सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो २०२५: तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून भारतातील क्रीडा क्षेत्रात सुविधा व सर्वसमावशेकतेचा मार्ग अधिक सोपा होणार

News Service

भारतातील लोक दीर्घकाळापासून क्रीडाला प्राधान्‍य देत आले आहेत, पण उत्तम प्रशिक्षण, सुविधा व अनुभवाच्‍या कमतरतेमुळे टॅलेंटला मर्यादांचा सामना करावा लागतो. आयआयटी दिल्‍लीसोबत सहयोगाने राबवण्‍यात आलेला सॅमसंगचा प्रमुख शैक्षणिक उपक्रम सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो (एसएफटी) २०२५ मध्‍ये तरूण नवप्रवर्तकांनी क्रीडाला संधीमध्‍ये बदलले, जेथे तंत्रज्ञानाचा फायदा घेत सुविधा व सर्वसमावेशकतेचे लोकशाहीकरण केले.

देशभरातील हजारो विद्यार्थ्‍यांनी थीम ‘क्रीडा व तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून सामाजिक परिवर्तन’अंतर्गत आवाहनाला प्रतिसाद दिला. ते भारतातील क्रीडा क्षेत्रात

पुढीलप्रमाणे संधी निर्माण करत आहेत:
१. उद्देश-केंद्रित थीम
या श्रेणीने प्रशिक्षण, व्‍हर्च्‍युअल कोचिंग, ई-स्‍पोर्ट्स आणि कौशल्‍य विकास अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देणाऱ्या नाविन्‍यतांना आवाहन केले, ज्‍यामागे भारतभरातील तरूणांसाठी आरोग्‍यदायी, महत्त्वाकांक्षी भविष्‍य घडवण्‍याचा मनसुबा होता.

२. नेक्‍स्‍टप्‍लेएआय: टॅलेंट शोधाचे लोकशाहीकरण
टेनिस खेळाडू व आयआयआयटी पुणे कम्‍प्‍युटर सायन्‍सचे विद्यार्थी आदिश शेळके आणि भाग्‍यश्री वीणा यांनी व्हिडिओ अॅनालिटिक्‍स व मशिन लर्निंगचा वापर करत एआय-समर्थित प्‍लॅटफॉर्म ‘नेक्‍स्‍टप्‍लेएआय’ डिझाइन केले, जे वैयक्तिकृत अभिप्राय आणि कामगिरीची तुलना करण्‍याच्‍या माध्‍यमातून क्रीडा क्षमतेला निदर्शनास आणते. त्‍यांचा उच्‍च दर्जाचे मार्गदर्शन उपलब्‍ध करून देण्‍यासोबत किफायतशीर करण्‍याचा मनसुबा आहे.

३. सर्वसमावेशकतेला चालना देणाऱ्या विविध नाविन्‍यता
इतर अंतिम स्‍पर्धक व विजेते सर्वांसाठी क्रीडा उपलब्‍ध करून देण्‍यासाठी तंत्रज्ञान निर्माण करत आहेत, जसे:
• शतरंज स्‍वय क्रू (आसाम): एफआयडीईशी सुसंगत असलेले एआय समर्थित सोल्‍यूशन, जे दृष्टिहीन व्‍यक्‍तींना स्‍वत:हून बुद्धिबळ खेळण्‍यास सक्षम करते.
• स्‍पोर्ट्स४ऑटिझम (तामिळनाडू): हायब्रिड अॅप, जे खेळाच्‍या माध्‍यमातून ऑटिस्टिक मुलांसाठी थेरपीला उत्‍साहित करते, त्‍यांच्‍या प्रगतीवर देखरेख ठेवते आणि सहभाग वाढवते.
• स्‍टेटसकोड२०० (उत्तर प्रदेश): एआय-समर्थित अॅप, जे विद्यार्थी असलेल्‍या खेळाडूंना त्‍यांची कौशल्‍ये (पवित्रा ओळखणे, कौशल्‍य पातळी) सुधारण्‍यास, तसेच वैयक्तिकृत प्रशिक्षण मिळण्‍यास मदत करते.
• युनिटी (तामिळनाडू): पेटण्‍टेड डिवाईस, जे गेमिफाईड दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून ऑटिस्टिक मुलांच्‍या संज्ञानात्‍मक विकासासाठी साह्य करते.

४. प्रोटोटाइपपासून उत्‍पादनापर्यंत नाविन्‍यतेला पाठबळ
विजेत्‍यांना आयआयटी दिल्‍लीमध्‍ये जवळपास १ कोटी रूपये इन्‍क्‍यूबेशन सपोर्ट मिळाला, तसेच टॉप टीम्‍सना अतिरिक्‍त पुरस्‍कार मिळाले, जसे १ लाख रूपये अनुदान, गुडविल अवॉर्ड्स आणि यंग इनोव्‍हेटर अवॉर्ड्स. टॉप २० टीम्‍सना सॅमसंग गॅलेक्‍सी झेड फ्लिप स्‍मार्टफोन देण्‍यात आले.

५. विकेंद्रिकृत क्रीडा परिसंस्‍थेचा विकास
२०२५ कोहर्टमध्‍ये द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधून मोठ्या प्रमाणात सहभागी दिसण्‍यात आले, तसेच माजी विद्यार्थ्‍यांनी नवोदितांना मार्गदर्शन केले आणि प्रोटोटाइपिंगसाठी आयआयटी दिल्‍लीची एफआयटीटी लॅब्‍स उपलब्‍ध करून देण्‍यात आली. यामुळे मेट्रो शहरांपलीकडे क्रीडा तंत्रज्ञान नाविन्‍यतेच्‍या प्रसाराला गती मिळाली.

६. सहानुभूती व जबाबदारीला प्राधान्‍य
विद्यार्थ्‍यांनी सहानुभूती-केंद्रित नाविन्‍यतेवर लक्ष केंद्रित केलेल्‍या डिझाइन-थिकिंग वर्कशॉप्‍समध्‍ये सहभाग घेतला, तंत्रज्ञानासाठी तंत्रज्ञानाऐवजी वास्‍तविक सामाजिक आव्‍हानांचे निराकरण करण्‍यावर भर दिला, तसेच जबाबदार एआय तत्त्वांचे पालन केले.

७. धोरणकर्त्‍यांना सक्षम करण्‍याचा वारसा
२०१० पासून सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोने ६८ शहरांमधील २.९ दशलक्ष तरूण नवप्रवर्तकांना प्रेरित केले आहे, विद्यार्थ्‍यांना बदल घडवून आणणारे एसटीईएम सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍यासाठी मार्गदर्शन व टूल्‍ससह सुसज्‍ज करत आहे. भारताचे विविध क्षेत्रांप्रती योगदान दरवर्षाला वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button