सॅमसंगने भारतातील ९,४०० तरूणांना रिटेल करिअरकरिता कुशल करण्‍यासाठी ‘दोस्‍त सेल्‍स’ उपक्रमाचा विस्‍तार केला

News Service
  • हा उपक्रम भारतभरातील सर्वसमावेशक रिटेल कर्मचारीवर्ग विकासाला गती देणार
  • वर्गामध्‍ये अध्‍ययन आणि संपूर्ण भारतात ऑन-द-जॉब प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातून रोजगारासाठी आवश्‍यक सुसज्‍जता वाढवणार
  • पात्र उमेदवारांना सरकार-मान्‍यताकृत नॅशनल स्किल्‍स क्‍वॉलिफिकेशन्‍स फ्रेमवर्क (एनएसक्‍यूएफ) प्रमाणपत्र देण्‍यात येईल, ज्‍यामुळे त्‍यांना दीर्घकालीन करिअर संधी मिळतील

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने त्‍यांचा प्रमुख सॅमसंग डिजिटल अँड ऑफलाइन स्किल्‍स ट्रेनिंग (दोस्‍त) सेल्‍स प्रोग्रामच्‍या मोठ्या विस्‍तारीकरणाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत वंचित समुदायांमधील ९,४०० तरूणांना आघाडीच्‍या रिटेल भूमिकांसाठी प्रशिक्षण देण्‍यात येईल. हा उपक्रम कुशल, भविष्‍याकरिता सुसज्‍ज कर्मचारीवर्ग घडवण्‍याप्रती, तसेच भारताच्‍या सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्‍या दृष्टिकोनाला गती देण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता अधिक दृढ करतो.
२०२१ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून दोस्‍त सेल्‍स प्रोग्रामने भारतातील झपाट्याने विस्‍तारित होत असलेल्‍या संघटित रिटेल क्षेत्रासाठी प्रबळ टॅलेंट समूह तयार केला आहे. यंदा सुरू झालेल्‍या दोस्‍त सेल्‍स ४.० सह सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍स सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) आणि टेलिकॉम सेक्‍टर स्किल्‍स कौन्सिल (टीएसएससी) यांच्‍यासोबत सहयोगाने आपले स्किलिंग मिशन अधिक दृढ करत आहे.

”सॅमसंग भारतातील तरूणांना देशाच्‍या विकासगाथेमध्‍ये अर्थपूर्णपणे सामील होण्‍यास सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. दोस्‍त सेल्‍स प्रोग्राम हा उद्योगामधील पहिला उपक्रम असण्‍यासोबत केंद्रित ५-महिन्‍यांचा प्रशिक्षण उपक्रम आहे, जो विशेषत: वंचित समुदायांमधील तरूणांना आजच्‍या गतीशील रिटेल वातावरणामध्‍ये प्रगती करण्‍यासाठी आवश्‍यक असलेला आत्‍मविश्वास, ज्ञान आणि व्‍यावहारिक कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आला आहे. यंदा प्रशिक्षणामध्‍ये नोंदणीचे प्रमाण तिप्‍पटीने वाढण्‍यासह दोस्‍त डिजिटल अवलंबनाला गती मिळण्‍याच्‍या आणि रिटेल क्षेत्रात विकास होत असण्‍याच्‍या काळामध्‍ये प्रबळ, रोजगाराकरिता सुसज्‍ज टॅलेंट समूहाला आकार देण्‍यामध्‍ये मदत करत आहे,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट आशियाच्‍या सीएसआर व कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍सचे प्रमुख शुभम मुखर्जी म्‍हणाले.

संरचित, उद्योगासाठी सुसज्‍ज प्रशिक्षण मार्ग
प्रत्‍येक प्रशिक्षणार्थीला १२० तासांच्‍या ऑनलाइन क्‍लासरूम मॉड्यूलच्‍या माध्‍यमातून शिक्षण दिले जाते, ज्‍याचे नेतृत्‍व ईएसएससीआय व टीएसएससीमधील प्रमाणित प्रशिक्षक करतात. तसेच सॅमसंग रिटेल सेल्‍स टीमकडून ६० तासांचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्‍यासक्रमामध्‍ये पुढील बाबींचा समावेश आहे:
• ग्राहकांसोबत परस्‍परसंवाद व चर्चा
• विक्रीबाबत मुलभूत गोष्‍टी आणि रिटेल प्रकिया
• उत्‍पादनाबाबत माहिती आणि प्रात्‍यक्षिक कौशल्‍ये
• स्‍टोअरमधील कार्यसंचालन व उत्‍कृष्‍ट सेवा देण्‍याबाबत मार्गदर्शन
देशभरातील सॅमसंग रिटेल स्‍टोअर्समध्‍ये ५ महिन्‍यांच्‍या ऑन-द-जॉब प्रशिक्षणादरम्‍यान (ओजेटी) प्रशिक्षणार्थींना ग्राहकांसोबत संबंध, स्‍टोअर प्रक्रिया, उत्‍पादनाबाबत माहिती आणि विक्री रूपांतरणाचा प्रत्‍यक्ष अनुभव देण्‍यात येईल आणि त्‍यांचे शिक्षण व प्रशिक्षण अनुभवाला मदत करण्‍यासाठी सॅमसंगकडून मासिक वेतन मिळेल.
प्रशिक्षणानंतर पात्र उमेदवारांना सरकार-मान्‍यताकृत नॅशनल स्किल्‍स क्‍वॉलिफिकेशन्‍स फ्रेमवर्क (एनएसक्‍यूएफ) संलग्‍न प्रमाणपत्र मिळते, ज्‍यासह त्‍यांची रोजगारक्षमता वाढते आणि भारतातील संघटित रिटेल परिसंस्‍थेमध्‍ये दीर्घकालीन करिअर घडवण्‍यासाठी मार्ग खुले होतात.

रिटेल व्‍यावसायिकांच्‍या भावी पिढी कुशल होईल
दोस्‍त सेल्‍स प्रोग्रामच्‍या माध्‍यमातून सॅमसंग तरूण इच्‍छुकांना ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स रिटेलमध्‍ये स्थिर करिअर घडवण्‍याकरिता आवश्‍यक असलेली मुलभूत कौशल्‍ये देते. संरचित अभ्‍यासक्रम सहभागींना सेल्‍स प्रमोटर्स म्‍हणून भूमिकांसाठी सक्षम करतो. हे आघाडीचे तज्ञ ग्राहकांना उत्‍पादनाबाबत माहिती, प्रात्‍यक्षिके व खरेदी निर्णयासंदर्भात साह्य करतात.
”ईएसएससीआयला दोस्‍त सेल्‍स प्रोग्रामसाठी सॅमसंगचा सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो. हा उपक्रम भारतातील स्किलिंग परिसंस्‍था प्रबळ करतो आणि तरूणांना सक्षम करतो. हा सहयोग रोजगारासाठी वास्‍तविक मार्ग निर्माण करतो आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देतो, ज्‍यासह उच्‍च दर्जाचे प्रशिक्षण, उद्योगाशी संबंधित मानक आणि भारतातील तरूण कर्मचारीवर्गासाठी स्थिर करिअर मार्ग निर्माण करण्‍याप्रती आमची समान कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे,” असे ईएसएससीआयचे अध्‍यक्ष विनोद शर्मा म्‍हणाले.

”टीएसएससीमध्‍ये आमचे कर्मचारीवर्ग घडण्‍याचे मिशन आहे, जे भारताच्‍या झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेला प्रबळ करण्‍याप्रती सक्षम असतील. दोस्‍त सेल्‍स प्रोग्राम अंतर्गत सॅमसंगसोबतचा आमचा सहयोग उच्‍च दर्जाचे रिटेल कौशल्‍य देण्‍याप्रती आणि तरूणांना उद्योगासाठी आवश्‍यक क्षमतांसह सुसज्‍ज करण्‍याप्रती आमच्‍या प्रयत्‍नांना अधिक प्रबळ करतो. दोस्‍त प्रोग्राम खात्री देतो की स्किलिंगमधून अर्थपूर्ण रोजगार संधी निर्माण होतील, स्थिर करिअर मार्ग मिळतील आणि पारंपारिकरित्‍या संरचित कौशल्‍य मर्यादित स्‍वरूपात उपलब्‍ध असलेल्‍या समुदायांच्‍या सर्वसमावशेकतेला गती देईल,” असे टीएसएससीचे सीईओ लेफ्टनंट जनरल के एच गवस म्‍हणाले.

मोठ्या प्रमाणात अनुकूल प्रभावाला चालना: सर्वसमावशेक विकासासाठी स्किलिंग
दोस्‍त सेल्‍स प्रोग्राम सॅमसंगचा दृष्टिकोन ‘पॉवरिंग डिजिटल इंडिया’ प्रबळ करतो, जेथे मोठ्या प्रमाणात कौशल्‍य विकासाला पाठिंबा देतो आणि विविध सामाजिक व प्रादेशिक पार्श्वभूमीमधील तरूणांना अर्थपूर्ण रोजगार संधी उपलब्‍ध असण्‍याची खात्री घेतो. राष्‍ट्रीय कौशल्‍य विकास मोहिमांशी संलग्‍न होत आणि सरकार-नेतृत्वित सेक्‍टर स्किल कौन्सिल्‍ससोबत सहयोग करत सॅमसंग भारतातील रिटेल टॅलेंट क्षेत्राला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दोस्‍त सेल्‍स ४.० सर्वसमावेशक, शाश्वत विकासाला गती देण्‍याप्रती सॅमसंगच्‍या कटिबद्धतेमधील आणखी एक पाऊल आहे, जेथे सॅमसंग कौशल्‍यामधील तफावतींना दूर करत आहे आणि भारतातील तरूणांना आत्‍मविश्वासाने देशाच्‍या डिजिटल व आर्थिक परिवर्तनामध्‍ये सामील होण्‍यास मदत करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button