सॅमसंग फॅब ग्रॅब फेस्‍टने यंदा सणासुदीच्‍या काळात सर्वात मोठ्या ऑफर्ससह एआयची क्षमता आणली

News Service
  • एसी, टेलिव्हिजन आणि मॉनिटरवर लागू करण्‍यात आलेली नवीन जीएसटी कपात आता देण्‍यात येत आहे.
  • गॅलेक्‍सी एआयची शक्‍ती असलेले गॅलेक्‍सी झेड फोल्‍ड७, झेड फ्लिप७, एस२५ अल्‍ट्रा आणि एस२४ एफई यांसारख्‍या प्रमुख मॉडेल्‍सवर जवळपास ५३ टक्‍के सूट.
  • गॅलेक्‍सी टॅब एस११ अल्‍ट्रा, वॉच८ क्‍लासिक आणि बड्स३ प्रो अशा लोकप्रिय डिवाईसेसवर जवळपास ५० टक्‍के सूट.
  • गॅलेक्‍सी बुक५ प्रो ३६०, बुक५ आणि बुक४ सिरीजवर जवळपास ५९ टक्‍के सूट.
  • जवळपास ५१ टक्‍के सूटसोबत अतिरिक्‍त फायदे जसे मोफत साऊंडबार/टीव्‍ही, इन्‍स्‍टण्‍ट कार्ट सूट, एक्‍स्‍चेंज बोनस आणि ३-वर्षांची वॉरंटी.
  • रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, मायक्रोवेव्‍ह्ज आणि एसींवर जवळपास ४८ टक्‍के सूट, तसेच विस्‍तारित वॉरंटी आणि ईएमआय पर्याय.

गुरूग्राम, भारत – सप्‍टेंबर ३०, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने ग्राहकांना यंदा सणासुदीच्‍या काळामध्‍ये आजपासून सुरू होत असलेला त्‍यांचा सर्वात मोठा शॉपिंग इव्‍हेण्‍ट ‘फॅब ग्रॅब फेस्‍ट’दरम्‍यान आकर्षक किमतींत आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय)च्‍या क्षमतेचा अनुभव घेण्‍यास आवाहन केले आहे.
सॅमसंगच्‍या एआय-समर्थित टीव्‍ही, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स, स्‍मार्टफोन्‍स, मॉनिटर्स, साऊंड डिवाईसेसच्‍या व्‍यापक पोर्टफोलिओमध्‍ये विशेष उत्‍सवी ऑफर्ससह फॅब ग्रॅब फेस्‍ट ग्राहकांसाठी सॅमसंगच्‍या सर्वोत्तम परिसंस्‍थेत अपग्रेड होण्‍याकरिता अल्टिमेट संधी आहे, जे दैनंदिन राहणीमानाला उत्‍साहित करतात.
उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, जीएसटी कपातीनंतर नवीन कमी झालेल्‍या किमती आता एसी, टीव्‍ही आणि मॉनिटर्सवर देखील लागू आहे.
सवलतीच्‍या किमतींमध्‍ये सॅमसंगच्‍या एआय-समर्थित परिसंस्‍थेसह स्‍मार्ट राहणीमान
यंदा सणासुदीच्‍या काळात सॅमसंग आपल्‍या एआय-संचालित नाविन्‍यतांच्‍या शक्तिशाली पोर्टफोलिओसह प्रत्‍येक घरामध्‍ये भावी स्‍मार्ट राहणीमान घेऊन येत आहे. रिअल-टाइम भाषांतर, सर्वोत्तम फोटो एडिटिंग आणि उत्‍पादकता टूल्‍स सक्षम करणाऱ्या स्‍मार्टफोन्‍समधील उल्‍लेखनीय गॅलेक्‍सी एआयपासून कन्‍टेन्‍ट ऑप्टिमाइज करणारे एआय-सक्षम टेलिव्हिजन्‍स आणि सुधारित कार्यक्षमतेसाठी वापराच्‍या पद्धती जाणून घेणाऱ्या अप्‍लायन्‍सेसपर्यंत सॅमसंग आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सला सहजसाध्य व प्रभावी करत आहे. स्‍मार्टफोन, टीव्‍ही, रेफ्रिजरेटर किंवा वॉशिंग मशिन असो प्रत्‍येक डिवाईस दैनंदिन टास्‍क्‍स सर्वोत्तम, वैयक्तिकृत आणि कनेक्‍टेड करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. फॅब ग्रॅब फेस्‍टदरम्‍यान मोठ्या उत्‍सवी सूट, कॅशबॅक ऑफर्स आणि अपग्रेड प्रोग्राम्‍ससह ही सॅमसंगचे नेक्‍स्‍ट-जनरेशन एआय तंत्रज्ञान घरी आणण्‍याची परिपूर्ण वेळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button