भारत, मे १६, २०२५: सॅमसंग हा भारतातील सर्वात मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड भूतानच्या दुर्गम भागांमधील उत्कट शिक्षकांचे त्यांचा वाढता समुदाय ‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’ या अद्वितीय समुदाय-केंद्रित उपक्रमामध्ये स्वागत करत आहे. हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्रशासकांना सक्षम करत शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’चा वारंवार ऑन-ग्राऊंड व ऑनलाइन लर्निंग इव्हेण्ट्सच्या माध्यमातून भावी क्लासरूम्ससाठी शिक्षकांना सुसज्ज करण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम भारतात डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्यात आला होता. आता, सर्वोत्तम कार्यशाळा आणि सहयोगात्मक अध्ययनाच्या माध्यमातून भूतानमधील शिक्षक चळवळीचा भाग आहेत, जी तंत्रज्ञान व नाविन्यतेसह क्लासरूम्सना नव्या उंचीवर घेऊन जात आहे.

सॅमसंगने या शिक्षकांसाठी गुरूग्रामधील त्यांच्या एक्झिक्युटिव्ह बिझनेस सेंटर (ईबीसी) येथे ‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’ इमर्शन प्रोग्रामचे आयोजन केले. यापैकी अनेक शिक्षक भूतानमधील दुर्गम व वंचित समुदायांमधील होते. इमर्शन प्रोग्रामदरम्यान शिक्षकांना गॅलॅक्सी इकोसिस्टमसह गॅलॅक्सी स्मार्टफोन्स, गॅलॅक्सी बुक्स, टॅब्लेट्स, फ्लिपबोर्ड्स आणि डिस्प्लेजचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
तसेच, त्यांना शिक्षणामधील सॅमसंगच्या नवीन इनोव्हेशन्ससह आधुनिक, सर्वसमावेशक अध्यापनासाठी डिझाइन करण्यात आलेले गॅलॅक्सी डिवाईसेस आणि गॅलॅक्सी एआय अॅप्लीकेशन्सची ओळख करून देण्यात आली. टीचर अँड एज्युकेशन लीडरशीप डिव्हिजन (टीईएलडी), डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड स्किल्स डेव्हलपमेंट, भूतान यांच्यासोबत सहयोगाने ही सुविधा देण्यात आली.
“मी यापूर्वी कधीच इंटरअॅक्टिव्ह व्हाइटबोर्डचा वापर केला नव्हता. त्याचे कार्य पाहून मला विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाला अधिक सर्वसमावेशक करण्याच्या अनेक युक्त्या मिळाल्या,” असे वांगडू प्रायमरी स्कूलमधील शिक्षक खांडू म्हणाले.

सॅमसंगच्या प्रादेशिक मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या इमर्शन प्रोग्राममध्ये भूतानमधील विविध शाळांमधील शिक्षकांचा सहभाग दिसण्यात आला, जसे खांडोथांग प्रायमरी स्कूल (सामत्से), पेल्नीथांग हायर सेकंडरी स्कूल (गेलेफू, सरपांग), लोबेसा लोअर सेकंडरी स्कूल (पुनाखा झोंगखाग), योचेन सेंट्रल स्कूल (पेमा गात्शेल), फुएन्शोलिंग प्रायमरी स्कूल (फुएन्शोलिंग थ्रॉमडे) आणि छुखा झोंगखाग.
“आम्हाला आज पाहायला मिळालेल्या तंत्रज्ञाानामधून क्लासरुम्स अधिक उत्साहवर्धक व विद्यार्थी-अनुकूल करता येऊ शकण्याबाबत समजले. आम्ही आमच्या स्वत:च्या शाळांमध्ये लहान बदल कशाप्रकारे करू शकतो, याबाबत मी विचार करत आहे,” असे पेल्नीथांग हायर सेकंडरी स्कूल (गेलेफू, सरपांग) येथील शैक्षणिक प्रमुख घाना श्याम धुन्गाना म्हणाले.
तंत्रज्ञानामधील जागतिक प्रमुख सॅमसंग शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक अध्यपान पद्धती एकीकृत करण्यास सक्षम करणारे फ्यूचर-रेडी क्लासरूम्स विकसित करत शिक्षणाच्या भविष्याला नवीन आकार देण्याप्रती कटिबद्ध आहे. ‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सॅमसंग शिक्षकांना साह्य करण्यासोबत शाळांना शैक्षणिक इनोव्हेशनमध्ये प्रमुख म्हणून उदयास येण्यासाठी देखील मदत करते.
“सॅमसंगमध्ये आम्हाला माहित आहे की शिक्षकांना प्रेरित करणे म्हणजे परिवर्तनाला चालना देणे, जे क्लासरूम्सना जिज्ञासू, सर्जनशीलता आणि संबंधाच्या वैविध्यपूर्ण स्पेसेसमध्ये बदलतात. ‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’च्या माध्यमातून आमचा उत्साह जागृत करण्याचा मनसुबा आहे, जो भावी पिढ्यांच्या विचारांना आकार देतो. आम्हाला हा उपक्रम भारताबाहेर विस्तारित होताना, अध्ययन व सहयोगासाठी जागतिक प्लॅटफॉर्ममध्ये बदलताना पाहण्याचा अभिमान वाटतो,” असे सॅमसंग इंडियाचे प्रवक्ता म्हणाले.
‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’ उपक्रम शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोफत दिला जातो, ज्यामधून शैक्षणिक प्रगतीसाठी बहुमूल्य संसाधने आर्थिक अडथळ्यांशिवाय उपलब्ध होण्याची खात्री मिळते. हा उपक्रम गॅलॅक्सी एमपॉवर्ड साइटवर आणि प्रत्यक्ष बूट कॅम्प्समध्ये विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण, सेल्फ-पेस कोर्सेस् देतो.
“या भेटीने मला आठवण करून दिली की, तंत्रज्ञान फक्त मोठ्या शहरांसाठी नाही. योग्य पाठिंब्यासह दुर्गम भागांमधील शाळांना देखील या इनोव्हेशन्समधून फायदा होऊ शकतो,” असे जिगमिलिंग प्रायमरी स्कूल (टँग, भूमथांग) येथील ऑफिसिएटिंग प्रिन्सिपल पेमा दोरजी म्हणाले.
भारतात डिसेंबर २०२४ पासून ‘गॅलॅक्सी एम्पॉवर्ड’ अंतर्गत २५० हून अधिक शाळांमधील ४,८०० हून अधिक शिक्षकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहे. या उपक्रमाचा २०२५ पर्यंत भारतातील ६०० शाळांमधील २०,००० शिक्षकांना सक्षम करण्याचा मनसुबा आहे.