- उपांत्य फेरीतील टीम्सना त्यांच्या संकल्पनांना अधिक विकसित करण्यासाठी मार्गदर्शन, प्रोटोटाइपिंग पाठिंबा आणि नाविन्यता प्लॅटफॉर्म्सची उपलब्धता मिळेल.
- अव्वल ४० टीम्सना ८ लाख रूपये मिळतील, तर टीममधील प्रत्येक सदस्याला सॅमसंग लॅपटॉप मिळेल.
गुरूग्राम, भारत – ऑगस्ट, २०२५ – सॅमसंग इंडिया या देशातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज तरूणांकरिता त्यांची देशव्यापी नाविन्यता स्पर्धा ‘सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो’च्या चौथ्या पर्वासाठी ४० उपांत्य फेरीतील टीम्सच्या राष्ट्रीय निवडीची घोषणा केली. या टीम्स आता स्पर्धेच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करतील, जेथे त्यांना सामाजिक प्रभावासाठी त्यांच्या संकल्पनांना अधिक विकसित करण्यासाठी मार्गदर्शन, प्रोटोटाइपिंग पाठिंबा आणि नाविन्यता प्लॅटफॉर्म्सची उपलब्धता मिळेल.
यंदाच्या उपांत्य फेरीतील टीम्समध्ये विविध भौगोलिक क्षेत्रांमधील टीम्सचा समावेश आहे, जेथे भारतातील १५ राज्यांमधील सहभागी आहेत, ज्यामध्ये कचार (आसाम), बागपत (उत्तर प्रदेश), मेहबूबनगर (तेलंगणा), दुर्ग (छत्तीसगड) आणि सुंदरगड (ओडिशा) अशा दुर्गम प्रांतांमधील सहभागी देखील आहेत. हा उपक्रम देशभरातील तरूण परिवर्तनकर्त्यांना निपुण करत आहे, तसेच त्यांना तंत्रज्ञान व नाविन्यतेच्या क्षमतेच्या माध्यमातून वास्तविक विश्वातील आव्हानांचे निराकरण करण्यास सक्षम करत आहे.

सॉल्व्ह फॉर टूमारोच्या २०२५ पर्वामध्ये चार प्रमुख थीम्सअंतर्गत प्रवेशिका मिळाल्या:
• सुरक्षित, स्मार्ट आणि सर्वसमावेशक भारतासाठी एआय
• भारतात आरोग्य, स्वच्छता आणि स्वास्थ्याचे भविष्य
• शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी क्रीडा आणि तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक बदल
• तंत्रज्ञानाद्वारे पर्यावरणीय शाश्वतता
निवडलेल्या संकल्पनांमधून भारतीय समाजात विकसित होत असलेले प्राधान्यक्रम निदर्शनास येतात, ज्यामध्ये हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण, जैवविविधता संवर्धन व शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी एआय-नेतृत्वाखालील साधनांपासून अन्न अपव्यय आणि ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्मार्ट उपायांचा समावेश आहे. इतर नवोपक्रमांमध्ये वंचित समुदायांमधील विद्यार्थ्यांसाठी गेमिफाइड लर्निंग, वैयक्तिकृत कोचिंग अॅप्स आणि ऑटिझम असलेल्या मुलांसाठी क्रीडा-नेतृत्वाखालील हस्तक्षेप यांचा समावेश आहे. आरोग्य व संशोधन क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लवकर निदान, मानसिक आरोग्य साधने आणि इंटेलिजण्ट डेटा स्क्रॅपिंगद्वारे टेक्निकल संशोधन सुलभ करणे समाविष्ट आहे.
“आम्हाला सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५च्या अव्वल ४० उपांत्य फेरीतील टीम्सची घोषणा करताना आनंद होत आहे. द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे व दुर्गम भागांमधील हे तरूण नवप्रवर्तक समाजातील वास्तविक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यांच्या संकल्पनांमधून अर्थपूर्ण परिवर्तनाला गती देण्यासाठी भारतातील तरूणांची अविश्वसनीय क्षमता दिसून येते. ते पुढील टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आम्ही त्यांना मार्गदर्शन, संसाधने आणि प्लॅटफॉर्मसह साह्य करू, ज्यामुळे त्यांना स्मार्ट, अधिक सर्वसमावेशक भारतासाठी त्यांच्या संकल्पनांचा वास्तविक विश्वामध्ये प्रभाव घडवून आणता येईल,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष एसपी चुन म्हणाले.
“आम्हाला सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोसह आमचा सहयोग सुरू ठेवण्याचा अभिमान वाटतो. यंदा प्रादेशिक सादरीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आणि त्यामधून निवडलेल्या संकल्पनांची व्याप्ती व सखोलता स्पष्टपणे दिसून आली आहे. या तरूण नवप्रवर्तकांमध्ये भारतातील भावी स्टार्ट-अप परिसंस्थेला आकार देण्याची क्षमता आहे,” असे एफआयटीटी-आयआयटी दिल्लीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले.
उपांत्य फेरीतील टीम्ससाठी पुढे काय आहे?
सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो २०२५ मधील त्यांच्या प्रवासाचा भाग म्हणून, अव्वल ४० टीम्स इनोव्हेशन बूटकॅम्पमध्ये सहभागी होतील, जे त्यांच्या संकल्पनांना व्यवहार्य प्रोटोटाइपमध्ये रूपांतरित करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या टप्प्यात, सहभागी सॅमसंग आरअँडडी आणि साऊथवेस्ट एशिया ऑपरेशन्समधील प्रमुख व तज्ञांना भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. ते आयआयटी दिल्ली येथील उद्योग आणि सरकारी तज्ञांच्या नेतृत्वाखालील क्युरेटेड प्रशिक्षण सत्रांना देखील उपस्थित राहतील, तसेच त्यांना नाविन्यता, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेबद्दल प्रत्यक्ष माहिती मिळेल. बूटकॅम्पमध्ये आयआयटी दिल्लीच्या मार्गदर्शकांकडून आणि मागील सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो पर्वांमधील माजी विद्यार्थ्यांकडून संरचित प्रोटोटाइपिंग पाठिंबा देखील मिळेल, ज्यामुळे सतत शिक्षण आणि मार्गदर्शनाची खात्री मिळेल. बूटकॅम्पनंतर राष्ट्रीय पिच इव्हेंट आयोजित केला जाईल, जेथे निवडक सॅमसंग ज्युरी स्पर्धेत पुढे जाणाऱ्या अंतिम २० टीम्सचे मूल्यांकन करण्यासह शॉर्टलिस्ट करेल.
पुरस्कार व पाठिंबा
• अव्वल ४० टीम्स – ८ लाख रूपये मिळतील, तसेच टीममधील प्रत्येक सदस्याला सॅमसंग लॅपटॉप मिळेल.
• अव्वल २० टीम्स – २० लाख रूपये आणि नवीन सॅमसंग गॅलॅक्सी झेड फ्लिप स्मार्टफोन्स मिळतील.
• ग्रँड फिनालेमध्ये चार विजेत्या टीम्स – त्यांच्या नवकल्पनांना वाढवण्यासाठी आयआयटी दिल्ली येथे १ कोटी रूपयांचे इन्क्यूबेशन अनुदान मिळेल.
• ग्रँड फिनालेमध्ये विशेष पुरस्कार – गुडविल अवॉर्ड, यंग इनोव्हेटर अवॉर्ड आणि सोशल मीडिया चॅम्पियन, तसेच ४.५ लाख रूपयांचे एकत्रित बक्षीस.
तरूणांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक दृष्टिकोन
२०१० मध्ये यूएसमध्ये लाँच करण्यात आलेला उपक्रम ‘सॉल्व्ह फॉर टूमारो’ सध्या जगभरातील ६८ देशांमध्ये कार्यरत आहे आणि जगभरातील ३ दशलक्षहून अधिक तरूणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जागतिक सीएसआर दृष्टिकोन ‘टूगेदर फॉर टूमारो! अनेबलिंग पीपल’शी संलग्न असलेल्या या उपक्रमाचा तरूणांना भावी लीडर्स बनण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण व कौशल्यांसह सक्षम करण्याचा मनसुबा आहे.