- सॅमसंग व्हिजन एआयसह वापरकर्ते आता युनिव्हर्सल जेस्चर कंट्रोल, एआय-पॉवर्ड पिक्चर सुधारणा, जनरेटिव्ह आर्ट वॉलपेपर्स आणि रिअल-टाइम होम इनसाइट्सचा आनंद घेऊ शकतात, ज्यामधून स्मार्टर आणि अधिक वैयक्तिकृत व्युइंग अनुभव मिळतो
- प्रमुख निओ क्यूएलईडी ८के क्यूएन९५०एफ मध्ये उल्लेखनीय वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहे, जसे एआय अपस्केलिंग प्रो, ग्लेअर-फ्री व्युइंग, ऑटो एचडीआर रिमास्टरिंग प्रो आणि कलर बूस्टर प्रो, जे आधुनिक होम एंटरटेन्मेंटला नव्या उंचीवर घेऊन जातात
- नवीन एआय लाइन-अपमधून इंटेलिजण्ट व सर्वोत्तम स्क्रिन्स वितरित करण्याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते, ज्यामध्ये नाविन्यता, आकर्षकता आणि जीवनशैली सुधारणेचे विनासायास संयोजन आहे
भारत – मे ८, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांच्या निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी, क्यूएलईडी टेलिव्हिजन्स आणि द फ्रेम लाइनअपच्या अल्ट्रा-प्रीमियम २०२५ मॉडेल्सच्या लाँचची घोषणा केली, जेथे भारतातील ग्राहकांसाठी क्रांतिकारी सॅमसंग व्हिजन एआय तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे; या लाँचची खासियत म्हणजे नवीन सॅमसंग व्हिजन एआय, जे नेक्स्ट-जनरेशन एआय क्षमतांसह अद्वितीय होम एंटरटेन्मेंट अनुभव देते. नाविन्यतेप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत सॅमसंगची नवीन श्रेणी वापरकर्त्यांच्या स्क्रिन्ससोबत परस्परसंवाद साधण्याच्या पद्धतींना नव्या उंचीवर घेऊन जाते, जेथे स्क्रिन्सना इंटेलिजण्ट सोबतींमध्ये बदलते, जे दैनंदिन राहणीमान उत्साहित करतात.

सॅमसंग व्हिजन एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञान फ्रेमवर्कसोबत वैयक्तिक अनुभवासह अधिक कार्यक्षमतेसाठी एआय-एन्हान्स्ड पिक्चर व साऊंड आहे. सॅमसंग व्हिजन एआय तीन आधारस्तंभांवर निर्माण करण्यात आले आहे.
- एआय मोड प्रगत डिप-लर्निंग अल्गोदिरम्सचा वापर करत रिअल टाइममध्ये पिक्चर क्वॉलिटी व साऊंड ऑप्टिमाइज करते, जेथे हे अल्गोदिरम्स कन्टेन्ट आणि अॅम्बियण्ट वातावरणाशी जुळवून घेतात, ज्यामधून प्रत्येक वेळी आकर्षक व्हिज्युअल्स आणि सर्वोत्तम ऑडिओची खात्री मिळते.
- एआय एक्स्पेरिअन्स काळासह वापरकर्त्यांच्या पसंती जाणून घेत कन्टेन्ट शोध व सेटिंग्ज वैयक्तिकृत करते, ज्यामधून स्मार्टर, अधिक सर्वोत्तम इंटरअॅक्शन मिळते.
- मल्टी-डिवाईस कनेक्टीव्हीटी विनासायासपणे टीव्हीला स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स व इतर स्मार्ट डिवाईसेसशी कनेक्ट करते, ज्यामुळे सॅमसंग इकोसिस्टममध्ये कन्टेन्ट शेअरिंग, कंट्रोल व सातत्यता राखता येते.
”भारतातील घरांमध्ये टेलिव्हिजनची भूमिका बदलत आहे. आता टेलिव्हिजन फक्त कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून कनेक्टेड, इंटेलिजण्ट जीवनशैलींना सक्षम देखील करत आहे. आमच्या व्यापक प्रीमियम लाइनअपमध्ये सॅमसंग व्हिजन एआयच्या सादरीकरणासह आम्ही फ्यूचर-रेडी टीव्ही अनुभव देत आहोत, जो आकर्षक व्हिज्युअल्सच्या पलीकडे जातो. सॅमसंग व्हिजन एआय वैयक्तिकृत, एआय-पॉवर्ड स्क्रिन अनुभव देते, जेथे पाहिल्या जाणाऱ्या कन्टेन्टपेक्षा प्रेक्षकाला अधिक महत्त्व दिले जाते. आम्ही या परिवर्तनाला ‘इट्स युअर शो’ अनुभव म्हणतो, जेथे वापरकर्ते पूर्णपणे नियंत्रणात असतात, तसेच टीव्ही त्यांच्या अद्वितीय पसंती, सवयी आणि इकोसिस्टमशी जुळून जातो. आमची नवीन एआय टीव्ही लाइनअप प्रत्येक फ्रेममध्ये नवीन उत्साहाची भर करते, घरामध्ये सिनेमॅटिक सर्वोत्तमतेसाठी नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. एआय-पॉवर्ड स्क्रिन्सच्या या नवीन युगासह आम्हाला नेक्स्ट-जनेरशन टीव्ही अवलंबनाला गती देण्याचा आणि भारतातील प्रीमियम टेलिव्हिजन सेगमेंटमधील आमचे नेतृत्व अधिक दृढ करण्याचा विश्वास आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विप्लेश दंग म्हणाले.
सॅमसंग व्हिजन एआय: स्मार्ट, वैयक्तिकृत मनोरंजन अनुभवांच्या नवीन पिढीचे सक्षमीकरण
सॅमसंग व्हिजन एआय स्क्रिन्सना अधिक स्मार्टर, अधिक सर्वोत्तम आणि वैयक्तिक करण्यामधील मोठी झेप आहे. हे वैशिष्ट्य टेलिव्हिजन्सना अॅडप्टिव्ह हब्समध्ये बदलते, जे वातावरण आणि वापरकर्त्याच्या वागणूकीनुसार प्रतिसाद देतात. ते दैनंदिन जीवनामध्ये उत्साहाची भर करतात, टीव्हीला फक्त मनोरंजनापेक्षा इंटेलिजण्ट सोबती बनवतात.
मोठ्या स्क्रिनवरील मनोरंजन अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी विविध वैशिष्ट्ये एकत्र आली आहेत.
युनिव्हर्सल गेस्चर कंट्रोल वापरकर्त्यांना सोप्या हँड मूव्हमेंट्सचा वापर करत सॅमसंग स्मार्ट एआय टीव्ही प्रभावीपणे नेव्हिगेट करण्याची सुविधा देते, ज्यामुळे रिमोटची गरज दूर होते. हे वैशिष्ट्य जेस्चर्स ओळखण्यासाठी एआय तंत्रज्ञान आणि कनेक्टेड गॅलॅक्सी वॉचचा वापर करते, ज्यामुळे विविध टीव्ही फंक्शन्सवर सर्वोत्तम नियंत्रण ठेवता येते.
एआय अपस्केलिंग प्रो कमी रिझॉल्यूशन कन्टेन्टला जवळपास ८के क्वॉलिटीमध्ये बदलते, ज्यामधून प्रत्येक कन्टेन्ट सुस्पष्टपणे दिसण्याची खात्री मिळते. सॅमसंगच्या एनक्यू८ एआय जेन३ प्रोसेसरची शक्ती असलेले हे वैशिष्ट्य इमेजेसना अधिक सुस्पष्ट करते, क्लीअरिटी वाढवते, तसेच उत्साही व वास्तविक व्युइंग अनुभव देते.
जनरेटिव्ह वॉलपेपर आयडल स्क्रिन्सना डायनॅमिक, वैयक्तिकृत आर्ट कॅन्व्हासमध्ये बदलते, ज्यामधून मूड किंवा प्रसंगांनुसार व्हिज्युअल्सची निर्मिती होते. एआयचा फायदा घेत हे वैशिष्ट्य अद्वितीय ४के इमेजेस् निर्माण करते, ज्यामुळे वापरकर्ते कस्टम आर्टवर्कसह त्यांच्या व्युइंग अनुभवाला वैयक्तिकृत करू शकतात.
मल्टी-डिवाईस कनेक्टीव्हीटी वापरकर्त्यांना रिअल-टाइम अलर्ट्स व एनर्जी मॉनिटरिंगसह त्यांच्या लिव्हिंग वातावरणाबाबत अपडेटेड ठेवते. स्मार्टथिंग्ज एकीकृत असण्यासह हे वैशिष्ट्य घराच्या स्टेटसबाबत रिअल-टाइम सारांश देते आणि आवश्यक कृतींबाबत सल्ला देते, ज्यामुळे वापरकर्ते घरी असो वा बाहेर समाधानाची खात्री मिळते.
पेट अँड फॅमिली केअर मोड पाळीव प्राण्यांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या असामान्य क्रियाकलापांना ओळखत समाधान देतो आणि अतिरिक्त कम्फर्टसाठी आपोआपपणे होम सेटिंग्ज समायोजित करते. ऑन-डिवाईस एआयचा फायदा घेत हे वैशिष्ट्य कुत्रा भुंकणे किंवा बाळ रडणे अशा घटनांना ओळखू शकते आणि वापरकर्त्यांना लक्ष देण्याची गरज असण्याबात दक्ष करू शकते.
सॅमसंगचा सर्वात प्रगत एआय-पॉवर्ड निओ क्यूएलईडी ८के टीव्ही व्हिज्युअल डिस्प्ले तंत्रज्ञानाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे
२०२५ एआय टीव्ही लाइनअपमध्ये अग्रस्थानी आहे प्रमुख निओ क्यूएलईडी ८के क्यूएन९५०एफ, जो सर्वोत्तम टीव्ही इनोव्हेशन वितरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ७६८ एआय न्यूरल नेटवर्क्स असलेल्या प्रगत एनक्यू८ एआय जेन३ प्रोसेसरची शक्ती असलेला हा टीव्ही उल्लेखनीय वैशिष्ट्यांसह संपन्न आहे; इनपुट स्रोत कोणतेही असले तरी सुस्पष्टतेसह अपवादात्मक व्युइंग अनुभव देणाऱ्या या टीव्हीमध्ये अल्ट्रा-स्लिम, किमान इन्फिनिटी एअर डिझाइन आहे. निओ क्यूएलईडी ८के क्यूएन९५०एफ आकर्षकता व तंत्रज्ञान क्षमतेचा टीव्ही आहे, जो सर्वोत्तम व अत्याधुनिक सिनेमॅटिक व्हिज्युअल अनुभव देतो.
८के एआय अपस्केलिंग प्रो वैशिष्ट्य इंटेलिजण्टली विश्लेषण करते आणि कोणत्याही कन्टेन्टला ८के क्वॉलिटीमध्ये बदलते, ज्यामधून उल्लेखनीय अचूकतेसह सुस्पष्टता व टेक्स्चर्सची खात्री मिळते.
ग्लेअर-फ्री तंत्रज्ञान प्रखर प्रकाश असलेल्या जागांमध्ये देखील विनासायास व सुस्पष्टपणे व्युइंगची खात्री देते, कलर किंवा कॉन्स्ट्रास्टबाबत तडजोड न करता रिफ्लेक्शन्स कमी करते.
क्यू-सिम्फनी आणि डॉल्बी अॅटमॉस एकत्रित सर्वोत्तम, बहुअयामी ऑडिओ अनुभव देतात, जेथे टीव्ही स्पीकर्स आणि सुसंगत सॅमसंग साऊंडबार्सना सिन्क्रनाइज करतात.
अल्ट्रा-फास्ट २४० हर्ट्झ रिफ्रेश रेट फ्लूइड मोशन आणि रेझर-शार्प व्हिज्युअल्सची खात्री देते, जे हाय-स्पीड एक्शन, स्पोर्ट्स व नेक्स्ट-जनरेशन गेमिंगसाठी अनुकूल आहे.
एआय मोड कन्टेन्ट प्रकार व आसपासच्या वातावरणानुसार पिक्चर व साऊंड इंटेलिजण्टली ऑप्टिमाइज करते, सानुकूल व्युइंग अनुभव देते.
निओ क्यूएलईडी ८के ८५ इंच, ७५ इंच व ६५ इंच आकारांमध्ये उपलब्ध आहे.
सर्व मनोरंजन गरजांसाठी लाइनअप: निओ क्यूएलईडी ४के
क्यूएन९०एफ, क्यूएन८५एफ, क्यूएन८०एफ आणि क्यूएन७०एफ हे निओ क्यूएलईडी ४के लाइनअपमध्ये अग्रस्थानी आहेत. क्यूएन९०एफमध्ये क्वॉन्टम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी प्लससह १२८ न्यूरल नेटवर्क्स, मोशन एक्सेलरेटर १६५ हर्ट्झ, ग्लेअर-फ्री व्युइंग आणि शक्तिशाली ६० वॅट ४.२.२ चॅनेल स्पीकर सिस्टमसह सिनेमॅटिक ऑडिओ-व्हिज्युअल अनुभवासाठी डॉल्बी अॅटमॉस व क्यू-सिम्फनी, तसेच सॅमसंगच्या सिग्नेचर निओ स्लिम डिझाइनसह आर्ट स्टोअर आणि जनरेटिव्ह वॉलपेपर सपोर्ट आहे.
सॅमसंगचे २०२५ ओएलईडी टीव्ही एनक्यू४ एआय जेन३ प्रोसेसरसह कार्यक्षमतेला अधिक पुढे घेऊन जातात, तसेच १२८ न्यूरल नेटवर्क्स, मोशन एक्सेलरेटर १६५ हर्ट्झ, ग्लेअर-फ्री व्युइंग आणि फास्ट-मूव्हिंग सीन्समध्ये अपवादात्मक सुस्पष्टतेसाठी एआय मोशन एन्हान्सर प्रो आहे. १०० टक्के कलर व्हॉल्यूमचे सपोर्ट असलेले हे मॉडेल्स पॅन्टोन व्हॅलिडेटेड आहेत, तसेच या मॉडेल्समध्ये विनाव्यत्यय मनोरंजनासाठी अॅटॅचेबल स्लिम वन कनेक्टसह किमान इन्फिनिटी वन डिझाइन आहे.
सॅमसंगने गेमिंग, मनोरंजन, शिक्षण व फिटनेस अशा सेवांची श्रेणी समाविष्ट करण्यासाठी भारतीय ग्राहकांकरिता स्थानिकीकृत स्मार्ट एक्स्पेरिअन्सेस् देखील दर्शवले आहेत.
क्लाऊड गेमिंग सर्विस वापरकर्त्यांना प्लग अँड प्लेसह एएए गेम्सचा अनुभव घेण्यास सक्षम करते, ज्यासाठी कोणतेही कन्सोल किंवा पीसीची गरज नाही.
सॅमसंग एज्युकेशन हब वापरकर्त्यांना बिग स्क्रिन लर्निंगसह लाइव्ह क्लासेसचा अनुभव घेण्यास मदत करते, ज्यामुळे मुलांसाठी शिक्षण अधिक इंटरअॅक्टिव्ह व सर्वोत्तम बनते.
टीव्ही की सर्विससह ग्राहकांना आता सेट-टॉप बॉक्सची गरज नाही, जेथे क्लाऊडच्या माध्यमातून प्रत्यक्ष कन्टेन्टचे ट्रान्समिशन होते.
सॅमसंग टीव्ही प्लस मोफतपणे १२५ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चॅनेल्स देते, जेथे बातम्या, चित्रपट, मनोरंजन असे विविध चॅनेल्स त्वरित उपलब्ध होतात.
२०२५ सॅमसंग एआय टेलिव्हिजन्समध्ये बिल्ट-इन स्मार्टथिंग्ज हब आहे, जे टेलिव्हिजनला कनेक्टेड राहणीमानासाठी प्रमुख कमांड सेंटरमध्ये बदलते. हे एकीकरण वापरकर्त्यांना प्रभावीपणे कनेक्ट होण्यास आणि विविध स्मार्ट डिवाईसेसवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तसेच, स्मार्टथिंग्ज एनर्जी ऊर्जा वापर पद्धतींबाबत माहिती देते, ज्यामुळे घरामध्ये कार्यक्षम ऊर्जा वापराची खात्री मिळते. प्लॅटफॉर्मच्या अॅम्बियण्ट सेन्सिंग क्षमता मानवी हालचाल व पर्यावरणीय आवाजांचे विश्लेषण करते, ज्यामुळे सिस्टम दैनंदिन रूटिन्सनुसार लायटिंग व तापमान यांसारख्या सेटिंग्जशी जुळून जाते, परिणामत: आरामदायीपणा आणि सोयीसुविधा वाढते.
युजर डेटा व गोपनीयतेचे संरक्षण करणारा सर्वसमावेशक सिक्युरिटी प्लॅटफॉर्म सॅमसंग नॉक्ससह उच्च सुरक्षा मानक राखले जाते. हे वैशिष्ट्य अनधिकृत बदलांना ओळखते व त्यांना प्रतिबंध करते, मालिशियस साइट्सपासून संरक्षणासाठी फिशिंग वेबसाइट्सना ब्लॉक करते आणि सॅमसंग नॉक्स वॉल्टच्या माध्यमातून वैयक्तिक माहितीचे संरक्षण करते.
फ्यूचर-रेडी व सुरक्षित स्मार्ट टीव्ही अनुभवासाठी सॅमसंगची २०२५ एआय टीव्ही लाइनअप विना अतिरिक्त खर्चामध्ये ७ वर्षांच्या गॅरण्टीड ओएस अपग्रेड्ससह येते. या उद्योग-अग्रणी कटिबद्धतेमधून प्रत्येक डिवाईसच्या टिकाऊपणाची खात्री मिळते, जेथे प्रत्येक डिवाईस आधुनिक वैशिष्ट्ये, सुधारित सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारणांसह अद्ययावत राहतो. प्रगत एआय कार्यक्षमता असो किंवा विनासायास स्मार्टथिंग्ज एकीकरण असो ग्राहक वर्षानुवर्षे सतत प्रीमियम अनुभवाचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे सॅमसंगच्या व्हिजन एआय-पॉवर्ड टेलिव्हिजन्समधील त्यांची गुंतवणूक फ्यूचर-प्रूफ बनते.
किंमत, ऑफर्स व उपलब्धता:
निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी आणि द फ्रेम टीव्हींची २०२५ लाइनअप प्री-ऑर्डरसाठी ७ मे २०२५ पासून सॅमसंग रिटेल स्टोअर्स, Samsung.com आणि आघाडीच्या ऑफलाइन व ऑनलाइन रिटेल चॅनेल्सवर उपलब्ध असेल.
प्री-ऑर्डर ऑफरचा भाग म्हणून निओ क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी ४के, ओएलईडी टीव्ही आणि द फ्रेम खरेदी करणारे ग्राहक आकर्षक फायद्यांचा लाभ घेऊ शकतात, जसे जवळपास ९०,९९० रूपये किंमत असलेला साऊंडबार मोफत, जवळपास २० टक्के कॅशबॅक, झीरो डाऊन पेमेंटसह सुलभ ईएमआय, २९९० रूपये इतक्या कमी किमतीपासून सुरू होणारे ईएमआय आणि जवळपास ३० महिन्यांची ईएमआय मुदत. या ऑफर्स २८ मे २०२५ पर्यंत वैध आहेत.
• सॅमसंगच्या निओ क्यूएलईडी ८के श्रेणीची किंमत २,७२,९९० रूपयांपासून सुरू होते.
• सॅमसंगच्या निओ क्यूएलईडी ४के श्रेणीची किंमत ८९,९९० रूपयांपासून सुरू होते.
• सॅमसंगच्या ओएलईडी श्रेणीची किंमत १,५४,९९० रूपयांपासून सुरू होते.
• सॅमसंगच्या क्यूएलईडी श्रेणीची किंमत ४९,४९० रूपयांपासून सुरू होते.
• सॅमसंगच्या फ्रेम टीव्ही श्रेणीची किंमत ६३,९९० रूपयांपासून सुरू होते.
२०२५ सॅमसंग एआय टीव्ही लाइनअप विविध स्क्रिन आकारांमध्ये उपलब्ध आहे, जी प्रत्येक व्युइंग पसंती आणि स्पेस आवश्यकतेची पूर्तता करते. या श्रेणीमध्ये ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच, ६५ इंच, ७५ इंच, ७७ इंच, ८३ इंच, ८५ इंच, ९८ इंच आणि अल्ट्रा-लार्ज १०० इंच व ११५ इंच आकाराच्या टीव्हींचा समावेश आहे. कॉम्पॅक्ट वैयक्तिक मनोरंजन झोन्सपासून सर्वोत्तम होम थिएटर्सपर्यंत ही वैविध्यपूर्ण श्रेणी प्रत्येक रूम व गरजेनुसार परिपूर्ण एआय-पॉवर्ड स्क्रिनचा अनुभव मिळण्याची खात्री देते.