सॅमसंगकडून भारतात ३० वर्षे साजरी करण्‍यासह नवीन नाविन्‍यता दृष्टिकोनाचे अनावरण

News Service
  • पुढील दशकामध्‍ये भारतात उत्‍पादित केलेली, भारतात डिझाइन केलेली आणि संपूर्ण विश्वासाठी नाविन्‍यता आणण्‍यात आलेली अधिकाधिक उत्‍पादने पाहायला मिळतील.
  • स्‍मार्टफोन्‍स व टेलिव्हिजन्‍सपासून रेफ्रिजरेटर्स व एसीपर्यंत संपूर्ण एआय उत्‍पादन परिसंस्‍था देणारी भारतातील एकमेव कंपनी आहे.
  • भारतामधून १४,००० हून अधिक पेटण्‍ट्स दाखल करण्‍यात आले, ज्‍यासह जागतिक नाविन्‍यता पॉवरहाऊस म्‍हणून ब्रँडची भूमिका अधिक प्रबळ झाली आहे.
  • १.११ लाख कोटी रूपये महसूल असलेली भारतातील सर्वात मोठी एमएनसी.
  • सॅमसंगच्‍या सामुदायिक उपक्रमांचा भारतभरातील १.५ दशलक्षहून अधिक व्‍यक्‍तींना फायदा झाला आहे.

भारत – डिसेंबर, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज नवीन धोरणात्‍मक दृष्टिकोन #PoweringInnovationforIndia चे अनावरण केले, जो देशातील ब्रँडच्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये ग्राहक-केंद्रित नाविन्‍यता, भारतीय टॅलेंट आणि भारत-नेतृत्वित उत्‍पादन विकासाला प्राधान्‍य देतो.

भारतातील कार्यसंचालनांच्‍या ३० वर्षांना साजरे करत सॅमसंगचा नवीन दृष्टिकोन भारतातील डिजिटल परिवर्तन, मेक इन इंडिया उत्‍पादन महत्त्वाकांक्षा आणि नाविन्‍यता-संचालित आर्थिक विकासामधील दीर्घकालीन सहयोगी म्‍हणून त्‍यांची कटिबद्धता अधिक प्रबळ करतो. १९९५ मध्‍ये भारतात प्रवेश केल्‍यापासून सॅमसंगने घरगुती मनोरंजनाला नव्‍या उंचीवर नेलेले टेलिव्हिजन्‍स लाँच करण्‍यापासून नोएडामध्‍ये जगातील सर्वात मोठे मोबाइल उत्‍पादन प्‍लांट स्‍थापित करण्‍यामध्‍ये विस्‍तार केला आहे, तसेच भारतात डिझाइन केल्‍या जाणाऱ्या नाविन्‍यतांना चालना देत आहे, जे आता त्‍यांच्‍या जागतिक परिसंस्‍थेला पाठिंबा देतात.

१.११ लाख कोटी रूपयांच्‍या महसूलासह सॅमसंग एण्‍ड-टू-एण्‍ड एआय परिसंस्‍था असलेला भारतातील एकमेव ब्रँड आहे, तसेच स्‍मार्टथिंग्‍जच्‍या माध्‍यमातून गॅलेक्‍सी एआय (स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स, वीअरेबल्‍स), बीस्‍पोक एआय (रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स व एसी) आणि व्हिजन एआय (टेलिव्हिजन्‍स व स्‍मार्ट मॉनिटर्स) यांना एकत्र आणत आहे.

“१९९५ मध्‍ये उदारीकरणामुळे नवीन संधी निर्माण होत असताना भारतात आमच्‍या पहिल्‍या टीव्‍हीची विक्री करण्‍यापासून आज भारतासाठी सर्वात विश्वसनीय तंत्रज्ञान सहयोगी बनण्‍यापर्यंत सॅमसंगच्‍या प्रवासाला भारतीयांचा आत्‍मविश्वास, सर्जनशीलता व अमर्यादित महत्त्वाकांक्षांनी आकार दिला आहे. आम्‍ही भारतातील घराघरांमध्‍ये आमचे स्‍मार्टफोन्‍स, टीव्‍ही, डिजिटल अप्‍लायन्‍सेस आणि विनासायासपणे कनेक्‍टेड परिसंस्‍थेच्‍या माध्‍यमातून सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक अवलंब करण्‍यात आलेला ब्रँड बनलो आहोत. आम्‍हाला भारतातील लाखो कुटुंबांचे दैनंदिन जीवन सुलभ करण्‍याचा अभिमान वाटतो. भारतातील तरूणांची तंत्रज्ञान सुरक्षित, सर्वोत्तम व नेहमी सर्वसमावेशक असण्‍याची अपेक्षा आहे आणि आम्‍ही त्‍यांच्‍यासाठी वैयक्तिक नाविन्‍यता वितरित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आमचा विश्वास आहे की, भारत जगभरातील अर्थपूर्ण नाविन्‍यतेच्‍या भावी युगाचे नेतृत्‍व करेल, जेथे स्‍मार्ट होम्‍स, कनेक्‍टेड राहणीमान आणि सर्वोत्तम डिवाईसेसच्‍या भवितव्‍याला भारतातील सांस्‍कृतिक विविधतेला समजून घेणाऱ्या एआयसह झपाट्याने आकार मिळत आहे. आम्‍ही विकसित भारतासाठी भारत सरकारसोबत सहयोगाने काम करत राहू, ज्‍यासह डिजिटली सक्षम देश घडेल, जेथे नाविन्‍यता सर्वसमावेशक प्रगती व सहयोगाने समृद्धतेला चालना देईल. आमचा येथे प्रगत तंत्रज्ञान निर्माण करण्‍याचा स्‍पष्‍ट दृष्टिकोन आहे, जे जगभरातील व्‍यक्‍तींच्‍या राहण्‍याच्‍या, काम करण्‍याच्‍या आणि कनेक्‍ट होण्‍याच्‍या भावी पद्धतींना आकार देतील,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकरी जेबी पर्क म्‍हणाले.

भारताचे समर्थन: नाविन्‍यता ग्राहकांसह सुरू होते
३० वर्षांपासून सॅमसंगचा सोप्‍या तत्त्‍वावर विश्वास आहे, ते म्‍हणजे भारत नाविन्‍यतेला समर्थन देतो. आज, ब्रँडचे चेन्‍नई व नोएडामध्‍ये दोन प्‍लांट्स, दिल्‍ली, नोएडा व बेंगळुरूमध्‍ये तीन आरअँडडी केंद्रे आणि दिल्‍ली एनसीआरमध्‍ये अत्‍याधुनिक डिझाइन केंद्र सॅमसंगच्‍या ग्राहक-केंद्रित तंत्रज्ञानाच्‍या भावी युगाला आकार देत आहे, जेथे ब्रँडच्‍या जागतिक रोडमॅपमध्‍ये भारताला प्राधान्‍य दिले जात आहे.

सॅमसंग डिझाइन दिल्‍ली अद्वितीयरित्‍या भारतातील व्‍यक्‍तींशी संलग्‍न असलेले अनुभव तयार करत आहे. या नाविन्‍यता देशाची संस्‍कृती व सर्जनशीलता समजून घेतात. येथे उल्‍लेखनीय सुविधा डिझाइन केल्‍या जातात, जसे किड्स टीव्‍ही, जी डिजिटलप्रेमी मुलांना सुरक्षित व अर्थपूर्ण अध्‍ययन देते, गॅलेक्‍सी एम व एफ सिरीजसाठी आकर्षक सीएमएफ डिझाइन्‍स. या सर्वांमधून डिझाइनची सुरूवात ग्राहकांसह झाली पाहिजे, हा सॅमसंगचा विश्वास दिसून येतो.

तसेच, आपल्‍या आरअँडडी परिसंस्‍थेत सॅमसंग टीम्‍स एआयमधील प्रगती, उपलब्‍धता, स्‍ट्रीमिंग आणि डिजिटल डिप्‍लेमध्‍ये आघाडीवर आहेत, लँग्‍वेज इंटेलिजन्‍स व नेक्‍स्‍ट-जनेरशन नेटवर्क्‍समधील मर्यादांना दूर करत आहेत. १४,००० हून अधिक पेटण्‍ट्ससह भारतातील आघाडीची खाजगी क्षेत्र पेटण्‍ट दाखल करणारी सॅमसंग इनोव्‍हेशन पॉवरहाऊस म्‍हणून भारताच्‍या भूमिकेला देखील दाखवत आहे.

भारतातील भावी नवप्रवर्तकांमध्‍ये गुंतवणूक
सॅमसंगचा दृष्टिकोन #PoweringInnovationForIndia उत्‍पादनांपलीकडे जातो, जेथे कंपनी भारतातील स्‍टार्टअप्‍ससोबत आपले युनिव्‍हर्सिटी सहयोग आणि ओपन इनोव्‍हेशन उपक्रमांचा विस्‍तार करत आहे, ज्‍यामधून खात्री मिळते की भारतात उदयास आलेल्‍या अधिकाधिक संकल्‍पना जागतिक स्‍तरावर प्रगती करतील.

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो, सॅमसंग इनोव्‍हेशन कॅम्‍पस आणि सॅमसंग दोस्‍त अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून सॅमसंग भावी कर्मचारीवर्गाला निपुण करत आहे, जे इंडस्‍ट्री ४.० च्‍या आवश्‍यकतांशी संलग्‍न आहे. सॅमसंग देशभरातील विद्यार्थ्‍यांना अनुदान, इन्‍क्‍यूबलेशन सपोर्ट, एआयमधील कौशल्‍ये, आयओटी, डिजिटल तंत्रज्ञान आणि रोजगार संधी देत आहे. आपल्‍या प्रवासादरम्‍यान सॅमसंगचे सीएसआर उपक्रम भारतभरातील जवळपास १.५ दशलक्ष व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचले आहेत आणि त्‍यांना उपक्रमाचा फायदा झाला आहे, ज्‍यामुळे शिक्षण, शाश्वता व डिजिटल सर्वसमावेशकतेमधील प्रगतीला चालना मिळाली आहे.

सॅमसंगने भारतात १९९५ मध्‍ये आपल्‍या कार्यसंचालनांना सुरूवात केली आणि गेल्‍या तीन दशकांमध्‍ये कंपनी देशातील सर्वात मोठा मोबाइल फोन व ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँड बनली आहे, जिचे प्रगत उत्‍पादन, शक्तिशाली आरअँडडी व डिझाइन क्षमता, लाखो रिटेल टचपॉइण्‍ट्स आणि संपूर्ण भारतात कर्मचारीवर्ग आहे. भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये ३,००० हून अधिक अधिकृत सर्विस पॉइण्‍ट्स आणि १२,००० सर्विस इंजीनिअर्समधून सॅमसंगची ग्राहकांप्रती कटिबद्धता दिसून येते.

भारतातील आपली उपस्थिती अधिक दृढ करत सॅमसंगने बेंगळुरूमधील सॅमसंग ऑपेरा हाऊस सह आपली विशेष रिटेल उपस्थिती वाढवली, तसेच मुंबईमध्‍ये पहिले प्रमुख लाइफस्‍टाइल स्‍टोअर ‘सॅमसंग बीकेसी’ लाँच केले. याव्‍यतिरिक्‍त, ब्रँडने नुकतेच शहरामध्‍ये अत्‍याधुनिक बिझनेस एक्‍स्‍पीरिअन्‍स स्‍टुडिओ सुरू केला, जो सर्वोत्तम ग्राहक व उद्योग तंत्रज्ञान देतो. यासोबत गुरूग्राममध्‍ये देखील बिझनेस एक्‍स्‍पीरिअन्‍स स्‍टुडिओ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button