विशाखापट्टणममधील विज्ञान कॉलेज व डीआयईटी कॉलेजमध्ये ७५० विद्यार्थ्यांना एआय आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंग या प्रोग्रामअंतर्गत प्रमाणित करण्यात आले
भारत – डिसेंबर, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस (एसआयसी) उपक्रमांतर्गत आपल्या फ्यूचर-टेक स्किलिंगला अधिक निपुण केले, जेथे आंधप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि डीआयईटी कॉलेज येथे सलग सत्कार समारोहांचे आयोजन केले.
यंदा विशाखापट्टणममधील या दोन केंद्रांमध्ये एकूण ७५० विद्यार्थ्यांना प्रोग्रामअंतर्गत प्रमाणित करण्यात आले, ज्यामध्ये विज्ञान कॉलेजमधील ५०० विद्यार्थी आणि डीआयईटी कॉलेजमधील २५० विद्यार्थी होते. हा भारतातील तरूणांना तंत्रज्ञान-संचालित भविष्यासाठी सुसज्ज करण्याप्रती सॅमसंगच्या मिशनमधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
आंध्रप्रदेशमधील सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पसच्या पदवीधरांचा सन्मान
आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये १२ डिसेंबर २०२५ रोजी सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून एमबीबीएस व सायबर क्राइम सीआयडीचे एसीपी डॉ. बी. रवी किरण, विज्ञान कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुधाकर ज्योथुला, तसेच इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय)च्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्सचे उपाध्यक्ष श्री. सरोज अपाटो यांनी उपस्थिती दर्शवून समारोहाची शोभा वाढवली.
विज्ञान कॉलेजमध्ये वर्षभरात कोर्स पूर्ण केलेल्या ५०० लाभार्थींचा सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रशिक्षित २५० विद्यार्थी आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंगमध्ये प्रशिक्षित २५० विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्राध्यापकवर्ग, मान्यवर आणि एसआयसी सहयोगी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांसह गौरवण्यात आले, ज्यासह शिस्तबद्ध, उद्योग-संबंधित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सन्मानित करण्यात आले. हे प्रशिक्षण उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते.
याच दिवशी, आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथील डीआयईटी कॉलेजमध्ये आणखी एका सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून डीआयईटी कॉलेजचे अध्यक्ष श्री दादी रत्नाकर गुरू आणि डीआयईटी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रूगदा वैकुंता राव, तसेच ईएसएससीआयच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्सचे उपाध्यक्ष श्री. सरोज अपाटो यांनी उपस्थिती दर्शवून समारोहाची शोभा वाढवली.
डीआयईटी कॉलेजमध्ये २५० एसआयसी लाभार्थींना आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये विशेषीकृत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्रांसह सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी अभिनंदन केले आणि आंध्रप्रदेशमध्ये स्थानिक रोजगार, नाविन्यता व उद्योजकता संधींना चालना देण्यामध्ये प्रगत डिजिटल कौशल्यांच्या महत्त्वाबाबत सांगितले.
भारतभरात फ्यूचर-टेक कौशल्यांमध्ये वाढ
सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस तरूणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), बिग डेटा आणि कोडिंग अँड प्रोग्रामिंगमध्ये प्रशिक्षित करत भारतातील डिजिटल स्किलिंग परिसंस्था मजबूत करत आहे. भारत सरकारच्या स्किल इंडिया व डिजिटल इंडिया मिशन्सशी संलग्न राहत या प्रोग्रामने २०२५ मध्ये १० राज्यांमधील २०,००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या ३,५०० विद्यार्थ्यांच्या तुलनेत सहा पट वाढ झाली आहे. हा उपक्रम सर्वसमावेशकतेवर देखील मुख्यत्वे लक्ष केंद्रित करतो, जेथे राष्ट्रीय स्तरावरील सहभागींमध्ये महिलांचे (विद्यार्थीनींचे) प्रमाण ४२ टक्के आहे, ज्यामधून सॅमसंगची दर्जेदार तंत्रज्ञान शिक्षण समानतेने उपलब्ध करून देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते.
सॅमसंग दर्जेदार टेक्निकल प्रशिक्षण, सॉफ्ट-स्किल्स विकास आणि प्लेसमेंटकरिता सुसज्जतेसाठी इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (ईएसएससीआय) आणि टेलिकॉम सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया (टीएसएससी) अंतर्गत मान्यताकृत प्रशिक्षण सहयोगींसोबत काम करत आहे. प्रोग्राम विशेषत: वंचित, अर्ध-शहरी व महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य देतो, ज्यामधून खात्री मिळते की विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमींमधील विद्यार्थी भारतातील डिजिटल परिवर्तनामध्ये सहभाग घेऊ शकतात.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतातील कर्मचारीवर्गाचे सक्षमीकरण
सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस, सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो आणि दोस्त (डिजिटल अँड ऑनलाइन स्किल्स ट्रेनिंग) अशा उपक्रमांच्या माध्यमातून सॅमसंग भारतातील तरूणांकरिता रोजगार, नाविन्यता व उद्योजकतेसाठी मार्ग निर्माण करत आहे. हे प्रोग्राम्स डिजिटली कुशल, नाविन्यता-सुसज्ज आणि भविष्य-केंद्रित टॅलेंटवर्ग घडवण्याप्रती कंपनीच्या दीर्घकालीन कटिबद्धतेला दृढ करतात, जेथे हे टॅलेंट आत्मनिर्भर भारताला अधिक दृढ करेल.