- सॅमसंगच्या एसी विक्रीमध्ये १९ नवीन एसी मॉडेल्समुळे जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान वार्षिक दुप्पट वाढ झाली
- नवीन बीस्पोक एआय विंडफ्री एसी मॉडेल्स इंटेलिजण्ट कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता व कनेक्टेड राहणीमानावर लक्ष केंद्रित करतात आणि भारतातील ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत
भारत – एप्रिल ९, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सांगितले की त्यांच्या एअर कंडिशनर्सची विक्री जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान दुप्पट वाढली, जेथे त्यांनी २० ते २५ टक्के उद्योग विकासाला मागे टाकले. या उद्योग-अग्रणी विकासामुळे सॅमसंगला भारतात कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये १० टक्के मार्केट शेअर सुनिश्चित करण्यास मदत झाली.
”आमचा एसी व्यवसाय दृढ गतीने विकसित होत आहे. मार्च तिमाहीमध्ये आम्ही दुप्पट वाढ केली, ज्यामुळे आम्हाला १० टक्के मार्केट शेअर सुनिश्चित करण्यास मदत झाली, जे आमच्या अंतर्गत अंदाजांनुसार आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही उद्योगामधील विकासाचे नेतृत्व करणार आहोत आणि सर्वोत्तम वाढीसह आमचा उत्तम मार्केट शेअर देखील असेल,” असे सॅमसंगमधील डिजिटल अप्लायन्सेस बिझनेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.

सॅमसंगला लहान शहरे व नगरांमधील डिस्पोजेबल उत्पन्नामध्ये वाढ, वाढत्या महत्त्वाकांक्षा आणि वाढत्या इलेक्ट्रिफिकेशनमुळै चॅनेल्स व प्रांतांत व्यापक विकासाची अपेक्षा आहे. सॅमसंगने आपले वितरण फूटप्रिंट ४० टक्क्यांनी वाढवले आहे आणि रूम-एअर कंडिशनर्सच्या खरेदीसाठी झीरो-कॉस्ट ईएमआय देण्यासाठी आघाडीच्या आर्थिक संस्थांसोबत सहयोग केला आहे.
”आम्ही उच्च दर्जाचे कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि भावी सुसज्जतेवरील सुस्पष्ट फोकससह यंदा १९ नवीन मॉडेल्स लाँच केले आहेत. आमची नवीन बीस्पोक एआय विंडफ्री एसी ग्राहकांच्या एसी वापरण्याच्या पद्धती व वर्तणूकींना समजून घेतात, मग ते घरी असतील, झोप घेत असतील किंवा बाहेरील उष्ण तापमानामधून आलेले असतील. या पद्धतींनुसार एसी स्वत:हून समायोजित होत सानुकूल आरामदायीपणा देतात,” असे आलम पुढे म्हणाले.
बीस्पोक एआय विंडफ्री एसी एआय एनर्जी मोडसह येतात, जे इंटेलिजण्टली कूलिंग सेटिंग्ज समायोजित करतात आणि जवळपास ३० टक्के वीजेची बचत करतात. यामुळे एअर कंडिशनर खरेदी करताना ग्राहकांना भेडसावणाऱ्या प्रमुख खरेदी घटकांचे निराकरण होते आणि तो घटक म्हणजे आरामदायीपणाबाबत तडजोड न करता ऊर्जा-कार्यक्षम अप्लायन्सेससाठी मागणी.
एआय फास्ट अँड कम्फर्ट कूलिंग वैशिष्ट्य अधिकतम फॅन स्पीडसह रूममधील तापमान झपाट्याने कमी करत त्वरित आराम देते. इच्छित तापमान संपादित झाल्यानंतर सिस्टम इंटेलिजण्टली विंडफ्री मोडमध्ये स्विच होते आणि सतत कूलिंग ठेवते, ज्यामुळे झोप किंवा अतिथींचे मनोरंजन अशा क्रियाकलापांसाठी आरामदायी वातावरणाची खात्री मिळते.
नवीन बीस्पोक एआय विंडफ्री एसींची किंमत ३२९९० रूपयांपासून सुरू होते आणि सर्वात प्रीमियम मॉडेलसाठी किंमत ६०९९० रूपयांपर्यंत आहे. सॅमसंग एसी ५ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीसह येतात आणि ग्राहक प्रबळ सर्विस व इन्स्टॉलेशन नेटवर्कमधून फायदा घेऊ शकतात, जेथे देशभरातील १९००० हून अधिक पिनकोड्सपर्यंत सेवा दिली जाते.
