग्राफी देते.

गॅलॅक्‍सी एस२५ एजमध्‍ये प्रोव्हिज्‍युअल इंजिन आहे, जे कपडे किंवा वनस्‍पतींसाठी शार्प डिटेल्‍सची खात्री आणि पोर्ट्रेट्समध्‍ये नैसर्गिक, वास्‍तव‍िक स्किन टोन अशा प्रो-ग्रेड सुधारणांसह गॅलॅक्‍सी एस२५ साठी सानुकूल करण्‍यात आले होते. गॅलॅक्‍सी एआय-पॉवर्ड एडिटिंग वैशिष्‍ट्यांसह चाहत्‍यांची आवडती वैशिष्‍ट्ये, जसे ऑडिओ इरेजर व ड्रॉइंग असिस्‍ट गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजमधून घेण्‍यात आली आहेत.

अल्‍ट्रा-स्लिम रचनेमध्‍ये सुरेखपणे कन्फिग्‍युअर करण्‍यात आलेली सर्वोच्‍च कार्यक्षमता
गॅलॅक्‍सी एस२५ एज प्रीमियम कार्यक्षमता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जेथे स्‍नॅपड्रॅगन ८ ® एलाइट मोबाइल प्‍लॅटफॉर्म फॉर गॅलॅक्‍सी आहे. क्‍वॉलकॉम टेक्‍नॉलॉजीज, इन्‍क.द्वारे कस्‍टमाइज करण्‍यात आलेले चिपसेट गॅलॅक्‍सी एस२५ एजच्‍या ऑन-डिवाईस एआय प्रोसेसिंग क्षमतांना साह्य करते आणि दिवसभर विश्‍वसनीयरित्‍या गतीशील परफॉर्मन्‍स देते. गॅलॅक्‍सी एस२५ एज रिकन्फिग्‍युअर करण्‍यात आलेल्‍या वेपर चेम्‍बरमुळे दीर्घकाळपर्यंत वापरादरम्‍यान थंड राहतो. वेपर चेम्‍बर आता अधिक पातळ असले तरी स्थिर उष्‍णता प्रसरणासाठी मोठे आहे.

गॅलॅक्‍सी एस सिरीजच्‍या प्रतिष्ठित परफॉर्मन्‍स मानकांशी जुळत गॅलॅक्‍सी एस२५ एजमध्‍ये प्रगत व कार्यक्षम एआय इमेज प्रोसेसिंगसह प्रोस्‍केलर आहे, जे डिस्‍प्‍ले इमेज स्‍केलिंग क्‍वॉलिटीमध्‍ये ४० टक्‍के सुधारणा देते, तसेच सॅमसंगचे कस्‍टमाइज मोबाइल डिजिटल नॅच्‍युरल इमेज इंजिन (एमडीएनआयई) देखील आहे.

गॅलॅक्‍सी एआयसह विश्‍वसनीय सोबती
जवळपास प्रत्‍येक टचपॉइण्‍टवर गॅलॅक्‍सी एआय एकीकृत करत गॅलॅक्‍सी एस२५ एज सर्वात नैसर्गिक व कॉन्‍टेक्‍स्‍ट-अवेअर मोबाइल एआय अनुभव देतो. वापरकर्त्‍यांना वैयक्तिकृत, मल्‍टीमोडल एआय क्षमतांसह खात्री मिळते की, त्‍यांचा वैयक्तिक डेटा नेहमी सुरक्षित आहे.

व्‍यापक गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजमधील गॅलॅक्‍सी एस२५ एजमध्‍ये एआय एजंट्स आहेत, जे विविध अॅप्‍समध्‍ये विनासायासपणे काम करतात, सहजपणे टास्‍क्‍स पूर्ण करण्‍यासाठी खरे एआय सोबती म्‍हणून मदत करतात. गॅलॅक्‍सी एआय दैनंदिन रूटिन्‍ससह एकीकृत होत अधिक उत्तम करण्‍यात आले आहे. नाऊ ब्रिफ आणि नाऊ बारमध्‍ये अधिक सोयीसुविधेसाठी थर्ड-पार्टी अॅप इंटीग्रेशन्‍स आहेत, तसेच प्रत्‍येक संवाद, डायनिंग अशा सुविधांदरम्‍यान उपयुक्‍त रिमांइडर्स देतात.

गॅलॅक्‍सीच्‍या गुगलसोबत दृढ सहयोगामुळे गॅलॅक्‍सी एस२५ एजमध्‍ये जेमिनीच्‍या आधुनिक सुधारणा आहेत. उदाहरणार्थ, जेमिनी लाइव्‍हचा नवीन कॅमेरा व स्क्रिन शेअरिंग क्षमतांसह वापरकर्ते जेमिनी लाइव्‍हला त्‍यांच्‍या स्क्रिनवर किंवा जगभरात सुरू असलेल्‍या गोष्‍टी दाखवू शकतात, तसेच लाइव्‍ह संवादामध्‍ये परस्‍परसंवाद साधू शकतात.

गॅलॅक्‍सी एस२५ एजवरील गॅलॅक्‍सी एआयद्वारे समर्थित अनुभव सोयीसुविधेचे असण्‍यासोबत गोपनीयतेसह डिझाइन करण्‍यात आले आहेत. ऑन-डिवाईस एआय प्रोसेसिंग डेटा सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍टद्वारे सुरक्षित राहण्‍याची खात्री देते, ज्‍यामधून हायपर-वैयक्तिकृत मोबाइल अनुभव कधीच गोपनीयतेबाबत तडजोड न करण्‍याची खात्री घेण्‍याप्रती सॅमसंगची अविरत कटिबद्धता दिसून येते.

किंमत, उपलब्‍धता आणि प्री-ऑर्डर ऑफर्स
गॅलॅक्‍सी एस२५ एज प्री-ऑर्डर्ससह आजपासून सर्व आघाडीच्‍या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे. गॅलॅक्‍सी एस२५ एज प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२,००० रूपयांचे स्‍टोरेज अपग्रेड मोफत मिळेल; ग्राहक डिवाईसवर जवळपास ९ महिन्‍यांच्‍या नो-कॉस्‍ट ईएमआयचा देखील लाभ घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी एस२५ एज टायटॅनियम सिल्‍व्‍हर आणि टायटॅनियम जेटब्‍लॅक या दोन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असेल. गॅलॅक्‍सी एस२५ एज आणि गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजबाबत अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या: Samsung.com.

किंमत
मॉडेल रॅम स्‍टोरेज रंग किंमत (रूपयांमध्‍ये)
गॅलॅक्‍सी एस२५ एज १२ जीबी २५६ जीबी टायटॅनियम सिल्‍व्‍हर, टायटॅनियम जेटब्‍लॅक १०९,९९९
१२ जीबी ५१२ जीबी १२१,९९९

प्री-ऑर्डर ऑफर्स
मॉडेल ऑफर्स नो कॉस्‍ट ईएमआय
गॅलॅक्‍सी एस२५ एज १२ हजार रूपयांचे बेनीफिट्स
१२ हजार रूपयांचे स्‍टोरेज अपग्रेड
(२५६ जीबी व्हेरिएण्‍ट प्री-बुक करा आणि ५१२ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळवा) जवळपास ९ महिने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button