३१ जुलै २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सांगितले की, देशभरातील निवडक बाजारपेठांमध्ये गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ची अभूतपूर्व मागणी दिसून येत आहे, हा स्मार्टफोन ‘आउट-ऑफ-स्टॉक’ झाला आहे. ही अभूतपूर्व मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी नोएडा येथील त्यांच्या उत्पादन कारखान्यात आवश्यक पावले उचलत आहे.
सॅमसंग इंडियाने यापूर्वी घोषणा केली की, त्यांचे सातव्या पिढीतील फोल्डेबल्स गॅलॅक्सी झेड फोल्ड७, गॅलॅक्सी झेड फ्लिप७ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप७ एफई या स्मार्टफोन्सनी भारतात फक्त ४८ तासांमध्ये २१०,००० प्री-ऑर्डर्सचा विक्रम रचला आहे, ज्यामधून भारतात फोल्डेबल फॉर्म फॅक्टर झपाट्याने अवलंबले जात असल्याचे दिसून येते.
”आम्ही गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ला ब्लॉकबस्टर सुरूवात देण्यासाठी भारतातील तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांचे आभार व्यक्त करतो. आम्हाला माहित आहे की, देशातील अनेक बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणीमुळे या स्मार्टफोनचा तुटवडा भासत आहे. ग्राहकांना लवकरात लवकर गॅलॅक्सी झेड फोल्ड७ चा आनंद घेता यावा याकरिता आम्ही आमच्या सर्वात प्रगत स्मार्टफोनचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अधिक काम करत आहोत. किरकोळ बाजारपेठ आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रबळ मागणी दिसण्यात येत आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुलन म्हणाले.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ हा आतापर्यंतचा सर्वात सडपातळ व वजनाने हलका स्मार्टफोन आहे. फक्त २१५ ग्रॅम वजन असलेला गॅलॅक्सी झेड फोल्ड७ गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रापेक्षा वजनाने हलका आहे. फोल्ड केल्यानंतर या स्मार्टफोनची जाडी फक्त ८.९ मिमी आणि अनफोल्ड केल्यानंतर ४.२ मिमी आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ब्ल्यू शॅडो, सिल्व्हर शॅडो, मिंट आणि जेट ब्लॅक अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
प्रबळ मागणीबाबत मत व्यक्त करत भारतभरातील स्मार्टफोनसाठी प्रमुख रिटेल सहयोगी विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता म्हणाले, ”सॅमसंगचे सातव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्स, विशेषत: गॅलॅक्सी झेड फोल्ड७ आमच्या स्टोअर्समध्ये अपवादात्मक कामगिरी करत आहेत. आम्हाला या स्मार्टफोनसाठी प्रबळ मागणी होताना दिसत आहे, जेथे प्रमुख शहरांमधील आमच्या बहुतांश टॉप आऊटलेट्समध्ये या स्मार्टफोन्सचा साठा संपला आहे. यामधून स्पष्टपणे दिसून येते की, ग्राहक हा डिवाईस देत असलेली नाविन्यता आणि प्रीमियम अनुभवासह आनंदित झाले आहेत आणि फोल्डेबल स्मार्टफोन्सचा अधिक प्रमाणात अवलंब होण्याचे संकेत आहे.”
”सॅमसंगच्या सातव्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्सनी, विशेषत: गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ने आमच्या रिटेल नेटवर्कमध्ये उल्लेखनीय विक्री कामगिरी केली आहे. आमहाला मागणीमध्ये वाढ होताना दिसत आहे, तसेच प्रमुख शहरी भागांमधील आमच्या बहुतांश प्रमुख स्टोअर्समध्ये या स्मार्टफोनचा साठा संपला आहे. यामधून ग्राहक फोल्डेबल स्मार्टफोन्सना अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते,” असे इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड (बजाज इलेक्ट्रॉनिक्स)चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सिंग जॉली म्हणाले.
पूर्विका मोबाइल्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी उवराज नटराजन म्हणाले, ”गॅलॅक्सी झेड फोल्ड७ ला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळण्यासह मोठे यश मिळाले आहे. आमच्या स्टोअर्समध्ये पोहोचताच या स्मार्टफोनचा साठा संपत आहे.”
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मधील वास्तविक मल्टीमोडल एजंट म्हणून डिझाइन करण्यात आलेले वन यूआय ८ मोठ्या स्क्रिनवरील मल्टीटास्किंगसाठी सर्वोत्तम टूल्स देते, जे वापरकर्ते काय टाइप करतात, काय म्हणतात आणि काय पाहतात हे समजून घेते. गूगलच्या जेमिनी लाइव्हसह वापरकर्ते रिअल टाइममध्ये त्यांची स्क्रिन शेअर करू शकतात, तसेच एआय असिस्टण्टसह संवाद साधू शकतात, ज्यामुळे दिसणाऱ्या चित्रांवर आधारित संदर्भीय विनंत्या करता येतात. वन यूआय ८ नवीन नॉक्स एन्हान्स्ड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन (केईईपी)सह वैयक्तिकृत एआय अनुभवांमध्ये सुधारित गोपनीयता देते. केईईपी डिवाईसेच्या सुरक्षित स्टोरेज क्षेत्रामध्ये एन्क्रिप्टेड, अॅप-विशिष्ट स्टोरेज वातावरण तयार करते, ज्यामधून प्रत्येक अॅप त्यांच्या संवेदनशील माहितीसह उपलब्ध होण्याची खात्री मिळू शकते.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मधील आर्मर फ्लेक्सहिंज सडपातळ व हलके आहे, ज्याचे श्रेय सुधारित वॉटर ड्रॉपलेट डिझाइन आणि नवीन वापरण्यात आलेल्या मल्टी-रेल रचनेला जाते, जे दृश्यमानतेमध्ये येणारे व्यत्यय कमी करतात. कव्हर डिस्प्ले कॉर्निंग® गोरिला® ग्लास सिरॅमिक २ या नवीन काचेच्या सिरॅमिकसह बनवण्यात आले आहे, जेथे ग्लास मॅट्रिक्समध्ये बारकाईने क्रिस्टल्सचा समावेश करण्यात आला आहे. फ्रेम व हिंज हाऊसिंगमधील अॅडवान्स्ड आर्मर अॅल्युमिनिअम क्षमता व मजबूती १० टक्क्यांनी वाढवते. मुख्य डिस्प्ले अधिक सडपातळ व वजनाने हलके असण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, पण शक्तिशाली देखील आहे. टायटॅनिअम प्लेट स्तराचा वापर करण्यात आला आहे. तसेच, अल्ट्रा-थिन ग्लास (यूटीजी)ची जाडी ५० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे हा सर्वात शक्तिशाली डिस्प्ले आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड७ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाइट फॉर गॅलॅक्सीची शक्ती आहे, जे पूर्वीच्या जनरेशनच्या तुलनेत एनपीयूमध्ये ४१ टक्के, सीपीयूमध्ये ३८ टक्के आणि जीपीयूमध्ये २६ टक्के अधिक कार्यक्षमता देते. यामुळे गॅलॅक्सी झेड फोल्ड७ची तडजोड न करता डिवाईसेसवर अधिक एआय अनुभव देण्याची क्षमता वाढते. तसेच, गॅलॅक्सी झेड सिरीजमध्ये पहिल्यांदाच २०० मेगापिक्सल वाइड-अँगल कॅमेरा आहे, जो ४ पट अधिक सुस्पष्टपणे फोटो कॅप्चर करतो, जे ४४ टक्के ब्राइट असतात. सॅमसंगचे नेक्स्ट जनरेशन प्रोव्हिज्युअल इंजिन जलदपणे फोटोंची प्रक्रिया करते.