सॅमसंगने अंधेरी पश्चिम येथे नवीन प्रीमियम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअर लाँच करत मुंबईतील रिटेल उपस्थितीचा केला विस्तार

News Service
  • लोटस ट्रेड सेंटर येथे सॅमसंगच्‍या नवीन प्रीमियम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअरमध्‍ये गॅलॅक्‍सी डिवाईसेस, स्‍मार्टथिंग्‍ज इकोसिस्‍टम आणि इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍लेंसाठी समर्पित झोन्‍स आहेत.
  • स्‍टोअरचे भव्‍य उद्घाटन विशेष फायदे देते, जसे पेटीएम फर्स्‍ट मेम्‍बरशीप, मोफत ओटीटी व म्‍युझिक सबस्क्रिप्‍शन्‍स, गिफ्ट कार्ड्सवर सूट आणि विशेष डायनिंग डिल्‍स.

गुरूग्राम, भारत – जुलै २२, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने लोटस ट्रेड सेंटर, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे नवीन प्रीमियम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअर लाँच करत आपली प्रीमियम रिटेल उपस्थिती अधिक विस्तारली आहे.
१,६०० चौरस फूट जागेवर पसरलेले हे विस्‍तृत स्‍टोअर ग्राहकांकरिता सर्वसमावेशक गंतव्‍य आहे, जेथे ते सॅमसंगचे आधुनिक इनोव्‍हेशन्‍स आणि कनेक्‍टेड इकोसिस्‍टम एकाच ठिकाणी एक्‍स्प्‍लोअर करू शकतात.

मुंबई प्रमुख रिटेल व लाइफस्‍टाइल हबमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित या स्‍टोअरमध्‍ये समर्पित झोन्‍स आहेत, जेथे सॅमसंगच्‍या गॅलॅक्‍सी डिवाईसेसची संपूर्ण श्रेणी पाहायला मिळते. या श्रेणीमध्‍ये नवीन स्‍मार्टफोन्‍स, टॅब्‍लेट्स, लॅपटॉप्‍स, स्‍मार्टवॉचेस् आणि प्रगत स्‍मार्टथिंग्‍ज इकोसिस्‍टमचा समावेश आहे. इंटरअॅक्टिव्‍ह डिस्‍प्‍ले आणि प्रायोगिक झोन्‍ससह अभ्‍यागतांना सॅमसंगचे तंत्रज्ञान उत्‍पादकता, मनोरंजन, वेलनेस आणि स्‍मार्ट होम ऑटोमेशनमध्ये कशाप्रकारे वाढ करते हे पाहायला मिळू शकते, ज्‍यामधून वास्‍तविक कनेक्‍टेड जीवनशैलीचा अनुभव मिळतो.

“सॅमसंगमध्‍ये आम्‍ही प्रेरणादायी रिटेल अनुभवांच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना नाविन्‍यता देण्‍याप्रती समर्पित आहोत. अंधेरी पश्चिम, मुंबई येथे लाँच करण्‍यात आलेले आमचे प्रीमियम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअर आमची प्रीमियम रिटेल उपस्थिती वाढवण्‍यासाठी आणि तंत्रज्ञान, सहभाग व सेवेसाठी ऑल-इन-वन गंतव्‍य निर्माण करण्‍यासाठी आमच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डी२सी बिझनेस व कॉर्पोरेट मार्केटिंगचे उपाध्‍यक्ष, प्रमुख सुमित वालिया म्‍हणाले.

सॅमसंगच्‍या प्रमुख ‘लर्न @ सॅमसंग’ उपक्रमाचा भाग म्‍हणून स्‍टोअर नियमितपणे वर्कशॉप्‍सचे आयोजन करेल, जेथे गॅलॅक्‍सी डिवाईसेसचा वापर करत एआय-समर्थित फोटोग्राफी, उत्‍पादकता, सर्जनशीलता आणि डूडलिंगवर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. या वर्कशॉप्‍सचा मिलेनियल्‍स आणि जनरेशन झेड ग्राहकांना दैनंदिन जीवनात त्‍यांचा डिवाईस वापर वाढवण्‍यास सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच या स्‍टोअरमध्‍ये संपूर्ण सुविधांनी युक्‍त सर्विस सेंटर आहे, ज्‍यामधून ग्राहकांना खरेदीनंतर त्‍वरित व विश्वसनीय पाठिंबा मिळेल.

या स्‍टोअरमध्‍ये डिजिटल इंटरफेस सॅमसंग स्‍टोअर+ देखील आहे, जे स्‍टोअरमध्‍ये येणाऱ्या ग्राहकांना उत्‍पादनाबाबत सविस्‍तर माहिती एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यास आणि सोईस्‍करपणे होम डिलिव्‍हरीची निवड करण्‍यास सक्षम करते. तसेच, स्‍टोअरमधील समर्पित सर्विस सेंटर ग्राहकांना खरेदीनंतर उत्‍साहपूर्ण सपोर्टची खात्री देते.
या लाँचला साजरे करण्‍यासाठी अंधेरी पश्चिम एक्‍स्‍पेरिअन्‍स स्‍टोअरला भेट देणाऱ्या ग्राहकांना विशेष पेटीएम फर्स्‍ट लाभांचा आनंद घेता येऊ शकतो, जसे:
• विशेष प्रवास व डायनिंग ऑफर्स.
• आघाडीच्‍या ओटीटी, म्‍युझिक, वेलनेस व इन्‍फोटेन्‍मेंट प्‍लॅटफॉर्म्‍सवर ३० हून अधिक मोफत सबस्क्रिप्‍शन्‍स.
• ४० हून अधिक ब्रँड गिफ्ट कार्ड्सवर विशेष सूट आणि प्रीमियम ब्रॅड्सकडून २५ हून अधिक टॉप डिल्‍स.
• देशभरातील १०० हून अधिक प्रीमियम रेस्‍टॉरंट्समध्‍ये बाय-१-गेट-१-फ्री बुफे डिल्‍स.
सॅमसंग न्‍यूजरूम इंडिया: Samsung Enhances Mumbai Retail Presence with New Premium Experience Store in Andheri West

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button