सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२५ ने ग्रँड फिनालेसाठी २० अंतिम संघांची घोषणा केली, ग्रामीण आणि द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील संकल्‍पनांना राष्‍ट्रीय स्‍तरावर आणले

News Service
  • भारतातील तरूण विद्यार्थ्‍यांचे अंतिम समूहामध्‍ये प्रभुत्‍व, जे विविध पार्श्वभूमींमधील असण्‍यासह १२ राज्‍यांचे प्रतिनिधीत्‍व करतात.
  • अंतिम फेरीमधील स्‍पर्धकांना सॅमसंग आरअँडडी तज्ञ, आयआयटी-दिल्‍लीचे प्राध्‍यापक आणि स्‍टार्टअप संस्‍थापकांकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल.
  • अव्‍वल २० संघांना एकत्रित २० लाख रूपये बक्षीसासह सन्‍मानित करण्‍यात येईल, तसेच संघामधील प्रत्‍येक सदस्‍याला नवीन सॅमसंग गॅलेक्‍सी झेड फ्लिप स्‍मार्टफोन मिळेल. 

भारत – ऑक्‍टोबर २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांची संपूर्ण भारतातील नाविन्‍यता स्‍पर्धा ‘सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२५’च्‍या चौथ्‍या पर्वाच्‍या अव्‍वल २० अंतिम संघांची घोषणा केली.

अंतिम स्‍पर्धकांमध्‍ये भारतातील ग्रामीण भागांमधील, तसेच १२ राज्‍यांतील द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील तरूण गुणवंतांचा समावेश आहे, यामधून तरूण परिवर्तनकर्त्‍यांना त्‍यांच्‍या समुदायामधील व्‍यापक समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यास प्रेरित करण्‍याप्रती या उपक्रमाचा दृष्टिकोन दिसून येतो. यंदा, १४ वर्षीय तरूण अंतिम स्‍पर्धक म्‍हणून पात्र ठरला, सर्व मुली असलेल्‍या संघाने अंतिम फेरीमध्‍ये प्रवेश केला आणि ईशान्‍येकडील दोन संघांनी अव्‍वल २० मध्‍ये स्‍थान मिळवले.

ते नाविन्‍यतांवर काम करत आहेत, जसे दृष्टिदोष असलेल्‍या व्‍यक्‍तींना स्‍वतंत्रपणे बुद्धिबळ खेळण्‍यास सक्षम करण्‍यासाठी एआय-समर्थित सोल्‍यूशन, प्रदूषणाबाबत माहिती मिळण्‍यासाठी आणि वोक्‍सेल मॅप्‍स तयार करण्‍यासाठी इमेजिंग सेन्‍सर्स माऊंटेड ड्रोन्‍स. याव्‍यतिरिक्‍त आंतरराष्‍ट्रीय सीमेवरील घुसखोरी आणि सुरक्षा उल्लंघनांचा इशारा देण्यासाठी ड्रोन-सक्षम एआय मॉनिटरिंग सिस्टमचा देखील विचार केला जात आहे.

निवडलेल्‍या संघांनी चार प्रमुख थीम्‍स अंतर्गत संकल्‍पना सादर केल्‍या: सुरक्षित, स्‍मार्ट व सर्वसमावेशक भारतासाठी एआय; भारतातील आरोग्‍य, स्‍वच्‍छता व स्‍वास्‍थ्‍याचे भविष्‍य; तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून पर्यावरणीय स्थिरता; आणि शिक्षण व उज्‍ज्‍वल भविष्‍याकरिता क्रीडा व तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सामजिक परिवर्तन.

”सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो दरवर्षाला अधिक मोठी, अधिक आकर्षक व अधिक सर्जनशील बनत आहे, तसेच भारतातील ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत पोहोचत आहे आणि स्‍मार्ट भारतासाठी नाविन्‍यतेचे लोकशाहीकरण करण्‍याच्‍या सॅमसंगच्‍या दृष्टिकोनासह पुढे वाटचाल करत आहे. अव्‍वल २० अंतिम स्‍पर्धकांमधून दिसून येते की, सहानुभूती व संदर्भासह तंत्रज्ञानाचा वापर केल्‍यास आरोग्‍यसेवा, शाश्वतता किंवा सर्वसमावेशक क्रीडा असो व्‍यक्‍तींच्‍या जीवनात परिवर्तन घडून येऊ शकते. आम्‍ही प्रत्‍यक्ष पाहिले आहे की विद्यार्थी एआयचा वापर करत काही सर्वात प्रचलित आरोग्‍यसेवा आव्‍हानांचे निराकरण करत आहेत, तसेच आयओटी व इतर उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांचा वापर करत वृद्धांना व विकलांग व्‍यक्‍तींना साह्य करत आहेत, ज्‍यामुळे यंदाची स्‍पर्धा अधिक सर्वसमावेशक ठरली आहे,” असे सॅमसंग साऊथवेस्‍ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्‍यक्ष एसपी चुन म्‍हणाले.

२०२५च्या पर्वामध्‍ये भारताच्या कानाकोपऱ्यातून अर्ज आले होते, ज्यामध्‍ये काचर (आसाम), बनगणपल्ली (आंध्र प्रदेश), बागपत (उत्तर प्रदेश), महबूबनगर (तेलंगणा) आणि सुंदरगड (ओडिशा) यांसारख्या ठिकाणांमधून प्रबळ प्रादेशिक प्रतिनिधीत्वाचा समावेश होता. 

आयआयटी दिल्लीच्या अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये अनुभवात्मक, प्रत्यक्ष प्रोटोटाइपिंग उपक्रमात सहभागी झालेल्या ४० संघांसह नुकतेच संपलेल्या उपांत्य फेरीतून अव्‍वल २० सघांची निवड करण्‍यात आली. हा टप्पा सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये रेसिडेन्शियल इनोव्हेशन बूटकॅम्प होता. त्यानंतर राष्‍ट्रीय पिच इव्हेंटमध्ये सॅमसंग ज्युरीने सॅमसंग आरअँडडी आणि नैऋत्य आशियातील तज्ञांचा समावेश करून अव्‍वल २० अंतिम संघांची निवड केली (प्रत्येक थीममधील पाच अंतिम संघ).

आता, पुढील फेरीकडे वाटचाल करत असताना अव्‍वल २० संघांना सॅमसंग तज्ञ, एफआयटीटी आणि आयआयटी दिल्लीच्या प्राध्यापकांकडून प्रत्‍यक्ष ऑनलाइन मार्गदर्शन मिळेल. 

अंतिम स्‍पर्धक कोण आहेत?

थीम सुरक्षितस्‍मार्ट व सर्वसमावेशक भारतसाठी एआय अंतर्गत चक्रव्‍यूह, एरर ४०४, पॅशेनट प्रॉब्‍लेम सॉल्‍व्‍हर, प्रीसीविया आणि सिकारियो यांसारखे संघ सुरक्षितता आणि उपलब्‍धततेला नवीन आकार देत आहेत. त्‍यांच्‍या सोल्‍यूशन्‍समध्‍ये एआय-आयओटी सर्व्‍हायलन्‍स नेटवर्क्‍स व महिलांसाठी रिअल-टाइम सेफ्टी अॅप्‍स, तसेच दृष्टिदोष असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी डिझाइन करण्‍यात आलेले वीअरेबल नेव्हिगेशन एड्स (उपकरण) आणि चेहरा ओळखण्‍याचे डिवाईसेस यांचा समावेश आहे.    

भारतातील आरोग्‍य, स्‍वच्‍छता व स्‍वास्‍थ्‍याचे भविष्‍य या श्रेणीमध्‍ये संकल्‍पना तितक्‍याच आकर्षक व मानवी-केंद्रित आहेत. अॅल्‍केमिस्‍ट, बीआरएचएम, हीअर ब्राइट, पॅरास्‍पीक आणि पिंग ब्रिगेडियर्स यांसारखे संघ उत्‍पादनांनामध्‍ये अग्रणी आहेत, जसे लवकर सिलिकोसिस निदानासाठी नॉन-इन्‍वेसिव्‍ह टूल्‍स, किफायतशीर मल्‍टी-अर्टिक्‍युलेटेड बायोनिक हँड्स, एआय-पॉवर्ड स्‍पीच रेकग्निशन टूल्‍स आणि प्रीडिक्टिव्‍ह ब्रेस्‍ट हेल्‍थ अॅप्‍लीकेशन्‍स, जे महिलांना लवकर निदान व जागरूकतेचे महत्त्व जाणून घेण्‍यास मदत करतात. 

थीम तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून पर्यावरणीय स्थिरता प्रभावाचे प्रमाण अधिक वाढवते. पृथ्‍वी रक्षक, ड्रॉप ऑफ होप, रिन्‍यूएबल डिसॅलिनेशन, स्‍मॉलब्‍लू आणि वॉक्‍समॅप्‍स यांसारखे संघ सोल्‍यूशन्‍स शेअर करत आहेत, ज्‍यामध्‍ये सौरऊर्जेच्‍या माध्‍यमातून जल निष्‍कर्षण (पाणी काढणे), स्वयंचलित गांडूळखत, मॉड्यूलर डिसॅलिनेशन, एआय-चालित कार्बन व प्रदूषण मॅपिंग यांचा समावेश आहे.

थीम शिक्षण व उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी क्रीडा व तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सामाजिक परिवर्तनमध्‍ये असलेले अंतिम स्‍पर्धक परिवर्तनाकडे रिअल-टाइम घटना म्‍हणून पाहतात. नेक्‍स्‍ट प्‍ले एआय, शतरंज स्‍वय क्रू, स्‍पोर्ट्स४ऑटिझम, स्‍टेटसकोड२००, युनिटी यांसारखे संघ ऑटिस्टिक मुलांसाठी गेमिफाइड थेरपी टूल्स, लुप्‍त क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि दृष्टिहीनांसाठी वॉईस-सक्षम बुद्धिबळ अॅप्स असे सोल्‍यूशन्‍स विकसित करत आहेत.  

अव्‍वल २० अंतिम संघांना (प्रतिथीम पाच) एकूण २० लाख रूपये बक्षीस मिळेल (प्रति संघाला १ लाख रूपये) आणि प्रत्‍येक सहभागीला (एकूण ३७) नवीन सॅमसंग गॅलेक्‍सी झेड फ्लिप स्‍मार्टफोन मिळेल.

पुढील वाटचाल

हा प्रवास आता २८ ऑक्‍टोबर व २९ ऑक्‍टोबर २०२५ रोजी नवी दिल्‍लीमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे. या दोन अॅक्‍शनने भरलेल्‍या दिवसांपूर्वी अव्‍वल २० संघांना एफआयटीटी आयआयटी दिल्‍ली येथे प्रोटोटाइपिंगसाठी समर्पित दिवस मिळेल. यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रँड फिनाले पिच प्रेझेन्‍टेशन केले जाईल. तिसऱ्या दिवशी सर्व २० संघांसाठी इन्‍व्‍हेस्‍टर मीट या सहभागींना त्‍यांच्‍या उद्योजकता प्रवासाच्‍या जवळ आणेल आणि शेवटी २९ ऑक्‍टोबर रोजी विजेत्‍यांची घोषणा व पुरस्‍कार सोहळ्यासह या पर्वाची सांगता होईल.

ग्रँड फिनालेमध्‍ये चार विजेत्‍या संघांना (प्रत्‍येक थीममधून एक) आयआयटी दिल्‍ली येथील सॅमसंग फॉर इन्‍क्‍यूबेशनकडून एकत्रित १ कोटी रूपयांचे अनुदान मिळेल, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या संकल्‍पनांना बाजारपेठेसाठी सुसज्‍ज सोल्‍यूशन्‍समध्‍ये रूपांतरित करण्‍यास सक्षम होतील.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button