सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीज लाँच, किंमत ४२९९९ रूपयांपासून

News Service

नवीन टॅब एस१० एफईवरील इंटेलिजण्‍ट फिचर्ससह प्रो प्रमाणे मल्‍टीटास्किंग आणि क्रिएटिव्‍ह अभिव्‍यक्‍तीला चालना द्या

भारत – एप्रिल ७, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई आणि गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई+ च्‍या लाँचची घोषणा केली, जे प्रीमियम टॅब्‍लेट डिझाइनवरील गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये नवीन डिवाईसेस आहेत. गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीजवरील आतापर्यंतची सर्वात मोठी स्क्रिन आणि डिस्‍प्‍लेला विस्‍तारित करणारे अत्‍यंत स्लिम बेझल्‍स असलेला गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई+ मनोरंजनापासून अभ्‍यास आणि दैनंदिन टास्‍क्‍सपर्यंत सर्व गोष्‍टींसाठी धमाल, सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देतो. सॅमसंगचे इंटेलिजण्‍ट फिचर्स वापरकर्त्‍यांना सहजपणे अधिक टास्‍क्‍स करण्‍यास सक्षम करतात, तसेच अत्‍यंत स्लिम डिझाइन वापरकर्त्‍यांना चालता-फिरता सर्जनशीलता व उत्‍पादकता संपादित करण्‍यास मदत करते.

”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही प्रत्‍येकाला जागतिक दर्जाच्‍या नाविन्‍यतेचा अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत आणि नवीन गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीजच्‍या लाँचमधून तो दृष्टिकोन दिसून येतो. गॅलॅक्‍सी एआय क्षमता आमच्‍या एफई टॅब्‍लेट्समध्‍ये पदार्पण करत असताना आम्‍ही अत्‍याधुनि‍क तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा अधिक सहजसाध्य करत आहोत. गॅलॅक्‍सी एस१० एफई सिरीज गॅलॅक्‍सी वापरकर्त्‍यांना त्‍यांची सर्जनशीलता व उत्‍पादकता वाढवण्‍यास सक्षम करेल आणि आम्‍हाला भारतातील टॅब्‍लेट सेगमेंटमधील आमचे बाजारपेठ नेतृत्‍व अधिक दृढ करण्‍यास मदत करेल,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे उपाध्‍यक्ष आदित्‍य बब्‍बर म्‍हणाले.

आकर्षक डिस्‍प्‍ले
गॅलॅक्‍सी टॅब एस सिरीजच्‍या हेरिटेज डिझाइनला स्लिम बेझल्‍ससोबत एकत्र करत गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई+ चा १३.१-इंच डिस्‍प्‍ले स्क्रिनवर सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद देतो, जेथे हा डिस्‍प्‍ले पूर्वीच्‍या डिवाईसच्‍या तुलनेत जवळपास १२ टक्‍के मोठा आहे. ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटद्वारे सक्षम सुलभ व्हिज्‍युअल्‍स आणि हाय ब्राइटनेस मोड (एचबीएम)मध्‍ये जवळपास ८०० नीट्सपर्यंत जाणाऱ्या व्हिजिबिलिटीच्‍या नवीन लेव्‍हल्‍स गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई व्हिडिओज पाहताना आणि गेमिंगचा आनंद घेताना सानुकूल व्‍युईंग अनुभवाची खात्री देतात. व्हिजन बूस्‍टरचे ऑटोमॅटिक अॅडजस्‍टमेंट्स बाहेरील बदलत्‍या वातावरणात देखील ब्राइटनेस व व्हिजिबिलिटी वाढवतात, तर ब्‍ल्‍यू-लाइट एमिशन्‍स डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्‍यासाठी सुरक्षितपणे कमी करण्‍यात आले आहेत, जे प्रत्‍येक अद्वितीय व्‍युइंग गरजांची पूर्तता करतात.

प्रबळ कार्यक्षमता आणि वैविध्‍यपूर्ण डिझाइन
गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीज काम किंवा अभ्‍यास करताना उत्‍पादकता वाढवते आणि विनाव्‍यत्‍यय जलद, सुलभ गेमप्‍लेचा आनंद देते. परफॉर्मन्‍स अपग्रेड्स गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीज वापरकर्त्‍यांना प्रभावीपणे विविध अॅप्‍समध्‍ये स्विच होण्‍यास सक्षम करतात, ज्‍यामधून सुधारित मल्‍टीटास्किंगची खात्री मिळते. क्‍लासरूममधील किंवा कामाच्‍या ठिकाणी प्रत्‍येक क्षणांना कॅप्‍चर करायचे असल्‍यास नवीन अपग्रेड करण्‍यात आलेला १३ मेगापिक्‍सल रिअर कॅमेरा सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटो कॅप्‍चर करतो.

प्रबळ कामापासून विनासायास गेमिंग आनंदापर्यंत हे वैविध्‍यपूर्ण अनुभव वापरकर्त्‍यांना प्रत्‍येक ठिकाणी सुसज्‍ज करतात. पूर्वीच्‍या डिवाईसच्‍या तुलनेत ४ टक्‍के अधिक हलका असलेला गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सहजपणे सोबत नेता येतो. गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीज विनासायास स्‍टोरेज देतो आणि स्लिम डिझाइनमुळे घरामध्‍ये, कॅम्‍पसमध्‍ये, कामाच्‍या ठिकाणी व इतरत्र सहजपणे वाहून नेता येतो. स्थिरता व टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आलेली एफई सिरीज आयपी६८ रेटिंगसह येते.

प्रगत वैशिष्‍ट्ये
गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये प्रीमियम अनुभव देण्‍याच्‍या सॅमसंगच्‍या वारसाला अधिक दृढ करत गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई+ आणि गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई हे एफई सिरीजमधील पहिले मॉडेल्‍स आहेत, जे अत्‍याधुनिक एआय क्षमतांसह सुसज्‍ज आहेत, ज्‍यामुळे युजर उत्‍पादकतेला अधिक चालना मिळते.
• चाहत्‍यांचे आवडते सर्कल टू सर्च विथ गुगल वैशिष्‍ट्य टॅब्‍लेटवर दिसणाऱ्या गोष्‍टी सर्च करण्‍याची सुविधा देते, ज्‍यासाठी अॅप्‍स स्विच करण्‍याची गरज भासत नाही. तुम्‍हाला पाहिजे असलेली माहिती त्‍वरित मिळवा, स्क्रिनवरील मजकूर भाषांतरित करा किंवा स्‍टेप-बाय-स्‍टेप स्‍पष्‍टीकरणांसह होमवर्क पूर्ण करा आणि हे सर्व एकाच मोठ्या स्क्रिनवर करता येते.
• हँडराइटिंग व टेक्‍स्‍टच्‍या त्‍वरित गणनासाठी सॉल्‍व्‍ह मॅथ आणि गुंतागूंतीच्‍या नोट्स सहजपणे नोंद करण्‍यासाठी हॅडराइटिंग हेल्‍प यासारखी सॅमसंग नोट्स वैशिष्‍ट्ये सहजपणे नोटटेकिंगची सुविधा देतात, ज्‍यामुळे वापरकर्ते महत्त्वपूर्ण गोष्‍टींवर लक्ष केंद्रित करू शकतात.
• एआय असिस्‍टण्‍ट्स बुक कव्‍हर कीबोर्डवरील गॅलॅक्‍सी एआय कीच्‍या सिंगल टॅपसह त्‍वरित लाँच होतात. तसेच, अधिक वैयक्तिकृत अनुभवासाठी वापरकर्त्‍यांच्‍या पसंतीनुसार एआय असिस्‍टण्‍ट्स कस्‍टमाइज करता येऊ शकतात.
• अपगेडेड ऑब्‍जेक्‍ट इरेजर वापरकर्त्‍यांना प्रभावीपणे फोटोमधील नको असलेल्‍या गोष्‍टी दूर करण्‍याची सुविधा देते, जेथे त्‍वरित व सहज एडिट्ससाठी ऑटोमॅटिक सूचना मिळतात.
• नवीन सादर करण्‍यात आलेले बेस्‍ट फेस वैशिष्‍ट्य सर्वोत्तम अभिव्‍यक्‍ती व वैशिष्‍ट्यांची निवड करत आणि त्‍यांना एकत्रित करत परिपूर्ण ग्रुप फोटोची खात्री देते.
• ऑटो ट्रिम विनासायासपणे हायलाइट रील्‍स पूर्ण करण्‍यासाठी विविध व्हिडिओजमधून जात योग्‍य क्षणांची निवड करते.
• गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीज लुमाफ्यूजन, गुडनोट्स, क्लिप स्‍टुडिओ पेंट अशा प्री-लोड केलेल्‍या अॅप्‍स व टूल्‍सच्‍या, तसेच नोटशेल्‍फ ३, स्‍केचबुक व पिक्‍सार्ट अशा इतर स्‍पॉटलाइट अॅप्‍सच्‍या माध्‍यमातून सर्जनशीलतेसाठी परिपूर्ण कॅन्‍व्‍हास म्‍हणून देखील काम करते.
अधिक सर्वोत्तम एआय अनुभवासाठी एफई सिरीज इतर सॅमसंग गॅलॅक्‍सी डिवाईसेसशी विनासायासपणे एकीकृत होते. गॅलॅक्‍सी टॅब एस१० सिरीजप्रमाणे वापरकर्ते होम इनसाइट विजेट डॅशबोर्ड व ३डी मॅप व्‍ह्यू फिचरसह त्‍यांच्‍या होम स्‍टेटसचे सर्वसमावेशक पुनरावलोकन पाहू शकतात. स्‍मार्टथिंग्‍ज-सक्षम डिवाईसेसचे सारांश केलेले स्‍टेटस अपडेट्स वापरकर्त्‍यांना मन:शांती देतात.

नॉक्‍स सुरक्षितता
कोणत्‍याही गॅलॅक्‍सी डिवाईसप्रमाणे गॅलॅक्‍सी टॅब एस१० एफई सिरीजला सॅमसंगचे डिफेन्‍स-ग्रेड, मल्‍टी-लेयर सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्म सॅमसंग नॉक्‍सचे संरक्षण देण्‍यात आले आहे, जे एण्‍ड-टू-एण्‍ड हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्‍शन आणि सहयोगात्‍मक प्रोटेक्‍शनच्‍या माध्‍यमातून महत्त्वपूर्ण माहितीचे आणि असुरक्षिततांपासून संरक्षण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button