सॅमसंग इंडियाने पंजाबमध्‍ये पूरग्रस्‍त ग्राहकांना साह्य करण्‍यासाठी आपत्ती मदत व देखभाल उपक्रम सुरू केला

News Service
  • देशाच्‍या कोणत्‍याही भागामध्‍ये आपत्ती स्थिती ओढावलेल्‍या समुदायांना त्‍वरित मदत करण्‍यासाठी प्रमुख शहरांमध्‍ये केअर कॅम्‍प इन्फ्रा तैनात करण्‍यासोबत सुसज्‍ज आहेत.
  • पाण्‍यात बुडलेले स्‍मार्टफोन्‍स, वॉशिंग मशिन्‍स, टेलिव्हिजन्‍स आणि रेफ्रिजरेटर्सशी संबंधित सर्विस विनंत्‍या आहेत.
  • नुकसान झालेल्‍या अप्‍लायन्‍सेसमुळे सॅमसंग कस्‍टमर सर्विसच्‍या सर्विस कॉल्‍समध्‍ये जवळपास ३० टक्‍के वाढ झाली आहे.

भारत – ऑक्‍टोबर, २०२५: सॅमसंगने पंजाबमध्‍ये नुकतेच महापूरामुळे बाधित झालेल्‍या ग्राहकांना व समुदायांना मदतीचा हात पुढे करण्‍यासाठी समर्पित आपत्ती मदत व देखभाल उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम आपत्तीग्रस्‍त भागांमध्‍ये आवश्‍यक घरगुती सेवा देण्‍यासाठी काळजीपूर्वक डिझाइन आखण्‍यात आला आहे, जेथे देखभाल शिबिरांमध्‍ये मुलभूत अप्‍लायन्‍सेस आणि आपत्‍कालीन किट्स आहेत.

वर्षानुवर्षे सॅमसंगने विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आव्‍हानात्‍मक काळात समुदायांना साह्य करण्‍यासाठी पुढाकार घेतला आहे, जसे श्रीनगरमध्‍ये व्‍हॅली ऑफ होप (२०१४), केअर फॉर केरळ (२०१८) आणि केअर फॉर महाराष्‍ट्र (२०१९). या हस्‍तक्षेपांनी हजारो व्‍यक्‍तींना मुलभूत सुविधा उपलब्‍ध करून देण्यास, त्‍यांचे जीवन सुरळीत करण्‍यास आणि आव्‍हानात्‍मक स्थितींमध्‍ये आशेचा किरण मिळण्‍यास मदत केली आहे. 

प्रत्‍येक गजरेसाठी केअर कॅम्‍प

पंजबामधील गुरदासपूरमध्‍ये नुकतेच आलेल्‍या महापूरामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले. सॅमसंगला त्‍यांची संपर्क केंद्रे व सेवा केंद्रांच्‍या माध्‍यमातून साह्यतेसाठी विनंत्‍या मिळत आहेत. लोक पाठिंब्‍यासाठी सतत शिबिरामध्‍ये येत आहेत आणि आसपासच्‍या गावांमध्‍ये स्‍थानिक घोषणा व संवाद केले जात असल्‍यामुळे ही आकडेवारी वाढण्‍याची अपेक्षा आहे.

बहुतांश विनंत्‍या पाण्‍यामध्‍ये बुडलेले स्‍मार्टफोन्‍स, वॉशिंग मशिन्‍स व रेफ्रिजरेटर्ससाठी करण्‍यात आल्‍या आहेत. कुटुंबं दररोज या महत्त्वपूर्ण उपकरणांवर अवलंबून असतात. त्‍वरित मदतीसाठी सॅमसंगने आपल्‍या कस्‍टर सर्विस टीम्‍स तैनात केल्‍या आहेत, ज्‍या प्रत्‍यक्ष साह्य करतील. 

व्‍यक्‍तींमध्‍ये या शिबिरांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी अधिकृत सेवा केंद्रांमध्‍ये शाखा कार्यलयांवर पोस्‍टर्स लावण्‍यात आली आहेत, तसेच सॅमसंग मेम्‍बर्सवर बॅनर्स लाइव्‍ह आहेत, सोशल मीडियावर पोस्‍ट्स वाढवण्‍यात येत आहेत आणि पंजाबमधील पूरग्रस्‍त गावांमध्‍ये स्‍थानिक घोषणा करणाऱ्या वेईकल्‍स तैनात करण्‍यात आल्‍या आहेत.

पंजाब व्‍यतिरिक्‍त इतर आपत्‍कालीन स्थितींकरिता सुसज्‍जतेची खात्री घेण्‍यासाठी सॅमसंगने दिल्‍ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्‍नई या चार प्रमुख शहरांमध्‍ये मोठे टेण्‍ट्स आणि आवश्‍यक रिलीफ किट्स स्‍थापित केले आहेत. हे फिरते केअर सेंटर्स आपत्तीग्रस्‍त भागांमध्‍ये पुढील सुविधा देण्‍यासाठी कार्यान्वित करण्‍यात येतील:  

  • सॅमसंग वॉशिंग मशिन्‍समध्‍ये कपडे धुण्‍याची सुविधा.
  • सॅमसंग रेफ्रिजरेटर्समध्‍ये सुरक्षित फूड स्‍टोरेज व मेडिसीन कूलिंग.
  • सॅमसंग मायक्रोवेव्‍ह ओव्‍हन्‍सच्‍या माध्‍यमातून गरम जेवण आणि त्‍वरित फूड हिटिंग.
  • टाक्‍या, पंपांच्‍या माध्‍यमातून शुद्ध पिण्‍याच्‍या पाण्‍याची उपलब्‍धता आणि सतत पाण्‍याचा पुरवठा करण्‍यासाठी जनरेटर्स.

प्रत्‍येक शिबिरामध्‍ये टॅब्‍लेट्स, खुर्च्‍या, ड्राइंग रॅक्‍स, साबण, डिटर्जंट्स व सेफ्टी किट्ससोबत रिफ्लेक्‍टर वेस्‍ट्स, ग्‍लोव्‍ह्ज व कॅप्‍स आहेत, ज्‍यामुळे ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि स्‍वच्‍छ वातावरणाची खात्री मिळते.

कर्तव्‍याच्‍या पुढे जात केअर

आपत्तीनंतर सॅमसंगला उपकरणांचे नुकसान झाल्‍यामुळे सर्विस कॉल्‍समध्‍ये जवळपास ३० टक्‍के वाढ होत असल्‍याचे निदर्शनास येते. फील्‍ड-लेव्‍हल वॉईस-ऑफ-कस्‍टमर (व्‍हीओसी) अभिप्रायामधून प्रेरित सॅमसंगच्‍या सर्विस टीम्‍स त्‍वरित स्थितीचे मूल्‍यांकन करतात आणि आपत्ती मदत व देखभाल उपक्रम राबवत पीडित समुदायांपर्यंत पोहोचतात.

आपत्तीमुळे घरांचे नुकसान होऊ शकते, पण ग्राहक, सहयोगी आणि व्‍यापक समुदायाप्रती सॅमसंगची कटिबद्धता डगमगू शकत नाही.

सॅमसंगचा केअरचा वारसा

भारतापासून नेपाळपर्यंत आणि श्रीलंकापासून काश्‍मीरपर्यंत सॅमसंगचे मदत प्रयत्‍न त्‍यांच्‍या व्‍यापक नागरिकत्‍व व केअर तत्त्वाचा भाग राहिले आहेत, ज्‍यामधून नाविन्‍यता नेहमी मानवतेच्‍या सेवेसाठी असण्‍याची खात्री मिळते.

या वारसाव्‍यतिरिक्‍त नवीन आपत्ती मदत व देखभाल उपक्रम तंत्रज्ञान प्रमुख, तसेच गरजेच्‍या काळात विश्वसनीय सहयोगी असण्‍याच्‍या सॅमसंगच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button